LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi: तुमच्या मुलीच्या भविष्यातील आर्थिक संरक्षणाचा खात्रीशीर पर्याय? जाणून घ्या सर्व माहिती.

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi: आपल्या मुलीच्या भविष्याची आर्थिक योजना बनवताना, पालकांना योग्य आर्थिक पर्याय शोधणे खूप महत्त्वाचे असते की ज्यामुळे त्यांच्या मुलीचे भविष्यातील जीवन सुरक्षित राहील, त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण, विवाह आणि इतर गरजांसाठी योग्य आर्थिक सहाय्य मिळेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एलआयसीने खास मुलींसाठी “कन्यादान पॉलिसी” तयार केली आहे.

ही आयुर्विमा पॉलिसी मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत देण्यास तयार केली आहे. या लेखात, आपण LIC कन्यादान पॉलिसीच्या सर्व तपशीलांचा आढावा घेऊ आणि या पॉलिसीचे फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, पॉलिसीची सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व इतरांना शेअर करा.

कन्यादान पॉलिसी म्हणजे काय?

एलआयसी कन्यादान पॉलिसी ही एक प्रकारची विशेष विमा योजना आहे. ही आयुर्विमा पॉलिसी म्हणजेच एलआयसी जीवन लक्ष्य (LIC’s Jeevan Lakshya) पॉलिसीचे दुसरे नाव आहे. ही योजना विशेषतः मुलीच्या भविष्याच्या गरजांना लक्षात घेऊन तयार केली गेली आहे, जी एलआयसी आयुर्विमा प्रतिनिधीद्वारे विकली जाते. LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi
LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

या पॉलिसीचे प्रमुख उद्दीष्ट म्हणजे मुलीच्या भविष्याच्या सर्व गरजांना सुरक्षित ठेवणे हे आहे. या योजनेत, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर प्रीमियम माफ केले जातात आणि मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी निश्चित विमा रक्कम दिली जाते. या योजनेत, विमा रक्कम + बोनस + अंतिम बोनस असे परिपक्वतेच्या वेळी मिळतात.

एलआयसी कन्यादान पॉलिसीचे फायदे

मॅच्युरिटी रक्कम: पॉलिसी पूर्ण झाल्यावर, विमा रक्कम + बोनस + अंतिम बोनस दिला जातो.

विमा संरक्षण: या पॉलिसीमुळे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर देखील मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक सहाय्य मिळते.

बोनस आणि अंतिम बोनस: पॉलिसीच्या परिपक्वतेनंतर पॉलिसीधारकाला विमा रक्कम, वार्षिक बोनस आणि अंतिम बोनस मिळतो.

कर लाभ (Tax Benefits): या योजनेत भरणाऱ्या पॉलिसीच्या प्रीमियमवर आयकर अधिनियमाच्या कलम 80सी अंतर्गत कर सूट मिळते, तसेच कलम 10(10D) अंतर्गत मृत्यूनंतर मिळणारी रक्कम आणि परिपक्वतेच्या वेळी मिळणारी रकमेवर कलम 10(10डी) अंतर्गत करमुक्त लाभ मिळतो.

अभिप्रेत रक्कम प्राप्ती: मुलीच्या विवाहाच्या वेळी किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी नियमित उत्पन्नाचा फायदा मिळतो, शिक्षणाच्या खर्चासाठी पॉलिसीधारकाने निश्चित केलेली विमा रक्कम मिळते.

अत्यल्प प्रीमियम रक्कम: कन्यादान पॉलिसी अत्यल्प प्रीमियम रकमेवर देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबेही याचा लाभ घेऊ शकतात. LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर रक्कम प्राप्त: पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नियमित पद्धतीने रक्कम मुलीच्या खात्यावर जमा होते.

सुरक्षित बचत व विमा संरक्षण: ही योजना दीर्घकालीन बचत व सुरक्षितता यांचे उत्तम संयोजन आहे.

पॉलिसी सरेंडर (Surrender): पॉलिसी सुरु केल्यापासून एक वर्षानंतर केंव्हाही, पॉलिसीधारक पॉलिसी सरेंडर करू शकतो.

कर्ज सुविधा: पॉलिसी सुरु केल्यापासून दोन वर्षांनंतर केंव्हाही कर्ज घेण्याची सोय उपलब्ध.

कन्यादान पॉलिसी पात्रता निकष.

  • वय: पॉलिसी खरेदी करताना मुलीचे वय 0-12 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • वडिलांचे वय: पालकांचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • पॉलिसी कालावधी: 13 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंतचा कालावधी.
  • कमीत कमी विमा रक्कम: रु. 2 लाख.
  • जास्तीत जास्त विमा रक्कम: कोणतीही मर्यादा नाही (पॉलिसीधारकाने भरलेल्या प्रीमियमवर अवलंबून).
Also Read:-  Lek Ladaki Yojana 2024: पात्रता निकष, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्ज, संपूर्ण माहिती इथे पहा!

पॉलिसी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

हि योजना सुरु करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत जसे कि पालकांचे (वडील किंवा आई) पॅन कार्ड, आधार कार्ड, पालकांचे बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, ईमेल आय डी, मोबाईल नंबर इ.

कन्यादान पॉलिसीचे लाभ कसे मिळतात?

  • पॉलिसी कालावधी संपल्यानंतर: पॉलिसी कालावधी संपल्यानंतर पालक हयात असतील तर त्यांना विमा रक्कम + बोनस + अंतिम बोनस दिला जाईल.
  • पालकाच्या मृत्यूनंतर: पालकाच्या मृत्यूनंतर तिथून पुढचे सर्व प्रीमियम भरणे बंद होतील त्याचबरोबर विमा रकमेच्या 10 % रक्कम प्रत्येक वर्षी नॉमिनी म्हणजेच मुलीस मिळेल, जे मुलीच्या शिक्षण आणि इतर गरजांसाठी वापरले जाऊ शकते. सोबतच मुलीच्या विवाहाच्या वेळी किंवा अन्य महत्त्वाच्या गरजांसाठी मुदतपूर्तीस एकरकमी मूळ विमा रक्कम + बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस सुद्धा मुलीस दिली जाईल.

एलआयसी कन्यादान पॉलिसीचे उदाहरण.

उदाहरणार्थ, जर एखाद्या 30 वर्षाच्या पालकाने त्याच्या मुलीच्या नावे हि योजना 25 वर्षांचा कालावधीसाठी निवडली आणि 10 लाख रुपयांची विमा रक्कम निश्चित केली, तर प्रीमियम अंदाजे दरमहा 3,583 रुपये येईल. हा प्रीमियम पालकाचे वय, विमा रक्कम आणि पॉलिसीचा कालावधी यावर बदलू शकतो. LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi
LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

25 वर्षांच्या कालावधीमध्ये 9,25,695 रुपये भरले जातील आणि मुदतपूर्तीस 10,00,000 (SA) + 11,50,000 (B) + 4,50.000 (FAB) = 26,00,000 अशी एकरकमी रक्कम मिळेल

कन्यादान पॉलिसीचे स्पर्धात्मक विश्लेषण.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana): ही योजना मुलीच्या भविष्यातील शिक्षणासाठी उत्तम पर्याय आहे, परंतु या योजनेत विमा संरक्षण नाही.

PNB Metlife Future Plan: ही योजना मुलीच्या शिक्षण आणि भविष्याच्या गरजा भागवू शकते, पण याचे प्रीमियम एलआयसी कन्यादान पॉलिसी प्रीमियम पेक्षा जास्त महाग आहेत.

एचडीएफसी लाइफ स्मार्ट चाइल्ड प्लॅन (HDFC Life Smart Child Plan): अधिक प्रीमियमसह, उच्च रक्कम मिळते, पण एलआयसीच्या विश्वसनीयतेमुळे कन्यादान पॉलिसी अधिक लोकप्रिय आहे.

