Gram panchayat nidhi details: ग्रामपंचायतीला ‘ग्रामपंचायत निधी’ कुठून मिळतो? गावाच्या विकासासाठी किती पैसे येतात आणि त्याचा हिशेब ऑनलाइन कसा पाहायचा? जाणून घ्या सर्व माहिती.

WhatsApp Group Join Now

Gram panchayat nidhi details: आपल्या गावात कोणतीही नवीन सुधारणा होत असताना, जसे की गल्लीतील नवीन सिमेंट रस्ता झाला, पाण्याची टाकी उभी राहिली, रस्त्याच्या बाजूला एलईडी स्ट्रीट लाईट बसले किंवा अंतर्गत गटारांची कामे सुरू झाली की अनेकांना एकच प्रश्न पडत असतो तो म्हणजे, “या सगळ्या विकासकामांसाठी पैसा नेमका येतो कुठून?” काही जणांना वाटते की ग्रामपंचायतीकडे भरपूर निधी असतो, तर काहींना गावासाठी आलेला निधी नेमका किती आणि तो खर्च कुठे झाला, हेच माहीत नसते.

वस्तुस्थिती पाहता ग्रामपंचायतीला मिळणारा प्रत्येक रुपया हा केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नातून विशिष्ट योजनेअंतर्गत मिळत असतो आणि त्याच्या जमा खर्चाची नोंदही ऑनलाइन उपलब्ध असते. त्यामुळे गावातील कोणत्याही नागरिकाला आपल्या गावात कोणत्या कामासाठी, किती निधी आला, तो कोणत्या कामांसाठी मंजूर झाला आहे आणि हा निधी प्रत्यक्षात कुठे खर्च झाला, हे सहज तपासता येते.

या लेखामध्ये आपणास ग्रामपंचायतिला मिळणाऱ्या निधीचे सर्व प्रमुख स्रोत, निधीचा वापर आणि गावातील विकासकामांचा संपूर्ण आर्थिक हिशोब ऑनलाइन कसा पाहायचा, याची सविस्तर माहिती मिळेल त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतराना शेयर करा.  

ग्रामपंचायतीला निधी कोणकोणत्या स्रोतांतून मिळतो?

महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतींना मुख्यतः तीन प्रमुख स्रोतांतून निधी उपलब्ध होतो.

  • केंद्र सरकार
  • राज्य सरकार
  • ग्रामपंचायतीचे गाव हद्दीतील स्वतःचे उत्पन्न

Gram panchayat nidhi details चला प्रत्येक स्रोताबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

१. केंद्र सरकारकडून मिळणारा निधी

भारतातील प्रत्येक गावांच्या विकासासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देते. यामध्ये १५ वा वित्त आयोग (15th Finance Commission) हा सर्वात महत्त्वाचा निधी मानला जातो. केंद्र सरकारकडून हा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा केला जातो. Gram panchayat nidhi details

टाईड निधी (Tied Grant) – ६०%: या निधीचा वापर फक्त ठरवून दिलेल्या विकासकामांसाठीच करता येतो. यामध्ये प्रामुख्याने गावातील खालील कामांचा समावेश होतो.

  • पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • स्वच्छता मोहिमा
  • हागणदारीमुक्त गाव
  • सांडपाणी व्यवस्थापन
  • घनकचरा व्यवस्थापन

या निधीचा इतर कामांसाठी वापर करता येत नाही.

अनटाईड निधी (Untied Grant) – ४०%: अनटाईड निधीमध्ये ग्रामपंचायतीला अधिक स्वातंत्र्य मिळते. गावाच्या अंतर्गत गरजेनुसार हा निधी खालील कामांसाठी वापरला जाऊ शकतो.

  • अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण
  • स्ट्रीट लाईट बसविणे
  • स्मशानभूमी विकास
  • सार्वजनिक ठिकाणांची दुरुस्ती
  • इतर स्थानिक विकासकामे
Also Read:-  MJPSKY Loan Waiver Scheme: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी; हि आहे योजना; जाणून घ्या सर्व माहिती.

२. राज्य सरकारकडून मिळणारा निधी

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारदेखील ग्रामपंचायतींना विविध योजनांद्वारे आर्थिक मदत देते.

राज्य वित्त आयोग निधी: यामध्ये राज्य सरकारच्या महसुलातील काही हिस्सा ग्रामपंचायतींना दिला जातो. हा निधी गावातील मुख्यतः खालील बाबींवर आधारित असतो.

  • गावाची लोकसंख्या
  • ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ
  • इतर प्रशासकीय निकष

जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधी: राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकास आराखड्यानुसार गावांना हा निधी मंजूर केला जातो. या निधीतून पुढील कामे केली जातात.

  • शाळांची दुरुस्ती
  • अंगणवाड्या दुरुस्ती
  • अंतर्गत रस्ते
  • सार्वजनिक सुविधा
  • ग्रामविकासाची इतर कामे

आमदार आणि खासदार स्थानिक विकास निधी: स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देतात. या निधीतून अनेक गावांमध्ये पुढील कामे केली जातात.

