Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र होमगार्ड ९७०० जागांसाठी महाभारती, असा करा अर्ज!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र राज्यातील किमान शैक्षणिक पात्रता असलेले तरुण, तरुणी अनेक दिवसांपासून होमगार्ड भरती २०२४ ची वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण महाराष्ट्र गृह संरक्षण विभागाने होम गार्ड भरतीची अधिकृत घोषणा दि ०९/०७/२०२४ रोजी केली असून, लवकरच त्याची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

तुम्हाला या लेखात होमगार्ड भरती २०२४ बद्दलची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जसे कि अर्ज कसा करायचा, वयाची अट, वेतनश्रेणी, भरतीची प्रक्रिया, पात्रता, आवश्यक कागदपत्रे काय आहेत. सविस्तर माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि गरजू उमेदवारांच्यापर्यंत पोचवा, शेअर करा.

देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकि तसेच आपत्कालीन मदत कार्यामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्त्वावर आधारित आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी करणे अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व तीन वर्षाकरिता दिले जाते. आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षाच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षापर्यंत पुनरनोंदणी करता येते.

Homeguard Bharti 2024: अधिसूचना

महाराष्ट्र राज्य गृह संरक्षण विभागाद्वारे चालू वर्ष २०२४ साठी गृहरक्षक भरती लवकरच म्हणजे १६/०८/२०२४ पासून आयोजित केली आहे. होमगार्ड भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असेल. महाराष्ट्रातील ३४ जिल्यांमध्ये एकूण ९७०० होमगार्ड भरती संख्या आहे. हि भरती प्रत्येक जिल्हानिहाय जिल्हा पोलीस मुख्यालय मार्फत केली जाईल. होमगार्ड भरती २०२४ चे मुख्य तपशील खाली दिले आहेत, इच्छुक उमेदवारांनी ते जरूर वाचून आपला अर्ज सादर करावा.

महाराष्ट्र होमगार्ड भरती: फायदे

सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण, तीन वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सदस्यांना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दल, यासारख्या विभागामध्ये भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी आहे. स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी संभाळत देश सेवा करण्याची संधी दिली गेली आहे.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 पात्रता निकष

Homeguard Bharti 2024: होमगार्ड भरती मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी प्रामुख्याने दोन प्रकारच्या पात्रता अटी निर्धारित केल्या आहेत, जसे की उमेदवाराची वयोमर्यादा आणि उमेदवाराची शैक्षणिक पात्रता. या दोन्हीचे सर्वसाधारण वर्णन खालीलप्रमाणे आहे

  • उमेदवार: १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा: किमान वय २० वर्षे कमाल वय ५० वर्षे असावे.
  • उंची: पुरुषांकरिता १६२ से.मी. महिलांकरिता १५० से. मी.
  • छाती: फक्त पुरुषांकरिता न फुगवता ७६ से. मी.(कमीत कमी ५ से. मी. छाती फुगवणे आवश्यक आहे)

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 निवड प्रक्रिया

Homeguard Bharti 2024 साठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना मुख्यतः गृह संरक्षण विभागाने विहित केलेल्या लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी इ. या पाच प्रकारच्या निवड प्रक्रियेतून जावे लागेल.

Homeguard Bharti 2024
Homeguard Bharti 2024: शाररिक क्षमता
Homeguard Bharti 2024
Homeguard Bharti 2024: शाररिक क्षमता
Homeguard Bharti 2024
Homeguard Bharti 2024: शाररिक क्षमता
Homeguard Bharti 2024
Homeguard Bharti 2024: तांत्रिक क्षमता

महाराष्ट्र होमगार्ड भरती: आवश्यक कागदपत्रे

Homeguard Bharti 2024 भरती साठी, ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. आधार कार्ड,
  2. मतदान कार्ड,
  3. १०वी/१२वी मूळ गुणपत्रिका,
  4. शाळा सोडलेचा दाखला झेरॉक्स प्रत,
  5. रहिवासी प्रमाणपत्र,
  6. तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास प्रमाणपत्र,
  7. खाजगी नोकरीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र,
  8. ३ महिन्याच्या आतले पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र,
  9. बँक पास बुक,
  10. ई-मेल, मोबाइल नंबर, इ.

महाराष्ट्र होमगार्ड: देय भत्ते

होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिली जात नाहीत. पोलिसांच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य करणे, आपत्कारीन परिस्थितीमध्ये, तसेच रोगराई, महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत कार्य करणे, या पद्धतीची कर्तव्य दिली जातात

होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन ५७० रुपये कर्तव्य भत्ता व १०० रुपये उपहार भत्ता दिला जातो, तसेच प्रशिक्षण काळात ३५ रुपये खिसा भत्ता व १०० रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी ९० रुपये कवायत भत्ता दिला जातो.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024: साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र होमगार्ड भरती २०२४ साठी ऑनलाइन अर्ज दि. १६/०८/२०२४ पासून सुरु होतील. इच्छुक उमेदवारांनी पुढील सांगितलेल्या पद्धतीने आपला अर्ज ऑनलाइन भरायचा आहे, प्रथम अधिसूचना काळजीपूर्वक वाचा आणि मगच ऑनलाइन अर्ज करा.

प्रथम महाराष्ट्र होमगार्ड भरती विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php ला भेट द्या. तुम्हाला भरती अर्ज पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा. उमेदवारास त्याचा वैयक्तिक तपशील अर्जामध्ये भरावा लागेल. उमेदवाराने छायाचित्रांसह विभागाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उपलोड करणे गरजेचे आहे. त्यानंतर उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवाराने त्याच्या/तिच्या अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.

होमगार्ड नोंदणी करिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळणे करिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब केला जात नाही, याकरिता कोणीही लाच/ पैशाची मागणी केल्यास, अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध कार्यालय किंवा माननीय जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांचे शी संपर्क करा.

अंतिम गुणवत्ता यादी या https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur