UPI without PIN latest update: आता UPI पेमेंट PIN शिवाय! फेस ID आणि फिंगरप्रिंट वापरून होणार, NPCI चे नवे फीचर काय आहे? जाणून घ्या.

UPI without PIN latest update: भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन (NPCI) आता देशातील डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती घडवणारा एक मोठा आणि अत्याधुनिक अपडेट घेऊन येत आहे. यामुळे युजर्ससाठी UPI वापरणं आणखी सोपं आणि सुरक्षित होणार आहे. लवकरच युजर्सना UPI व्यवहार करताना पारंपरिक 4 किंवा 6 अंकी PIN टाकण्याची गरज भासणार नाही, कारण NPCI बायोमेट्रिक तंत्रज्ञानावर आधारित नव्या फीचरसाठी तयारी करत आहे.

या नव्या प्रणालीअंतर्गत, फेस आयडी (Face ID) आणि फिंगरप्रिंट (Fingerprint) सारख्या जैविक ओळख पद्धतींचा वापर करून व्यवहार सत्यापित केला जाईल. याचा अर्थ असा की वापरकर्ते केवळ त्यांच्या चेहऱ्याच्या ओळखीने किंवा अंगठ्याच्या ठशांद्वारे आपला UPI व्यवहार सहजपणे पूर्ण करू शकतील. ही प्रक्रिया केवळ वापरात सोपी नसून, फसवणूक टाळण्यासाठी अधिक सुरक्षित मानली जात आहे.

NPCI च्या या पुढाकारामुळे भारतात डिजिटल पेमेंट इकोसिस्टिममध्ये नवा अध्याय सुरू होणार आहे, आणि लाखो युजर्सना या बदलाचा थेट फायदा होणार आहे. UPI व्यवहार आता अधिक वेगवान, प्रगत आणि यूजर-फ्रेंडली होणार आहेत.

UPI without PIN latest update
UPI without PIN latest update

बायोमेट्रिक पद्धतीने होणार व्यवहार

NPCI सध्या UPI प्लॅटफॉर्मवर मोठा बदल करत आहे. यामुळे वापरकर्ते पारंपरिक PIN टाकण्याऐवजी स्वतःचा चेहरा किंवा बोटांचे ठसे वापरून व्यवहार authenticate करू शकणार आहेत. हे फीचर सध्या चाचणी टप्प्यात असून, लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि इतर नियामक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. UPI without PIN latest update

कशी होणार प्रक्रिया?

या नवीन प्रणालीअंतर्गत, युजरच्या मोबाईल डिव्हाइसवर आधीपासून असलेला बायोमेट्रिक डेटा वापरण्यात येणार आहे. हा डेटा एन्क्रिप्ट केल्यानंतर, एक सुरक्षित कळ (encrypted key) तयार होईल. ही कळ युजरचा बँक खाते असलेल्या बँकेकडे (प्रेषक बँक) पाठवली जाईल आणि तीथे सत्यापन झाल्यावर व्यवहार पूर्ण केला जाईल.

Also Read:-  Singapore covid 19 cases: एशियामध्ये पुन्हा कोविड-19 चा फैलाव; सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्णसंख्या वाढतेय, भारताला धोका आहे का?

OTP आणि PIN पेक्षा जास्त सुरक्षित

उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितलं की, ही प्रणाली पारंपरिक OTP किंवा PIN पेक्षा अधिक सुरक्षित ठरेल. कारण PIN चोरी किंवा फसवणूक होण्याची शक्यता बायोमेट्रिक authentication मध्ये खूपच कमी असते. त्यामुळे यामुळे UPI व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होतील.

2025 च्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये होणार सादरीकरण?

NPCI गेल्या वर्षभरापासून या फीचरवर काम करत आहे. 2025 मध्ये होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये या नव्या फीचरचं सादरीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या NPCI ने या प्रणालीसंदर्भात UPI प्रणालीशी संबंधित बँका आणि अ‍ॅप डेव्हलपर्ससोबत सल्लामसलत सुरु केली आहे.

प्रथम टप्प्यात फक्त Face ID?

NPCI संबंधित एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, सुरुवातीला फक्त फेस आयडीचा वापर करून व्यवहार अधिकृत करण्यावर भर दिला जाणार आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये Face ID फीचर चालू असेल, तर तुम्ही सहजपणे चेहऱ्याच्या ओळखीवरून UPI पेमेंट करू शकणार आहात. UPI without PIN latest update

व्यवहारांना मर्यादा लागू शकते

बायोमेट्रिक आधारित पेमेंट प्रणाली सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काळात NPCI कडून व्यवहार रकमेवर मर्यादा लागू केली जाऊ शकते, म्हणजेच जास्त रक्कम असलेल्या व्यवहारांसाठी कदाचित अतिरिक्त सुरक्षा लागेल. भविष्यात हे फीचर Google Pay, PhonePe, BHIM आणि Paytm सारख्या अ‍ॅप्ससाठी अल्गदरीने किंवा एकत्रीतपणे लागू केलं जाईल का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

UPI without PIN latest update

NPCI चा हा नवीन बायोमेट्रिक फीचर UPI व्यवहारांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतो. PIN किंवा OTP शिवाय चेहरा आणि फिंगरप्रिंटसारख्या जैविक चिन्हांवर आधारित व्यवहार अधिक सुरक्षित आणि वेगवान होतील. यामुळे डिजिटल व्यवहारांचा अनुभव अधिक सोपा, सुरक्षित आणि यूजर फ्रेंडली होईल. तंत्रज्ञान व बँकिंग क्षेत्रातला हा बदल सामान्य ग्राहकांसाठी एक मोठं पाऊल ठरेल.

Also Read:-  Ladki Bahin Yojana Ajit Pawar statement: लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मा. अजित पवारांची महत्त्वाची माहिती, जाणून घ्या

Table of Contents

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now