MSRTC NCMC smart card: १ ऑगस्ट पासून महिला आणि जेष्ट नागरिकांसाठी NCMC कार्ड बंधनकारक; एसटी प्रवासातील सवलतीसाठी आवश्यक.

WhatsApp Group Join Now

MSRTC NCMC smart card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिक आणि अमृत जेष्ठ नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने प्रवासी सवलत योजना अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने ही योजना आणली आहे.

१ ऑगस्ट २०२६ पासून NCMC (National Commen Mobility Card) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या ST तिकीट सलतींचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थ्यानी वेळेत हे कार्ड काढणे आवश्यक ठरणार आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सारनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभर या स्मार्ट कार्ड नोंदणी मोहिमेला वेग देण्यात आला असून लाखों नागरिकांना आधीच नोंदणी केली आहे. मात्र अजूनही अनेक लाभयार्थ्याना कार्ड काढलेले नसल्याने त्यांनी १ ऑगस्टपूर्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NCMC स्मार्ट कार्ड का आवश्यक केले आहे?

ST प्रवासात सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची अचूक माहिती उपलब्ध राहावी, सवलतींचा गैरवापर थांबावा आणि संपूर्ण व्यवस्था डिजिटल पद्धतीने कार्यरत व्हावी यासाठी NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली लागू केली जात आहे. अनेकदा बनावट कागदपत्रे किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे सवलतींचा लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.

या पार्श्वभूमीवर सरकारने स्मार्ट कार्ड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डमध्ये प्रवाशांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात नेणदवली जाणार आहे. त्यामुळे तिकीट बुकिंग, ओळख पडताळणी आणि सवलतींचा लाभ देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे.

Also Read:-  Vehicle Insurance Types: तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम इन्शुरन्स प्रकार कोणते आहेत? जाणून घ्या; कव्हर आणि त्याचे फायदे.

याशिवाय भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एकच कार्ड वापरुन विविध सेवा मिळवण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. MSRTC NCMC smart card

महत्वाचे म्हणजे, १ ऑगस्ट २०२६ नंतर महिला, जेष्ट नागरिक आणि अमृत जेष्ट नागरिकांनी ST प्रवासातील सवलतींचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर NCMC स्मार्ट कार्ड कार्यान्वित करणे आवश्यक ठरणार आहे.

कार्ड कोणासाठी गरजेचे आहे?

१ ऑगस्ट २०२६ पासून खालील प्रवर्गातील प्रवाशाना NCMC कार्ड आवश्यक असेल:- MSRTC NCMC smart card

१. महिला प्रवसी, २. जेष्ट नागरिक, ३. अमृत जेष्ट नागरिक.

भविष्यात ही व्यवस्था इतर सवलतधारक प्रवाशांसाठी टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.

राज्यभर सुरू नोंदणी मोहीम

NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला राज्यभर वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी नोंदणी केली असून त्यापैकी जवळपास २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यानी लवकरात लवकर कार्ड मिळवून ते सक्रिय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्मार्ट कार्ड कुठे मिळेल?

राज्यातील विविध एसटी डेपो आई अधिकृत स्मार्ट कार्ड वितरण केंद्रावर NCMC कार्डसाठी नोंदणी करता येते. ग्रामीण आणि शहरी भागातील सुविधा मिळावी यासाठी हजारो वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

आधिक माहितीसाठी पुढील लिंक क्लिक कर – https://msrtc.maharashtra.gov.in

कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, मोबईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, संबंधित सवलतीचा पुरावा

MSRTC NCMC smart card

महाराष्ट्रातील महिला, जेष्ट नागरिक आणि अमृत जेष्ट नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड आता अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. डिजिटल आणि पारदर्शक प्रवास व्यवस्थेकडे टाकलेले हे मोठे पाऊल असून लाभार्थ्यानी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता त्वरित नोंदणी करून कार्ड सक्रिय करावे.

Also Read:-  Post Office Scheme: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना; सुरक्षित गुंतवणुकीतून लाखोंचा फायदा

Table of Contents


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading