Samsung Galaxy Z Fold 6: गेल्या अनेक वर्षांपासून सॅमसंगचे दोन Android फोन गॅलेक्सी झेड फ्लिप आणि गॅलेक्सी झेड फोल्ड हे फोल्डिंग डिव्हाइसेस लोकप्रिय आहेत. नुकतेच, कंपनीने या प्रगत स्मार्टफोन्सचे नवीन मॉडेल, Galaxy Z Flip 6 आणि Galaxy Z Fold 6 लॉन्च केले आहेत. या वर्षीच्या प्रमुख टेकनॉलॉजि मध्ये एआय इंटेलिजेंससह Google AI आणि Google Gemini, तसेच स्लिम, ब्राईट आणि हाय रिझोल्यूशनसह फोल्डिंग डिस्प्ले यांचा समावेश केला आहे.
Galaxy Z Fold 6 मध्ये तुमच्याकडे आता एक स्लिम आणि फास्ट एक्सपीरियन्स असेल, तसेच नवीन वैशिष्ट्ये आणि तुमच्या फोनशी कनेक्टिव्हिटी साधण्याचे मार्ग असेल. नवीन Galaxy Z Flip 6 आणि Galaxy Z Fold 6 आता ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि 24 जुलै 2024 पासून ऑनलाइन व ऑफलाइन विक्री सुरू झाली आहे.
Samsung Galaxy Z Fold 6
दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी Samsung ने Galaxy Unpacked 2024 इव्हेंटचा एक भाग म्हणून आपल्या नवीन स्मार्टफोन्सचे लॉन्चिंग केले आहे. Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 हे दोन्ही स्मार्टफोन एआय फीचर्सने परिपूर्ण आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसरद्वारे चालवला जाणारे हे दोन्ही फोन शक्तिशाली आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि Ai प्रक्रियेवर आधारित नवीन वैशिष्ट्यांसह सज्ज आहेत. जुन्या फोल्डिंग हँडसेटपासून या मोबाईल फोन्सच्या डिझाइनमध्ये खूप बदल झाला आहे. या वेळी डिझाइनमध्ये अनेक नवकल्पना आल्या आहेत, ज्याला सुधारित कूलिंग सिस्टमद्वारे सपोर्ट दिला आहे.
Galaxy Z Flip 6: Specifications
- सॅमसंगच्या मोठ्या स्क्रीनच्या फोल्डेबल फोनमध्ये 7.6-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आहे. ते 2600nits 120Hz ची टॉप ब्राइटनेस ऑफर करते आणि गोरिला ग्लास व्हिक्टस 2 द्वारे संरक्षित आहे.
- हे दोन्ही स्मार्टफोन एस पेन सपोर्ट करतात. फोनच्या बाहेरील भागात 6.3-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे.
- यात 1.6x मोठा स्टीम चेंबर आहे, जो गेमिंगसाठी किंवा दीर्घ कालावधीसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी वापरल्यास तुमचा फोन गरम होणार नाही. याव्यतिरिक्त, या फोनवर अनेक Galaxy AI आधारित वैशिष्ट्ये उपलब्ध असतील.
- कॅमेरा सेटअपसाठी, मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप 50MP प्राथमिक OIS सह, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 3x ऑप्टिकल झूम 10MP टेलिफोटो सेन्सर आहे.
- सॅमसंगच्या या नवीनतम फोनमध्ये 10MP इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4400mAh बॅटरी आहे.
Galaxy Z Flip 6: यात नवीन काय आहे
Samsung Galaxy Z Fold 6 तसेच ड्युअल सिमसह Android 14 वर आधारित एक UI 6.1.1 मिळेल. याशिवाय फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसर 12 जीबी रॅम पर्यंत आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल
Galaxy Z Flip 6: ची वैशिष्ट्ये कशी आहेत?
हा सॅमसंग फोन क्लॅमशेल स्टाईलमध्ये फोल्ड होतो. यात 3.4 इंच AMOLED फ्लेक्सविंडो दुय्यम डिस्प्ले दिलेला आहे.
- हा हँडसेट अनेक AI आधारित फीचर्स ऑफर करत आहे आणि तुम्ही ते अँप्स न उघडता ॲक्सेस करू शकता.
- या फोनमध्ये 6.7 इंच डायनॅमिक AMOLED 2X रिफ्रेश रेट आहे आणि या फोनची जाडी 6.9mm आहे.
- यात Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे आणि तो Android 14 सॉफ्टवेअरवर चालतो.
- कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, डिव्हाइसच्या मागील पॅनलवर 50MP OIS प्राइमरी आणि 12MP अल्ट्रावाइड सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे.
- 10MP सेल्फी कॅमेरा असलेल्या या उपकरणाची 4000mAh बॅटरी 25W चार्जिंग सपोर्टसह प्रदान केली गेली आहे आणि IP48 रेटिंगसह येते.
Samsung Galaxy ची उपलब्धता
Samsung Galaxy Z Fold 6 नेव्ही, पिंक आणि सिल्व्हर शॅडो कलरमध्ये येतो, तर Galaxy Z Flip 6 निळ्या, मिंट, सिल्व्हर शॅडो आणि पिवळ्या रंगांमध्ये येतो. फोनद्वारे पूर्वनोंदणी सुरू आहे. दोन्ही फोनची विक्री 24 जुलैपासून सुरू होणार आहे. 256GB स्टोरेज आणि 12GB RAM सह Galaxy Z Flip 6 ची किंमत रु. 1,09,999 तर 12GB रॅम सह 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे रु 1,21,999 आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह Galaxy Z Fold 6 ची किंमत रु 1,64,999 आणि 512GB स्टोरेजची किंमत रु. 1,76,999 आणि 1TB स्टोरेजची किंमत (सिल्व्हर शॅडो) 2,00,999 रु आहे.
for online detail’s: click on https://www.samsung.com/in/smartphones/galaxy-z-flip6/