LIC Kanyadan Scheme: आपल्या भारत देशामध्ये लग्न हा एक महत्वाचा संस्कार आहे, प्रत्येक पालक आपल्या मुलांची भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. स्वतःच्या मुलांचे शिक्षण, करिअर, मुलीचे लग्न अशी अनेक स्वप्ने पालकांनी पाहिलेले असतात. या मध्ये आपल्या लाडक्या मुलीचे लग्न हा एक संस्कार महत्वाचा मानला जातो. पालकांनी आपल्या मुलीसाठी पाहिलेल्या सर्वात प्रिय स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे तिचे लग्न असते. याच बरोबर आपल्या मुलीचे सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर भविष्य सुनिश्चित करणे, ही अनेक पालकांसाठी सर्वोच्च आणि प्राथमिक गरज असते.
ही गरज समजून घेऊन, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने एक अनोखी योजना सुरु केली आहे, जी LIC कन्यादान पॉलिसी म्हणून ओळखली जाते. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी बचत करण्यास मदत करण्यासाठी आणि पॉलिसीधारकाच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रसंगी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि लाइफ कव्हर देण्यासाठी डिझाइन केली आहे.
या सर्वसमावेशक लेखामध्ये, एलआयसी कन्यादान योजना त्याचे फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता आणि तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी नियोजन करण्यासाठी हि योजना कशी महत्त्वाची असू शकते आणि हि स्कीम पालकांसाठी एक उत्कृष्ट निवड का आहे आणि तुम्ही त्याची क्षमता कशी वाढवू शकता यावर देखील सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि मुलीच्या भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योग्य निर्णय घ्या.

LIC Kanyadan Scheme काय आहे?
LIC कन्यादान पॉलिसी ही LIC द्वारे डिजाइन केलेली एक स्वतंत्र योजना नाही, या योजनेचे नाव आहे ‘LIC जीवन लक्ष्य प्लॅन’ परंतु प्रत्यक्षात मुलीच्या लग्नाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या, काही अतिरिक्त लाभांसह LIC जीवन लक्ष्य योजनेचे हे कॉम्बिनेशन आहे, म्हणजेच हि योजना जीवन लक्ष्य आहे पण याचे फक्त दुसरे नाव कन्यादान स्कीम किंवा कन्यादान योजना असे आहे. या योजनेमध्ये नॉमिनेशन साठी मुलीचे नाव लावणे गरजेचे आहे.
ही LIC Kanyadan Scheme बचत आणि संरक्षण वैशिष्ट्यांसह एक सहभागी, नॉन-लिंक्ड, जीवन विमा पॉलिसी आहे. ही योजना सुनिश्चित करते की पालक त्यांची कन्या लग्नासाठीच्या वयाची होईपर्यंत या योजनेद्वारे पद्धतशीरपणे बचत करू शकतात आणि काही मोठ्या प्रमाणात रक्कम सुरक्षित करून ठेऊ शकतात.
LIC जीवन लक्ष्य योजना सुरु केल्यानंतर, सोबत त्याच विमारकमेवरती टर्म रायडर घेतला पाहिजे. पॉलिसीधारकास नियमितपणे प्रीमियम भरणे गरजेचे आहे. पॉलिसीची मुदत संपल्यावर, जमा झालेल्या बोनससह विमा रक्कम पॉलिसीधारकाला दिली जाते. पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, नॉमिनीला एकरकमी रक्कम त्वरित दिली जाते आणि भविष्यातील सर्व प्रीमियम माफ केले जातात. तिथून पुढे पॉलिसी चालू राहते आणि मुदत संपल्यावर मुदतपूर्ती लाभ दिला जातो.
LIC Kanyadan Yojana प्रमुख वैशिष्ट्ये
पद्धतशीर बचत: एलआयसी कन्यादान पॉलिसी पालकांना ठराविक कालावधीत पद्धतशीरपणे बचत करण्यास मदत करते. भरलेले प्रीमियम पॉलिसीच्या मुदतीमध्ये जमा होतात, ज्यामुळे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी वापरता येईल अशी भरीव मॅच्युरिटी रक्कम मिळते
आर्थिक सुरक्षा: योजनाधारक मुदत कालावधी दरम्यान हयात नसला तरीही हि पॉलिसी त्यांच्या मुलीसाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत, पॉलिसी नॉमिनीला तात्काळ एकरकमी रक्कम प्रदान केली जाते आणि भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ केले जातात. त्यानंतर पॉलिसी पूर्ण रकमेसाठी चालू राहते, आणि मुदत संपल्यावर मॅच्युरिटी रक्कम दिली जाते, त्यामुळे योजनाधारकाच्या मुलीचे भविष्य सुरक्षित असल्याची खात्री मिळते.
दुहेरी लाभ: हि स्कीम बचत आणि संरक्षण असे दोन्ही गोष्टी प्रदान करते.
मॅच्युरिटी बेनिफिट: मॅच्युरिटी वेळी, एकूण विमा रक्कम आणि संपूर्ण वर्षावरील जमा बोनस रक्कम दिली जाते.
मृत्यू लाभ: पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत, एकरकमी रक्कम त्वरित दिली जाते आणि तिथून पुढचे भविष्यातील प्रीमियम माफ केले जातात. त्याच बरोबर विमा रकमेच्या 10% रक्कम नॉमिनीला सर्वायवल बेनिफिट म्हणून, मुदत संपेपर्यंत दिली जाते आणि मुदत संपल्यावर मॅच्युरिटी बेनिफिट सुद्धा दिला जातो.
कर्ज सुविधा: योजना कालावधीमध्ये त्यांच्या आर्थिक गरजेच्या वेळी, पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. हे वैशिष्ट्य पॉलिसी बंद ना आर्थिक गरजेसाठी फायदेशीर होते
प्रीमियम माफी: घेतलेल्या संपूर्ण कालावधी मध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, भविष्यातील सर्व प्रीमियम्स माफ केले जातात आणि पॉलिसी त्याच लाभांसह पुढे चालू राहते.
प्रीमियम पेमेंट पर्याय: हि योजना पॉलिसी प्रीमियम पेमेंटच्या बाबतीत लवचिकता देते. तुमच्या आर्थिक सोयीनुसार तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक प्रीमियम भरणे निवडू शकता.
कर लाभ: LIC कन्यादान पॉलिसी अंतर्गत भरलेले प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत आणि कलम 10(10D) अंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिट रक्कम किंवा डेथ क्लेम रक्कम किंवा सर्वायवल बेनिफिट रक्कम करमुक्त आहे.
एलआयसी कन्यादान पॉलिसीसाठी पात्रता निकष
- पॉलिसी धारकाचे किमान वय: 18 वर्षे
- पॉलिसी धारकाचे कमाल वय: 50 वर्षे
- कमाल परिपक्वता वय: 65 वर्षे
- किमान विमा रक्कम: INR 1 लाख
- कमाल विमा रक्कम: नो लिमिट
- पॉलिसी टर्म: 13 ते 25 वर्षे कालावधी पैके कोणतीही मुदत निवडू शकता.
- प्रीमियम पेमेंट टर्म: आपण निवडलेल्या पॉलिसीच्या मुदतीपेक्षा 3 वर्षे कमी प्रीमियम भरणे आवश्यक आहे. (उदा 25 वर्ष मुदत निवडली असेल तर प्रीमियम 22 वर्षे भरणे)

एलआयसी कन्यादान पॉलिसीचे उदाहरण
एलआयसी कन्यादान पॉलिसी कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू:
पॉलिसीधारकाचे वय: 30 वर्षे, विम्याची रक्कम: INR 15 लाख, पॉलिसी टर्म: 23 वर्षे, प्रीमियम पेमेंट टर्म: 20 वर्षे
या LIC Kanyadan Scheme उदाहरणामध्ये, पॉलिसीधारक ही योजना आपल्या मुलीचे नाव वारस (नॉमिनी) म्हणुन लावेल आणि 20 वर्षांसाठी प्रीमियम भरेल. 23 वर्षांनी पॉलिसी मॅच्युरिटी होईल. पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या पाचव्या वर्षी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला ताबडतोब एकरकमी विमा रक्कम 10 लाख मिळेल आणि भविष्यातील 15 वर्षाचे सर्व प्रीमियम्स माफ केले जातील. पॉलिसी सुरू राहील आणि मुदत संपल्यावर मॅच्युरिटी लाभ दिला जाईल.
