Whole Life Insurance Plans: आपल्या तरुणपणातील काळ म्हणजे उभारी, उत्साह आणि स्वप्नांच्या पूर्ततेचा काळ, हा काळ संधींनी भरलेला असतो, पण त्याचसोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलण्याचाही असतो. करिअरची सुरुवात, स्वप्नांचा पाठपुरावा आणि स्वतःच्या ओळखीचा शोध घेण्याच्या या टप्प्यात भविष्यातील आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करणे सुद्धा आवश्यक ठरते. या वयातील आनंददायी क्षणांमध्ये, आयुष्यभरासाठी उपयोगी ठरेल अशा योजनांचा विचार करणे कदाचित दूरचे वाटू शकते. मात्र, दीर्घकालीन फायदे आणि सुरक्षिततेसाठी योग्य पायाभूत योजना निवडणे हे तुमच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी निर्णायक ठरते.
व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन (Whole Life Insurance Plans) या योजना केवळ संरक्षणच देत नाही, तर तुमच्यासाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचाही मार्ग दाखवतात. या लेखात आपण व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन संदर्भात सविस्तर आढावा घेणार आहोत आणि हे प्लान तुमच्यासाठी कसे उपयुक्त ठरू शकतात हे समजून घेऊ. त्यासाठी हा लेख वाचा आणि समजून घ्या.
Whole Life Insurance Plans म्हणजे काय?
व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन (Whole Life Insurance Plans) म्हणजे केवळ संरक्षण नव्हे, तर तुमच्या आयुष्यभरासाठी आर्थिक स्थैर्य देणारी योजना आहे. या योजनाच्या माध्यमातून 99 वर्षांपर्यंत संरक्षण दिले जाते, ज्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी मानसिक शांती मिळते. या विमा योजनेत केवळ विमा रक्कम मिळते असे नाही, तर सोबत त्यावरील व्याज दिले जाते किंवा प्रत्येक वर्षी पेन्शन स्वरूपात रक्कम परत केली जाते. या माध्यमातून आपल्या बचतीचा एक घटक तयार होतो.
आपण भरलेल्या हप्त्यांचा काही भाग “कॅश व्हॅल्यू” म्हणून साठवला जातो, ज्याचा उपयोग तुम्ही भविष्यात आकस्मिक आर्थिक गरजांसाठी करू शकता. वयाच्या 65 नंतरही या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळते, त्यामुळे वयोमर्यादा तुमच्या निर्णयात अडथळा ठरत नाही. या रकमेचा वापर कर्जासाठी किंवा इतर आर्थिक गरजांसाठी करता येतो.
व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेण्याचे फायदे
तरुण वयात व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे अफाट आहेत. पहिला फायदा म्हणजे तुम्हाला लहान वयातच दीर्घकालीन विमा सुरक्षा मिळते, जी तुमच्यासाठी व कुटुंबाच्या भविष्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरते.
खात्रीचे संरक्षण (Guaranteed Coverage): व्होल लाईफ इन्शुरन्स योजना आयुष्यभर लाईफ कवच प्रदान करतात. टर्म इन्शुरन्सच्या तुलनेत, या योजना कितीही वयामधील मृत्यूनंतर आपल्या कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य मिळेल याची खात्री देतात.
संपत्ती संचय (Wealth Accumulation): या योजनेत तुमच्या हप्त्यांमधील एक भाग “कॅश व्हॅल्यू” (Cash Value) म्हणून साठवला जातो. वेळोवेळी तुम्ही या रकमेचा उपयोग कर्ज घेण्यासाठी किंवा आकस्मिक होणाऱ्या खर्चासाठी करू शकता.
कमी खर्चात दीर्घकालीन सुरक्षा (Lower Premiums at Early Age): तरुण वयात आयुर्विमा योजना सुरू केल्यास तुमचे हप्ते कमी होतात. लवकर सुरुवात केल्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून दीर्घकालीन फायदा होतो.
अपंगत्व संरक्षण (Disability Safeguards): डिसॅबिलिटी प्रीमियम वेवर सारखे ॲड-ऑन्स रायडर्स निवडल्यास, अपघातानंतरही पॉलिसी सुरू राहते. अशा परिस्थितीत हप्ते न भरताही विम्याचे फायदे मिळवू शकता.
कर फायदे (Tax Benefits): भारतीय कर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, व्होल लाईफ इन्शुरन्स विम्याचे हप्ते कर कपातीसाठी पात्र असतात. शिवाय, मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.
कमी वयात इन्शुरन्स प्लॅन्स सुरु केल्यामुळे हप्त्यांचे दर तुलनेने कमी असतात, जे तुम्हाला दीर्घकाळासाठी खर्चविरहित लाईफ कव्हर देतात. शिवाय, या योजनेत हप्त्यांचा एक भाग साठवून ठेवला जातो, ज्यामुळे तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक स्थिर बचत रक्कम तयार होते.
व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅनचा फायदा वाढवण्यासाठी काही टिप
या विमा योजनेत तुमच्या गरजांनुसार वैकल्पिक फायदे, म्हणजेच रायडर्स, समाविष्ट करता येतात. उदाहरणार्थ, गंभीर आजारासाठीचा रायडर (Critical Illness Rider), अपघाती मृत्यू रायडर (Accidental Death Rider). प्रीमियम माफी (Waiver of Premium) इ. अपघात किंवा आजारामुळे काम करण्यास असमर्थ झाल्यासही विमा योजना सुरू राहते.
गंभीर आजाराचा रायडर (Critical Illness Rider): एखादा गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी मोठ्या खर्चाचा सामना करावा लागतो. अशा वेळी, गंभीर आजार रायडरद्वारे वैद्यकीय खर्च पूर्ण करण्यास मदत होते.
प्रीमियम माफी (Waiver of Premium): जर तुम्हाला अपघात किंवा गंभीर आजार झाला, तर या रायडरमुळे तुम्हाला हप्ते भरण्याची गरज उरत नाही. मात्र, विम्याचे फायदे कायम राहतात.
उत्पन्न फायदे (Income Benefit): काही विमा कंपन्या तुम्हाला योजनेतील फायदे एकदम न देता नियमित वार्षिक उत्पन्नाच्या स्वरूपात देण्याची सोय देतात. यामुळे तुमचे आर्थिक व्यवस्थापन सोपे होते.
अपघाती मृत्यू रायडर (Accidental Death Rider): अचानक घडलेल्या अपघातामुळे कुटुंबावर आर्थिक संकट येऊ शकते. अपघाती मृत्यू रायडरमुळे तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.
या सगळ्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत होते. या रायडर्समुळे तुमचे संरक्षण आणि फायदे अधिक व्यापक होतात.
व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅनचे मुख्य फायदे
फायदे | महत्त्व |
खात्रीशीर संरक्षण | आयुष्यभर लाईफ कव्हर |
संपत्ती संचय | हप्त्यांमधील रक्कम साठवण्याची सोय |
कमी वयात कमी खर्च | कमी हप्त्यांमध्ये अधिक सुरक्षा मिळते |
वैकल्पिक रायडर्सचा समावेश | वैयक्तिक गरजेनुसार फायदे वाढवण्याची सोय |
कर फायदे | कलम 80C/ 10(10)D अंतर्गत कर कपात आणि सूट |
कुठे गुंतवणूक करावी?
व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन निवडताना विश्वासार्ह आणि नामांकित विमा कंपनीची निवड करणे महत्त्वाचे आहे. www.licindia.in कंपनीकडून विमा खरेदी केल्यास तुम्हाला विविध फायदे मिळतात. त्यांच्या www.licindia.in jeevan-utsav1 योजनेत “Pay till 60” सारख्या पर्यायांचा समावेश आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन अधिक प्रभावी करू शकता.
निष्कर्ष: Whole Life Insurance Plans
तरुण वयात आर्थिक नियोजनाला सुरुवात करणे म्हणजे भविष्याच्या सुख-समृद्धीसाठी मजबूत पाया घालणे होय. व्होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला आयुष्यभरासाठी संरक्षण देतात आणि तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्याची हमी मिळते. त्यामुळे, योग्य विमा योजना निवडणे ही तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी सर्वांत महत्त्वाची पायरी आहे. LIC INDIA विमा कंपनीच्या मदतीने, आजच ही पायरी उचला आणि तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी भक्कम आर्थिक पाया तयार करा.