  • सभागृह
  • व्यायामशाळा
  • सिमेंट रस्ते
  • पाणीपुरवठा योजना
  • सामाजिक सुविधा

विविध शासकीय योजनांमधून मिळणारा निधी

मनरेगा (MGNREGA): केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. यातून पुढील कामे केली जातात.

  • शेततळे
  • विहिरी
  • वृक्षारोपण
  • जलसंधारण
  • गोठे
  • मृद व जलसंवर्धन

जल जीवन मिशन: प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी या योजनेअंतर्गत मोठा निधी दिला जातो.

३. ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न

सरकार कडून मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त ग्रामपंचायत स्वतःही महसूल गोळा करते. याला ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्न (Own Source Revenue) असे म्हणतात. यामध्ये पुढील उत्पन्नाचा समावेश होतो. Gram panchayat nidhi details

  • घरपट्टी (मालमत्ता कर)
  • पाणीपट्टी
  • दिवाबत्ती कर
  • आठवडे बाजार शुल्क
  • जत्रेतील शुल्क
  • दुकाने व गाळ्यांचे भाडे
  • व्यावसायिक जागांचे भाडे
  • इतर स्थानिक कर व शुल्क

हे उत्पन्न गावातील लहान-मोठ्या विकासकामांसाठी उपयोगी पडते.

ग्रामपंचायतीच्या निधीतून कोणती कामे केली जातात?

ग्रामपंचायतीला मिळालेल्या स्वनिधीतून अनेक मूलभूत सुविधा विकसित केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने पुढील कामांचा समावेश असतो. Gram panchayat nidhi details

  • सिमेंट रस्ते
  • गटारे
  • पिण्याचे पाणी
  • स्ट्रीट लाईट
  • स्वच्छता
  • सार्वजनिक शौचालय
  • शाळा दुरुस्ती
  • अंगणवाडी विकास
  • स्मशानभूमी विकास
  • पावसाचे पाणी व्यवस्थापन
  • घनकचरा व्यवस्थापन
  • सार्वजनिक सभागृह

तुमच्या गावाला किती निधी मिळाला हे ऑनलाइन कसे पाहाल?

आज प्रत्येक नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशेब ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी केंद्र सरकारचे eGramSwaraj पोर्टल आणि मोबाईल ॲप वापरता येते.

Gram panchayat nidhi details eGramSwaraj पोर्टल लिंक: https://egramswaraj.gov.in

Also Read:-  Laxmi mukti yojana: राज्यातील ३१ लाखांहून अधिक भगिनींना मिळणार मातीचा खरा हक्क; लक्ष्मीमुक्ती योजनेने उजळनार घरदार.

Gram panchayat nidhi details eGramSwaraj मोबाईल ॲप लिंक: https://egramswaraj.gov.in

माहिती पाहण्याची प्रक्रिया

स्टेप १: eGramSwaraj पोर्टलला भेट द्या.

स्टेप २: Planning & Accounting किंवा Audit Report हा पर्याय निवडा.

स्टेप ३: खालील माहिती निवडा.

  • राज्य: महाराष्ट्र
  • जिल्हा निवडा
  • पंचायत समिती निवडा
  • ग्रामपंचायत निवडा

स्टेप ४: आर्थिक वर्ष निवडा.

यानंतर तुम्हाला पुढील माहिती पाहता येईल.

  • मंजूर निधी (Approved Outlay)
  • खर्चाचा तपशील (Financial Progress Report)
  • मंजूर विकासकामे
  • सुरू असलेली कामे
  • पूर्ण झालेली कामे
  • ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशेब

यामुळे नागरिकांना गावातील निधीचा वापर किती पारदर्शकपणे झाला आहे, याची माहिती सहज मिळू शकते.

ग्रामपंचायतीच्या निधीची माहिती जाणून घेणे का महत्त्वाचे?

ग्रामपंचायतीस मिळणारा निधी हा गावाच्या विकासाचा पाया आहे. नागरिकांनी या निधीबाबत माहिती ठेवली तर विकासकामांमध्ये पारदर्शकता वाढते आणि सार्वजनिक पैशांचा योग्य वापर होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवता येते.

या ऑनलाइन उपलब्ध असलेल्या आर्थिक अहवालांमुळे कोणत्या योजनेतून किती निधी आला, कोणत्या कामावर किती खर्च झाला आणि कोणती कामे प्रलंबित आहेत, याची माहिती प्रत्येक नागरिक घरबसल्या पाहू शकतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्तरदायित्व वाढण्यासही मदत होते.

Gram panchayat nidhi details

ग्रामपंचायतीला मिळणारा निधी हा केवळ सरकारकडून येणाऱ्या पैशांपुरता मर्यादित नसून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या विविध स्रोतांचा एकत्रित परिणाम असतो. या निधीच्या मदतीने गावातील मूलभूत सुविधा विकसित केल्या जातात आणि ग्रामीण विकासाला गती मिळते.

नागरिकांनीही eGramSwaraj पोर्टलचा वापर करून आपल्या गावातील निधी, मंजूर कामे आणि खर्चाचा तपशील वेळोवेळी तपासल्यास ग्रामविकास अधिक पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत होईल. 

Leave a Comment