Term Insurance Coverage:पॉलिसीधारकांसाठी 1CR टर्म प्लॅन खरेदी करणे का आहे अर्थपूर्ण?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

Term Insurance Coverage: आपल्या भारतामधील बहुतांश गुंतवणूकदार आणि पॉलिसीधारकांचे टर्म प्लॅनकडे दुर्लक्ष होत आहे, असे IRDIA च्या अहवालात म्हणले आहे. सर्वप्रकारच्या एकूण विमा विक्रीत फक्त 5% वाटा टर्म प्लॅनचा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, टर्म इन्शुरन्सद्वारे फक्त रिस्क कव्हर दिले जाते, हि पद्धत फक्त संरक्षणासाठी वापरली जाते आणि यामध्ये कोणत्याही पद्धतीचा परिपक्वता लाभ (maturity benefits) दिला जात नसतो. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच या पॉलिसीचा लाभ मिळतो. त्यामुळे, अनेक जण टर्म इन्शुरन्स योजना निवडण्याऐवजी Endowment Plans किंवा पैसे परत मिळणाऱ्या योजना money-back policies निवडतात.

HNI (High Net Worth Individuals) का निवडत आहेत उच्च मूल्याचे टर्म प्लॅन?

Term Insurance Coverage
Term Insurance Coverage

तुलनेने कमी उत्पन्न गटातील लोकांचे टर्म प्लॅन घेण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी, भारतातील निव्वळ हाय इन्कम असलेल्या व्यक्ती (HNIs) मोठ्या प्रमाणावर हाय रिस्क कव्हर टर्म प्लॅनकडे वळत आहेत. 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त विमा रक्कम असलेला टर्म प्लॅन निवडीचा ट्रेंड श्रीमंत व्यक्तींच्या आर्थिक नियोजन आणि जोखीम व्यवस्थापन पद्धतींमध्ये प्राध्यान्याने वाढत आहे. पारंपारिक दृष्टिकोनाप्रमाणे, हाय रिस्क कव्हरचे टर्म प्लॅन ऑनलाइन खरेदी करणे कठीण होते, परंतु अलीकडील अहवालानुसार, ही पूर्वकल्पना बदलत आहे. आता, 5 कोटी आणि त्याहून जास्त रुपयांच्या विमा रकमेच्या योजनाही सामान्य होत आहेत.

टर्म इन्शुरन्स योजना काय आहे?

टर्म प्लॅन्स म्हणजे लाईफ इन्शुरन्स विमा योजनेचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये पॉलिसीधारकाने घेतलेल्या मुदतीमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच कुटुंबियांना आर्थिक संरक्षण म्हणून विमा रक्कम दिली जाते. या पद्धतीच्या योजना पॉलिसीच्या मुदती नंतर (policy term) काहीही परिपक्वता लाभ देत नाहीत. त्यामुळे, या योजना केवळ लाइफ कव्हर देण्यासाठीच डिझाइन केल्या जातात. या योजनांना ‘शुद्ध संरक्षण योजना’ (Pure Protection term Plans) म्हणून ओळखले जाते.

टर्म इन्शुरन्स योजनेचा फायदाच काय आहे?

  1. कमी प्रीमियम, जास्त कव्हरेज: टर्म इन्शुरन्स हा तुलनेने कमी प्रीमियममध्ये जास्त विमा रक्कम प्रदान करतो.
  2. कर सवलत: आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C अंतर्गत भरणाऱ्या प्रीमियम वरती कर सवलत मिळते.
  3. कुटुंबाचे आर्थिक संरक्षण: पॉलिसीधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.
  4. रायडर्ससह सानुकूल योजना: अपघाती मृत्यू लाभ, गंभीर आजार कव्हरेज, अपंगत्व लाभ यांसारखे रायडर्स जोडता येतात.

योग्य विमा रक्कम कशी ठरवावी?

आपल्या जीवनाच्या गरजा आणि कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाच्या आधारावर योग्य विमा रक्कम निवडणे महत्त्वाचे आहे. यासाठी खालील दोन पद्धती वापरता येऊ शकतात.

