IBPS EXAM 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे 2024 वर्षासाठी, सहभागी बँकांमधील लिपिक (क्लार्क) संवर्गातील पदांसाठी कर्मचारी निवड आणि आगामी भरती प्रक्रियेसाठी (सीआरपी लिपिक XIV) ऑनलाइन परीक्षा (प्राथमिक आणि मुख्य) आयोजित केली आहे, वेळापत्रक खाली दिले आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन भरू शकतात. परीक्षा प्रक्रिया आणि निवड अटी, पात्रता या सर्वांची माहिती या लेखामध्ये दिली आहे.
ही परीक्षा ऑनलाइन दोन टप्प्यात प्रिलिमिनरी आणि मेन्स घेतली जाईल. ऑनलाइन प्रिलिमिनरी परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन मुख्य परीक्षेला बसावे लागेल.
IBPS EXAM 2024: ऑनलाईन अर्ज
ऑनलाइन अर्ज नोंदणी : 01/07/2024 ते 21/07/2024
अर्जाचे शुल्क भरणे : 01/07/2024 ते 21/07/2024
पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन (PET) : 12.08.2024 ते 17.08.2024
ऑनलाइन प्रिलिमिनरी परीक्षेसाठी कॉल लेटर्स डाउनलोड करणे – ऑगस्ट, 2024
ऑनलाइन प्रिलिमिनरी परीक्षा – ऑगस्ट, 2024
ऑनलाइन प्रिलिमीनरी परीक्षेचा निकाल – सप्टेंबर, 2024
ऑनलाइन मेन्स परीक्षेसाठी कॉल लेटर्स डाउनलोड करणे – सप्टेंबर, ऑक्टोबर 2024
ऑनलाइन मेन्स परीक्षा – ऑक्टोबर, 2024
प्रोव्हिजनल अलॉटमेंट – एप्रिल, 2025
ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी लिंक
https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24
CRP CLERK-XIV: वय
01.07.2024 रोजी : किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे,
उमेदवाराचा जन्म 02/07/1996 नंतर झालेला असावा आणि 01/07/2004 च्या पूर्वी झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता
सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी, भारतातील किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता. उमेदवाराकडे वैध मार्कशीट/पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
अर्ज फी/सूचना शुल्क 01/07/2024 ते 21/07/2024 पर्यंत ऑनलाइन पेमेंट भरणेसाठी, खालीलप्रमाणे असेल.
SC/ST/PwBD/ESM/DESM उमेदवारांसाठी रु. 175/- (GST सह).
इतर सर्वांसाठी, रु. 850/- (जीएसटीसह)
परीक्षेची रचना
ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या परीक्षांची रचना खालीलप्रमाणे आहे.
सविस्तर माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करा
https://www.ibps.in/wp-content/uploads/CRP_Clerks_XIV_Final_Notification_28.6.24.pdf
Table of Contents