पोस्ट ऑफिस चिल्ड्रन प्लान (Post Office Children Plan): प्रीमियम अत्यल्प आहेत, सुरक्षा आणि बचत या दोन्हीचा समतोल राखण्याचा प्रयत्न आहे, कर सवलत मर्यादित आहेत.

पीपीएफ (Public Provident Fund – PPF): या मध्ये सुरक्षा आणि परतावा योग्य आहे, कर सवलत आहे. लाभ मर्यादित आहेत, विमा संरक्षण नाही.

कन्यादान पॉलिसी का निवडावी?

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi/ कन्यादान पॉलिसी ही एक प्रभावी आणि विश्वासार्ह योजना आहे, जी पालकांना त्यांच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चित आर्थिक सहाय्य देण्यास मदत करते.

पॉलिसीमध्ये विम्याचे संरक्षण, कर सवलत, आणि बोनस यांचे लाभ मिळतात, ज्यामुळे ही पॉलिसी सुकन्या समृद्धी योजना आणि इतर योजनांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरते.

Also Read:-  free look period in health insurance: हेल्थ पॉलिसी चुकीची वाटत असेल तर; IRDAI चा पॉलिसी रद्द करण्याचा मोठा नियम काय आहे? जाणून घ्या.

एलआयसी कन्यादान पॉलिसी हा केवळ मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठीच नव्हे, तर तिच्या शैक्षणिक आणि इतर आर्थिक गरजांसाठीही उत्तम पर्याय आहे. या योजनेत वडिलांच्या मृत्यूनंतर देखील प्रीमियम भरण्याची गरज नसते आणि मुलीच्या खात्यावर नियमित रक्कम जमा केली जाते, ज्यामुळे पालकांना निश्चिंतता मिळते.

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi.

LIC कन्यादान पॉलिसी ही पालकांसाठी एक उत्तम पर्याय आहे, ज्यामुळे त्यांच्या मुलीच्या शिक्षण, विवाह, आणि इतर गरजांसाठी आर्थिक सहाय्य मिळते. ही पॉलिसी सर्व आर्थिक परिस्थितींमध्ये, कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी देखील उपयुक्त आहे. तसेच, कर सवलत आणि उच्च बोनस यांच्या सहाय्याने ही पॉलिसी एक परिपूर्ण पर्याय ठरते.

जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक स्थिरता, सुरक्षा आणि उच्च लाभ देणारी योजना हवी असेल, तर एलआयसी कन्यादान पॉलिसी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे केवळ मुलीच्या शिक्षणाचाच खर्च नव्हे, तर तिच्या लग्नाचा देखील संपूर्ण खर्च निश्चित करता येईल. आता ही पॉलिसी घ्या आणि तुमच्या मुलीला एक सुरक्षित भविष्य द्या!

LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi
LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi

एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadan Yojana for Girl Child in Marathi) ही मुलीच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तयार केलेली एक उत्कृष्ट योजना आहे. कमीत कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी ही योजना निवडावी.

पॉलिसी घेताना लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे.

  • विमा रक्कम निवडताना पालकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करावा.
  • पॉलिसीची मुदत मुलीच्या गरजांनुसार निवडावी.
  • प्रीमियम नियमितपणे भरणे आवश्यक आहे.

LIC YOJANA: LIC च्या सर्वोत्तम पॉलिसी! परताव्याची पूर्ण हमी, गुंतवणुकीचे अनेक फायदे, तपशील इथे पहा!

या सर्व माहितीच्या आधारे, LIC कन्यादान पॉलिसी हा मुलीच्या भविष्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, जो पालकांना निश्चिंतता आणि सुरक्षितता देतो. एलआयसी कन्यादान पॉलिसी घेण्यापूर्वी, प्रीमियम, परिपक्वता, आणि कर लाभ याची पूर्ण माहिती घ्या. योग्य योजना निवडून तुमच्या मुलीच्या भविष्याला आर्थिक सुरक्षिततेचे कवच द्या!

Contact us
WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now