LIC Assistant Recruitment 2024: 7000 हून अधिक रिक्त पदे जाहीर… पात्रता आणि अर्ज कसा करायचा ते पहा

LIC Assistant Recruitment 2024: LIC OF INDIA मध्ये नोकरीची संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांना एक चांगली बातमी आली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आपल्या विवध कार्यालयामध्ये कॅशियर, सिंगल विंडो ऑपरेटर, ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट यासारख्या प्रशासकीय पदांसाठी अर्ज मागवत आहे. LIC Assistant Recruitment 2024 भरतीसाठी अधिसूचना जारी करण्याच्या तयारीत आहे. या लेखा मध्ये या संदर्भात सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कृपया हा लेख सविस्तर वाचा.

LIC मध्ये भरली जाणारी हि विविध पदे केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येतात. या पदांसाठी पात्रता निकष समजून घेण्यासाठी आणि वेळेत अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार जावे. निवड झालेल्या उमेदवारांना किमान 58,000/-रु महिना पगार दिला जाईल.

LIC Assistant Recruitment 2024: पात्रता निकष

इच्छुक उमेदवाराची शैक्षणिक किमान पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे, किमान वय 18 आणि कमल वय 40 असले पाहिजे तथापि अनुसूचित जाती/जमातीसाठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष आणि इतर राखीव प्रवर्गासाठी वयात सूट दिली जाईल.

निवड प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे समाविष्ट आहेत:

प्रास्ताविक मूल्यमापन: पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षा आहे ज्यामध्ये तर्क क्षमता, परिमाणात्मक योग्यता प्रश्न आणि इंग्रजी भाषेचा समावेश असलेले वस्तुनिष्ठ-प्रकारचे प्रश्न आहेत.

मुख्य परीक्षा: जे उमेदवार सर्व प्रास्ताविक मुल्यांकन उत्तीर्ण झाले आहेत त्यांना या व्हर्च्युअल मुख्य परीक्षेत नेले जाईल. या मुख्य परीक्षा पद्धतींमध्ये तर्क, परिमाणात्मक अभियोग्यता, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषा, चालू घडामोडी आणि संगणक ज्ञान हे आहेत.

Also Read:-  Benefits of Eating Garlic Empty Stomach: रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण आणि मधाचे सेवन करा, आरोग्य ठेवा निरोगी आणि फीट!

वैद्यकीय परीक्षा आणि दस्तऐवज प्रमाणीकरण प्रक्रिया: मुख्य परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दस्तऐवज प्रमाणीकरण प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासणीसाठी आमंत्रित केले जाते

एलआयसी सहाय्यक भरती 2024 अर्ज प्रक्रिया

तुम्ही खालील चरणांचे अनुसरण करून ऑनलाइन अर्ज करू शकता त्यासाठी LIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  1. मुख्यपृष्ठावर “करिअर” किंवा “भरती” विभागात नेव्हिगेट करा.
  2. LIC सहाय्यक भरती 2024 साठी प्रसिद्ध झालेली जाहिरात किंवा अधिसूचना शोधा.
  3. पात्रता निकष आणि सूचना काळजीपूर्वक वाचा.
  4. “आता अर्ज करा” किंवा “ऑनलाइन अर्ज” लिंकवर क्लिक करा.
  5. अचूक तपशीलांसह अर्ज योग्यरित्या भरा.
  6. अपलोड करण्यासाठी शैक्षणिक गुणपत्रिका, फोटो आणि स्वाक्षरी आणि इतर संबंधित प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.
  7. अर्जाचे पुनरावलोकन करा.
  8. अंतिम तारखेपूर्वी अर्ज सबमिट करा.
  9. अर्जाचा नमुना,भविष्यातील संदर्भ प्रक्रियेसाठी सबमिट केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी घ्या.

अधिक महिला कृपया या लिंक ला क्लिक करा https://licindia.in/web/guest/careers

Contact us
WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now
Also Read:-  LIC Plans: स्वप्न योजना 16 वर्षे हप्ते भरा आणि 31,50,000/- रु. घ्या, संपूर्ण माहिती इथे पहा.