  1. उत्पन्न बदलण्याची पद्धत (Income Replacement Method): तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10-15 पट विमा रकमेचे उद्दिष्ट ठेवा.
  2. गरज-आधारित पद्धत (Needs-Based Analysis): तुमच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या, कर्ज, भविष्यातील खर्च, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या जीवनशैलीचा खर्च या सर्व बाबींचा विचार करून विमा रक्कम निवडा.

Term Insurance Coverage उदाहरण.

समजा Y, एक पगारदार व्यक्ती असून तिचे मासिक उत्पन्न 1 लाख रुपये आहे. त्याच्याकडे घर, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज, आणि कुटुंबातील भविष्यातील जबाबदाऱ्या आहेत. त्याचा कुटुंबासाठी पुरेसा विमा कव्हरेज ठरवण्यासाठी खालील गणना करूया,

थकबाकी कर्जे: गृहकर्ज: ₹30 लाख, कार कर्ज: ₹10 लाख, वैयक्तिक कर्ज: ₹5 लाख, एकूण कर्जे: ₹45 लाख.

आर्थिक उद्दिष्टांसाठी कॉर्पस: मुलांचे शिक्षण: ₹20 लाख, जोडीदार निवृत्ती निधी: ₹50 लाख, एकूण कॉर्पस: ₹70 लाख.

मासिक घरगुती खर्च: 50,000 * 200 = ₹1 कोटी.

एकूण दायित्वे = ₹45 लाख + ₹70 लाख + ₹1 कोटी = ₹2.15 कोटी.

त्याच्याकडे सध्या उपलब्ध मालमत्ता ₹1 कोटी आहेत, त्यामुळे त्याला किमान ₹1.15 कोटी टर्म लाईफ इन्शुरन्स कव्हरेजची आवश्यकता आहे.

महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  1. महागाईचा विचार करा: कालांतराने महागाईमुळे कव्हरेज कमी होऊ शकते. त्यामुळे, प्रत्येक 3-5 वर्षांनी विमा रक्कम वाढवणे आवश्यक आहे.
  2. कर्ज आणि जोखीम व्यवस्थापन: तुमच्या कर्जाचा विचार करून अतिरिक्त कव्हरेज ठेवा.
  3. रायडर्सचा समावेश: गंभीर आजार, अपघाती मृत्यूसाठी अतिरिक्त रायडर्सचा समावेश करा.
Term Insurance Coverage
Term Insurance Coverage

कोणत्या टर्म प्लॅनची निवड करावी?

तुमच्या गरजेनुसार योग्य टर्म प्लॅन निवडताना खालील गोष्टी लक्षात घ्या:

विमा रकमेची निवड: तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील जबाबदाऱ्या आणि आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन योग्य विमा रक्कम ठरवा.

प्रीमियम पेमेंट टर्म: सिंगल, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरण्याच्या पर्यायांची तुलना करा.

पॉलिसीचा कालावधी: तुमच्या निवृत्तीपर्यंत किंवा तुमच्या कर्जाच्या परतफेडीच्या शेवटच्या तारखेपर्यंत पॉलिसीचा कालावधी निवडा.

रायडर्स: तुमच्या कुटुंबाच्या जोखीम व्यवस्थापनासाठी अपघाती मृत्यू लाभ, गंभीर आजार रायडर निवडा.

LIC Kanyadan Scheme: तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी LIC कन्यादान पॉलिसी सर्वोत्तम का आहे?

निष्कर्ष:Term Insurance Coverage

Term Insurance Coverage विमा योजना म्हणजे शुद्ध संरक्षण प्रदान करणारा जीवन विम्याचा सर्वोत्तम प्रकार आहे. अत्यल्प प्रीमियममध्ये अधिक विमा संरक्षण उपलब्ध करून देणाऱ्या या योजना आपल्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग बनवू शकतात. त्यामुळे, वेळोवेळी तुमच्या गरजा आणि उपलब्ध मालमत्तेचा पुनरावलोकन करून योग्य विमा योजना निवडणे आणि कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्याची हमी देणे ही आजच्या काळाची गरज आहे.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur