LIC Jeevan Shanti Plan: एकदाच भरा 11 लाख आणि आयुष्यभरासाठी पेन्शन घ्या रु. 1 लाख, संपूर्ण माहिती इथे पहा.

LIC Jeevan Shanti Plan: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ म्हणजे त्याचे उतारवय, या उतारवायामध्ये आपणास बऱ्याच गोष्टीची गरज भासत असते. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे पैसा. पण बऱ्याच वेळा याच उतारवयातले आर्थिक नियोजन करायचा राहून जाते. पुन्हा एकदा आपल्या मुलांच्या वरती अवलंबून राहावे लागते. उतारवयातील अशी दुःखाची वेळ येऊच नये यासाठी आपल्या तरुण पनापासूनच याचे आर्थिक नियोजन करायला हवे.

उतारवयातील याच गोष्टींचा विचार करून आम्ही तुम्हाला एका पेन्शन योजनेविषयी सांगणार आहोत, हि योजना तुमच्या फायद्याची होऊ शकते. हि LIC OF INDIA ची एक पेन्शन योजना आहे.

एलआयसी ची जीवन शांती योजना, ही एक विशेष पॉलिसी योजना आहे, जी की योजनाधारक व्यक्तीला आजीवन पेन्शन देत राहते. या योजनेतील विशेष गोष्ट म्हणजे पेन्शन मिळण्यासाठी भरावी लागणारी रक्कम ही एकदाच, एकरकमी गुंतवून त्याची पेन्शन आजीवन घ्यायची आहे.

जीवन शांती प्लॅन वैशिष्ट्य काय आहेत?

  1. हि योजना वय वर्ष ३० ते ७९ वयोगट असणाऱ्या व्यक्तींनाच घेता येते.
  2. पेन्शन मिळण्यासाठी वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक पर्याय उपलब्ध आहेत. या पैकी कोणत्याही एका पद्धतीने आपण पेन्शन स्वीकारू शकतो.
  3. योजना खरेदी करताना एकरकमी रक्कम एकदाच गुंतवयाची आहे.
  4. ही योजना पती आणि पत्नी यांच्यासाठी संयुक्तपणे देखील खरेदी केली जाऊ शकते म्हणजेच एका योजना धारकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला पैसे मिळतील आणि दोघांच्याही मृत्यूनंतर नॉमिनी ला पैसे दिले जातील.
  5. हि योजना घेताना ज्या व्याज दराने पेन्शन घेतली त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. व्याज दर हा कायमस्वरूपी एकच राहील.
  6. डिफरमेंट पिरियड १ ते १२ वर्षापर्यंत असेल.
  7. योजना सुरु केल्यापासून तीन महिन्यानंतर कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  8. काही कारणाने हि योजना विमेदारास बंद करायची असेल तर योजना कालावधी दरम्यान केंव्हाही बंद करू शकतो.

LIC Jeevan Shanti Plan च्या अंतर्गत पेन्शन मिळण्याचे ऑप्शन.

1.  Deferred Annuity Option/ विलंबित पेन्शन पर्याय: या मध्ये सिंगल लाइफ बरोबरच पती आणि पत्नी यांच्या ड्युअल लाइफ सह हि योजना खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्याय मध्ये आपण घेतलेल्या डिफर्ड काळानंतर पेन्शन सुरु होईल. उदा. आपण आज योजना खरेदी केली आणि आपणस आज पासून ५ वर्षानंतर पेन्शन हवी आहे, तर हा ५ वर्षाचा डीफर्ड काळ संपल्यानंतर ६ व्या वर्षांपासून पेन्शन सुरु होईल.

2. Immediate Annuity Option./ तात्काळ पेन्शन योजना: या पर्याय मध्ये आपण घेतलेल्या योंजनेमध्ये १ वर्षाच्या वेटिंग पिरियड नंतर लगेच पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. इमिजिएट पेन्शन पर्याय मध्ये, पेन्शन घेण्याच्या अजून १० पद्धती आहेत.

या दोन्ही ऑप्शन पैकी कोणताही एक ऑप्शन पर्याय विमाधारकास निवडायचा आहे

पेन्शन कशी मिळेल

LIC Jeevan Shanti Plan ५० वर्षाच्या स्त्री किंवा पुरुषसाठी एक उदाहरण पाहायचे असेल तर त्याचा फायदा आणि आपणास पेन्शन कशी व किती मिळेल हे पुढील तपशिलातून समजून घेण्यास मदत होईल.

LIC Jeevan Shanti Plan
LIC Jeevan Shanti Plan

जर तुम्हाला एक लाख रुपयाची पेन्शन हवी असेल तर, त्यासाठी आपणास एक रकमी ११,१९,८००/- (१८% GST सह) रुपये LIC Jeevan Shanti Plan मध्ये एकदम गुंतवयाची आहे. आपणास पर्चेस परीस ११,००,०००/- रुपये मिळतील. वय ५० ला विमेदाराने ५ वर्षे डिफरमेंट पर्याय निवडला तर त्याला ११,५०,०००/- नैसर्गिक आणि अपघाती विमा संरक्षण तहयात मिळणार आहे.

पेन्शन मिळण्याचे चार पर्याया पैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड विमेधारकास करायची आहे. जर वार्षिक पेन्शन पर्याय निवडला तर १,०१,३१०/- रुपये ९.२१% दराने पेन्शन मिळेल, जर सहामाही म्हणजे सहा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून दोन वेळ हा पर्याय निवडला तर ४९,६४२/- ९.०३% दराने पेन्शन मिळेल, जर तिमाही म्हणजे तीन महिन्यातून एकदा असे वर्षातून चार वेळा हा पेन्शन पर्याय निवडला तर २४,५६८/- ८.९३% दराने पेन्शन मिळेल. सर्वात शेवटचा पेन्शन पर्याय म्हणजे मासिक पेन्शन होय. जर हि पद्धत निवडली तर ८,१०५/- ८.८४% दराने पेन्शन मिळेल.

वरील तपशील पाच वर्ष डीफर्ड पिरियड पूर्ण झाल्यानंतर सहाव्या वर्षीच्या सुरवातीस मिळणाऱ्या पेन्शन चा आहे. आपण जर बारकाईने पहिले तर आपल्या लक्षात येईल कि पेन्शनच्या चार पद्धती असल्या तरी प्रत्येक पद्धतीप्रमाणे आपणास मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेवरती फरक पडत जातो. त्याचबरोबर आपणास मिळणारा व्याज दर सुद्धा बदलत जातो.

LIC Jeevan Shanti Plan या योजनेमध्ये आपण योजना सुरु करत असताना जो इंटरेस्ट रेट/ व्याज दर आहे त्याच दराने योजनाधारकास तहयात पेन्शन मिळत राहते या लेख मध्ये आमी तुम्हाला LIC Jeevan Shanti Plan संदर्भात पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या मध्ये काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर विचारा, आपल्या शंखांचे निरसन योग्य उत्तराने केले जाईल.

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क करा किंवा https://licindia.in/hi/web/guest/lic-s-new-jeevan-shanti-uin-512n338v05 ला भेट द्या

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now