म्हणजे, 30 वय असणाऱ्या स्त्री किंवा पुरुष पॉलिसीधारकासाठी, पहिल्या वर्षी प्रीमियम ₹72,524 असेल, दुसऱ्या वर्षी ₹70,963 असेल, हा प्रीमियम एकूण 20 वर्षे कालावधीमध्ये भरायचे आहेत. एकूण ₹14,04,821 रुपये मुद्दल स्वरूपात भरले जातील आणि 23 वर्षांनी योजना संपल्यानंतर मॅच्युरिटी बेनिफिट ₹34,62,000 मिळतील. (या प्लॅन मधील मॅच्युरिटी बेनिफीट आणि बोनस रक्कम साठी सर्क्युलर पहा)
एलआयसी कन्यादान पॉलिसी का निवडावी?
LIC Kanyadan Scheme पॉलिसी विशेषतः तुमच्या मुलीच्या लग्नाच्या आणि उच्च शिक्षणाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेद्वारे हे सुनिश्चित होते कि आपण कालांतराने एक भरीव मोठा निधी तयार करू शकतो आणि आपल्या मुलीसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करू शकतो.
योजनाधारकाच्या अनुपस्थितीतही त्यांच्या मुलीचे भविष्य सुरक्षित आहे याची खात्री करून ही पॉलिसी बचतीसह जीवन संरक्षण प्रदान करते.
LIC ही भारतातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी आहे, तिच्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. एलआयसी पॉलिसीची निवड करणे हे सुनिश्चित करते की तुम्ही विश्वासाने आणि विश्वासार्ह योजनेत गुंतवणूक करत आहात त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीस कोणताही धोका नाही.
एलआयसी कन्यादान पॉलिसी आर्थिक सुरक्षा, पद्धतशीर बचत, कर लाभ आणि पॉलिसीवर कर्ज घेण्याची लवचिकता, सर्वायवल बेनिफिट पर्याय यासह सर्वसमावेशक फायदे देते.

निष्कर्ष
ज्या पालकांना आपल्या मुलीचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे, याची खात्री करायची आहे, त्यांच्यासाठी एलआयसी कन्यादान पॉलिसी ही एक उत्तम निवड आहे. लाइफ कव्हर, बचत आणि मुलीच्या लग्नाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेले अतिरिक्त फायदे यांच्या संयोजनासह, ही पॉलिसी सर्वसमावेशक संरक्षण आणि मनःशांती देते. एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या मुलीची स्वप्ने आणि आकांक्षा सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहात.
LIC Kanyadan Scheme पॉलिसीचे तपशील समजून घेण्यासाठी एलआयसी विमा प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सुनिश्चित करा आणि आपल्या आर्थिक उद्दिष्टे आणि आवश्यकतांना अनुकूल अशी हि योजना निवडा. काळजीपूर्वक नियोजन आणि शिस्तबद्ध बचत करून, एलआयसी कन्यादान पॉलिसी तुमच्या मुलीचे उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे
LIC Kanyadan Scheme पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://licindia.in/lic-s-jeevan-lakshya-plan-no.-933-uin-no.-512n297v02- ला भेट द्या किंवा जवळच्या एलआयसी शाखेला भेट देऊ शकता किंवा तुमच्या LIC विमा प्रतिनिधींशी या योजने बाबत चर्चा करून, योग्य माहिती घ्या आणि हि योजना आपल्या मुलींसाठी आजच खरेदी करा.
Table of Contents