FASTag Annual Pass: केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने खासगी वाहन धारकांना दिलासा देत १५ ऑगस्टपासून एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता खासगी कार किंवा चारचाकी वाहनांसाठी केवळ ३,००० रुपयांचा FASTag Annual Pass पास उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेमुळे वारंवार फास्टटॅग रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही आणि चालकांना टेन्शन फ्री प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
हा पास पूर्णपणे प्रीपेड स्वरूपात उपलब्ध असेल. फक्त एकदाच ३,००० रुपये भरल्यानंतर हा पास १ वर्ष किंवा जास्तीत जास्त २०० टोल प्रवासांपर्यंत वैध असेल. त्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी हा पास अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पास फक्त खासगी वाहनांसाठी आहे. ट्रक, बस किंवा व्यावसायिक वाहनांसाठी हा लागू होणार नाही. हा पास तुम्ही NHAI च्या अधिकृत वेबसाईटवर किंवा “राजमार्ग यात्रा” App द्वारे सहज खरेदी करू शकता. पेमेंट केल्यानंतर जास्तीत जास्त २ तासांच्या आत तुमचा पास एक्टिव्ह होईल.
NHAI ने जाहीर केल्याप्रमाणे हा पास देशभरातील ११४४ टोल नाक्यांवर लागू असेल. महाराष्ट्रातील देखील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा यात समाविष्ट आहेत. ही यादी वेळोवेळी अपडेट केली जाणार असून नवीन टोल नाक्यांचा समावेशही केला जाऊ शकतो. FASTag Annual Pass

यामुळे प्रवास केवळ स्वस्तच नाही तर वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. लांब रांगेत उभे राहण्याची वेळ टळेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
महाराष्ट्रातील कोणत्या टोल नाक्यांवर वार्षिक पास चालणार?
NHAI ने महाराष्ट्रातील वार्षिक ₹3,000 FASTag पास 96 टोल नाक्यांवर लागू केल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे
- चारोटी टोल नाका – पालघर
- खानीवाडे टोल नाका – पालघर
- नांदगाव टोल नाका – अमरावती
- मानसर टोल नाका – नागपूर
- माथनी टोल नाका – नागपूर
- कामटी कन्हान बायपास टोल – नागपूर
- नागपूर बायपास – नागपूर
- बोरखेडी टोल नाका – नागपूर
- गोंदखैरी टोल नाका – नागपूर
- चंपा टोल नाका – नागपूर
- भागिमरी टोल नाका – नागपूर
- हलदगाव टोल नाका – नागपूर
- केलापूर टोल नाका – यवतमाळ
- भांबराजा टोल नाका – यवतमाळ
- सेंदूरवडा टोल नाका – भंडारा
- शिरपूर टोल नाका – धुळे
- सोनगीर टोल नाका – धुळे
- लालिंग टोल नाका – धुळे
- कारंजा टोल नाका – वर्धा
- दरोडा टोल नाका – वर्धा
- हसनापूर टोल नाका – वर्धा
- उद्री टोल नाका – बुलढाणा
- खार्बी टोल नाका – चंद्रपूर
- हतनूर टोल नाका – छत्रपती संभाजीनगर
- करोडी टोल नाका – छत्रपती संभाजीनगर
- तासवडे टोल नाका – सातारा
- आनेवाडी टोल नाका – सातारा
- किणी टोल नाका – कोल्हापूर
- सावळेश्वर टोल नाका – सोलापूर
- वरवडे टोल नाका – सोलापूर
- वालसंग टोल नाका – सोलापूर
- पाटस टोल नाका – पुणे
- सरडेवाडी टोल नाका – पुणे
- खेड शिवापूर टोल नाका – पुणे
- चांदवड टोल नाका – नाशिक
- घोटी टोल नाका – नाशिक
- नाशिक सिन्नर टोल नाका – नाशिक
- बसवंत टोल नाका – नाशिक
- अर्जुनला टोल नाका – ठाणे
- तमालवाडी टोल नाका – धाराशिव
- येडशी टोल नाका – धाराशिव
- पारगाव टोल नाका – धाराशिव
- फुलेवाडी टोल नाका – धाराशिव
- तलमोड टोल नाका – धाराशिव
- पडळशिंगी टोल नाका – बीड
- सेलूआंबा टोल नाका – बीड
- माळीवाडी टोल नाका – जालना
- धोकी टोल नाका – अहिल्यानगर
- धुंबरवाडी टोल नाका – अहिल्यानगर
- बडेवाडी – अहिल्यानगर
- अशिव टोल नाका – लातूर
- नशिराबाद – जळगाव
- ओसरगाव – सिंधुदुर्ग
- नंदानी – सोलापूर-विजापूर
- चाचाडगाव – नाशिक-पेठ
- अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
- बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
- इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
- पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
- डोंगराळे – कुसुंबा ते मालेगाव
- पेनूर – मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस
- पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
- उंडेवाडी – पाटस-बारामती
- बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
- निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा
- पंडणे – सरद-वाणी पिंपळगाव
- बावडा – इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)
- भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
- करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
- निंभी – नांदगाव पेठ-मोरशी
- नांदगाव पेठ – तळेगाव-अमरावती
- कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
- तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)
- तुप्तकळी – आरणी-नायगाव बांधी
- मेडशी-सावरखेडा – अकोला-मेडशी (पॅकेज-१)
- धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
- अष्टा – औसा ते चाकूर
- मालेगाव – चाकूर ते लोहा
- परडी माक्ता – लोहा ते वारंगफटा
- बिजोरा – वारंगा ते महागाव
- खडका – रिंग रोड नागपूर पॅकेज – १
- नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज
- पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
- बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
- करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
- कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
- माळीवाडी-भोकरवाडी – येडशी छत्रपती संभाजीनगर
- नायगाव – मंठा-पातुर
- हिरापूर – गडचिरोली-मूल
- वडगाव – कळंब राळेगाव वडकी
- उमरेड – कळंब राळेगाव वडकी

वार्षिक FASTag पास विषयी अतिरिक्त महत्त्वाची माहिती
माहिती | तपशील |
---|---|
प्रारंभ तारीख | 15 ऑगस्ट 2025 पासून लागू |
वैधता | 1 वर्ष किंवा 200 टोल क्रॉसिंग्स – जे आधी संपेल ते मान्य |
योग्यता | फक्त खासगी (non-commercial) वाहनांसाठी, जसे कार, जीप, व्हॅन |
खरेदीचे माध्यम | Rajmarg Yatra App किंवा NHAI वेबसाइटवरून |
सक्रियता कालावधी | पेमेंटनंतर सुमारे 2 तासात पास सक्रिय; काही प्रकरणांमध्ये 24 तासांपर्यंत लागू शकतो |
मर्यादा आणि फायदा | एका क्रॉसिंगचा खर्च ₹15–₹20 इतका; वार्षिक ₹10,000–₹15,000 पेक्षा खूप कमी |
मर्यादा | हे राज्य महामार्ग किंवा स्थानिक टोल्सवर लागू नाही – फक्त राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि एक्सप्रेसवे (NE) टोल्सवर लागू |
नियम तोडल्यास परिणाम | चुकीच्या वापरामुळे किंवा चेसिस नंबरवर नोंदविलेले FASTag असल्यास पास रद्द होऊ शकतो |
FASTag Annual Pass
महाराष्ट्रातील ₹3,000 FASTag Annual Pass ही योजना वारंवार प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या पासमुळे केवळ टोल भरण्याची प्रक्रिया सोपी होणार नाही, तर वेळ, इंधन आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. NHAI ने जाहीर केलेल्या यादीत सध्या राज्यातील ९६ टोल नाके समाविष्ट असून, आगामी काळात या यादीत आणखी टोल नाक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
ज्यांना नियमितपणे मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, पुणे–सोलापूर, सातारा–कागळ किंवा सूरत–दहिसर मार्ग यांसारख्या महामार्गांवरून प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठी हा पास म्हणजे एक किफायतशीर आणि टेन्शन-फ्री उपाय आहे. त्यामुळे आता टोलवर उभ्या लांबच लांब रांगांना कंटाळण्याची गरज नाही. फक्त एकदाच ₹3,000 भरून वर्षभर मोकळा आणि आरामदायक प्रवास करा.
FASTag Annual Pass: https://www.npci.org.in
Table of Contents