LIC Amritbaal Yojana: 5699 रु. प्रतिमहिना 7 वर्षे भरा आणि 8% वार्षिक दराने 25 व्या वर्षी घ्या 15,00,000/- रु

LIC Amritbaal Yojana : आपली मुले जन्माला आल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची चिंता आपल्याला कायमच लागून राहते. अशा परिस्थितीत अनेक पालक आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या जन्मापासूनच काही पैसे वाचू लागतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बहुतेक पालक हे बचतीचे पैसे फक्त बँकेत ठेवतात जिथून त्यांना चांगला परतावा मिळत नाही किंवा ती रक्कम काही काळानंतर काढूनही घेतली जाते.

आज ज्या वेगाने महागाई वाढत आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या बचतीवर तेवढा परतावा मिळत नाही. आज आपण एलआयसीच्या एका अतिशय अद्भुत योजनेबद्दल चर्चा करणार आहोत, जिथे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळेल. एलआयसी मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक छान योजना 17 फेब्रुवारी 2024 पासून चालवत आहेत. या योजनेचे नाव आहे ‘अमृत बल योजना’ तर ही योजना आपण सविस्तर जाणून घेऊया.

आपल्या सर्वांची लाडकी आयुर्विमा संस्था ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ म्हणजेच ‘लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एलआयसीने काही दिवसापूर्वी सुरू केलेल्या योजनेचे नाव आहे (LIC’s Amritbaal Plan) अमृत बाल योजना, या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे पुढील प्रमाणे आहेत. 

Amritbaal Yojana
Amritbaal Yojana

एलआयसीची ही Amritbaal Yojana योजना नॉन लिंक, नॉन पार्टिसिपेट, वैयक्तिक बचत, जीवन विमा योजना आहे. एलआयसीच्या योजनेमध्ये पालक त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेमध्ये तुम्हाला सिंगल प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम या दोन पर्यायांपैकी एक विमा रक्कम निवडायची आहे. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही त्याची निवड करावी.

LIC Amritbaal Yojana लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या आयुर्विमा संस्थेने लहान मुलांच्या भविष्यातील शिक्षण, करियर आणि लग्न अशा गोष्टींचे फायनान्शिअल प्लॅनिंग करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

LIC Amritbaal Yojana कोणासाठी आहे?

एल. आय. सी. ची Amritbaal Yojana ही योजना आई किंवा वडील, आपल्या शून्य ते तेरा वर्षांच्या मुला, मुलींसाठी घेऊ शकतात. या योजनेची मुदत अठरा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत आहे. अमृतबाल योजना ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची एक अतिशय सुंदर अशी योजना आहे आणि ही योजना मुलांसाठी बनवलेली आहे. या योजनेमध्ये पॉलिसी घेताना चे वय किमान तीस दिवस आणि कमाल वय तेरा वर्षे हवे आहे.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे, आपणास प्रती हजारी रुपये 80 चा गॅरेंटेड बोनस दरवर्षीप्रमाणे मिळणार आहे. मॅच्युरिटी चे वय 18 पासून ते पंचवीस वर्षे यापैकी कोणतीही एक निवडायची आहे. या पॉलिसीमध्ये पालकांना पॉलिसीमध्ये प्रीमियम माफीचा म्हणजेच पीडब्ल्यूबी चा सुद्धा लाभ मिळू शकतो. पालकांच्या मृत्यूनंतर प्रीमियम माफ केला जातो हाच तो पीडब्ल्यूबी बेनिफिट. 

मुदतपूर्तीच्या वेळेस बेसिक विमा रक्कम सह गॅरेंटेड बोनस दिला जाईल. अमृत बाल योजनेत सरेंडर आणि कर्जाची सुविधा सुद्धा दिली आहे. ही योजना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी वरदान आहे. तुमच्या मुलांच्या जीवनाचा वेग सतत प्रगती कडे वळला पाहिजे म्हणून आम्ही या लेखाच्याद्वारे या योजनेची तुम्हाला ही माहिती देत आहोत.

Amritbaal Yojana
Amritbaal Yojana

पैसे कसे व किती गुंतवावे लागतील?

या योजनेअंतर्गत आपण प्रत्येक महिन्याला 5699/- ही रक्कम एलआयसी च्या अमृत बाल या योजनेमध्ये ठेवायची आहे. ही रक्कम आपण स्वतः भरली तरी चालेल किंवा आपण दिलेल्या बँक अकाउंट मधून प्रत्येक महिन्याला वजा होत राहील.

Also Read:-  Ladki Bahin Yojana May Installment Update: लाडक्या बहिणींचा मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? मा. अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती!

मिळणारा फायदा कसा असेल?

या Amritbaal Yojana योजनेच्या अंतर्गत विमा धारकास म्हणजे आपल्या पाल्यास विमा रकमेच्या 8% वार्षिक दराने ने फिक्स व्याज मिळणार आहे. हे व्याज कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलले जाणार नाही.

तुमचा पाल्य आत्ता एक वर्षाचा आहे असं गृहीत धरून आजपासून 25 वर्षापर्यंत ची ही योजना घेतली आहे. अशा या उदा. मध्ये मिळणारी रक्कम ही पुढील प्रमाणे असेल. ही रक्कम आत्ता आपल्या पाल्याचं असणार वय व आपण 18 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत घेत असणारी मुदत यावरती अवलंबून असेल.

उदा. तुम्ही जर पाच लाख ही विमारक्कम घेतली आणि त्याची मुदत 25 वर्षे घेतलीत तर तुम्हाला 5699 रू प्रत्येक महिन्याला भरावे लागतील. म्हणजेच एकूण 7 वर्षे प्रीमियम भरावयाचा आहे. या योजनेमध्ये विमा रकमेच्या 8% बरोबर 40,000/- रु. प्रत्येक वर्षी तुम्हाला व्याज मिळेल व हे व्याज आपल्याच खात्यावरती जमा होत राहील. म्हणजेच 40,000×25 (वर्षे)= 10,00,000/- ही 8% वार्षिक व्याजाची एकूण 25 वर्षांमध्ये जमा होणारी रक्कम असेल. ही रक्कम आपणांस सर्वात शेवटी म्हणजेच या योजनेची आपण घेतलेली मुदत संपल्यानंतर मिळेल व त्याचबरोबर आपली विमा रक्कम 5,00,000/- रुपये परत मिळतील म्हणजे एकूण आपल्याला 15,00,000/- रु मॅच्युरिटी स्वरूपात परत मिळतील.

Amritbaal Yojana
Amritbaal Yojana

अमृत बल योजना घेण्यासाठी कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे

ही Amritbaal Yojana विमा पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज लागेल ते पुढील प्रमाणे.

  • अर्जदार आणि मुलगा किंवा मुलगी यांचे आधार कार्ड
  • वडिलांचे किंवा आईचे पॅन कार्ड
  • मुलग्याचे किंवा मुलीचे पॅन कार्ड (जर असेल)
  • बँक खाते पासबुक किंवा कॅन्सल चेक
  • चालू मोबाईल नंबर, चालू ई-मेल आयडी.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी

सर्व कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला ही योजना घेण्यासाठी करावी लागेल

या योजनेतील इतर फायदे काय आहेत?

  • या योजने अंतर्गत आपण घेत असलेल्या मुदती मध्ये 5,00,000/- रुपयांचे विमा संरक्षण असेल.
  • त्याचबरोबर आपण भरत असलेल्या आयुर्विमा पॉलिसीच्या प्रीमियमला भारत सरकारच्या आयकर विभागाकडून 80C अंतर्गत इन्कम टॅक्स साठी सुट मिळेल.
  • ही योजना संपल्यानंतर आपणास मिळणार्‍या विमा रक्कम वरती 10(10D) अंतर्गत कोणत्याही पद्धतीचा टॅक्स नसेल.
  • आपल्याला काही कारणासाठी कर्ज पाहिजे असेल तर या योजनेमध्ये 3 वर्षानंतर कर्ज मिळू शकते.
  • अतिरिक्त प्रीमियम भरून पीडब्ल्यूडी उपलब्ध आहे.
  • एका आर्थिक वर्षामध्ये बॅक डेटिंग ही करता येते.
  • पॉलिसी धारकाकडून काही कारणास्तव ही पॉलिसी बंद झाली तर पाच वर्षाच्या आत सर्व प्रीमियम भरून पुन्हा चालू करण्याची सुद्धा सोय आहे.
  • मॅच्युरिटी रक्कम आपल्याला जर, हप्त्यामध्ये पाहिजे असेल तर, मॅच्युरिटी सेटलमेंट ऑप्शन सुद्धा आहे. यामध्ये आपण पाच वर्षे, दहा वर्षे किंवा पुढची पंधरा वर्षे मॅच्युरिटी रक्कम टप्प्यामध्ये घेऊ शकतो.
  • या योजनेअंतर्गत जोखीम एक तर पॉलिसी घेतल्याच्या दोन वर्षांपासून किंवा आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुरू होईल.
Amritbaal Yojana
Amritbaal Yojana

अमृत बल योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

Amritbaal Yojana संपूर्ण पॉलिसी मुदतपूर्तीमध्ये गॅरेंटेड एडिशन 80 रुपये प्रति हजार बेसिक विमा रकतेनुसार नुसार मिळतील. तुमच्या गरजेनुसार मुलांसाठी जीवन विमा संरक्षण निवडण्याचा पर्याय, सिंगल प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट मधून निवडण्यासाठी लवचिकता, तुमच्या मुलांच्या विविध गरजांसाठी वय वर्ष 18 ते वय वर्षे 25 पर्यंत कोणतीही परिपक्वता म्हणजेच मुदतपूर्ती मुदत तुम्ही घेऊ शकता. हप्त्यांमध्ये लाभाची रक्कम, अतिरिक्त प्रीमियम भरल्यास बेनिफिट रायडर्सह ही योजना तुम्ही घेऊ शकता, आकर्षक उच्च विमा रक्कम रिबेटचा लाभ, कर्ज सुविधा द्वारे आपल्या छोट्या किंवा मोठ्या गरजांची सुद्धा परिपुर्तता इथे होऊ शकते.

Also Read:-  LIC Jeevan Umang Plan Details: वाट बघू नका रिटायरमेंटची, आजच तरतूद करा पेन्शनची; जाणून घ्या 8% दराने आयुष्य भर पेन्शन कशी मिळेल?

Amritbaal Yojana च्या अधिक माहितीसाठी कृपया www.licindia.in भेट द्या किंवा जवळच्या आयुर्विमा प्रतिनिधी किंवा LIC शाखा कार्यालयाला भेट देउन ही योजना घेऊ शकता.

LIC Amritbaal Yojana

या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला या Amritbaal Yojana योजनेबद्दल सर्व माहिती तपशीलवार देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपण ही योजना खरेदी करून तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख खूप आवडला असेल.

Contact us
WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now