LIC Nivesh Plus Plan Detail: एलआयसीचा निवेश प्लस प्लॅन काय आहे? जाणून घ्या गुंतवणुकीचा स्मार्ट पर्याय! एकाच योजनेत लाईफ कव्हर आणि वेल्थ क्रिएशन.

LIC Nivesh Plus Plan Detail: सध्याच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक आर्थिक जगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची आणि त्याचवेळी आपल्यासाठी संपत्ती निर्माण करण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. केवळ लाईफ इन्शुरन्स घेऊन आणि फक्त बचत किंवा गुंतवणुकीवर भर दिला तरीही भविष्यासाठी पुरेसा फायदा होईलच याची शाश्वती होत नाही. म्हणूनच अश्या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणारी योजना, स्वतःच्या कुटुंबासाठी शोधणे हेच खरं बुद्धिमान पाऊल ठरते.

अशा प्रकारच्या दोन्ही गरजा लक्षात घेऊनच, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांची निवेश प्लस योजना आपल्या समोर आणली आहे. (LIC Nivesh Plus T no. 749). ही योजना म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान (ULIP) प्रकारातील एक आधुनिक आणि लवचिक पर्याय असणारी आहे. यामध्ये तुम्हाला एकाच वेळी लाईफ इन्शुरन्स कव्हर आणि शेअर बाजाराशी संलग्न गुंतवणुकीची संधी मिळते. म्हणजेच, तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करताना तुम्ही दीर्घकालीन संपत्तीही निर्माण करू शकता.

ही निवेश प्लस योजना विशेषतः अशा व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते ज्यांना एकाच योजनेत सुरक्षिततेचा आधार आणि गुंतवणुकीचा विकास हवा असतो. LIC Nivesh Plus मध्ये विविध फंड्सचे पर्याय, फंड स्विचिंगची मुभा, आंशिक पैसे काढण्याची सुविधा, बोनस आणि करसवलतीसारखे अनेक लाभ आहेत. त्यामुळे, ही योजना फक्त आयुर्विमा किंवा फक्त गुंतवणूक न राहता एक सर्वसमावेशक आर्थिक पर्याय बनते.

तुम्ही तुमच्या जोखीम क्षमतेनुसार योग्य फंड निवडू शकता, आवश्यकतेनुसार फंड बदलू शकता आणि पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर काही प्रमाणात पैसे काढण्याची मुभा देखील आपणास मिळते. याशिवाय, यामध्ये मिळणाऱ्या करसवलतीमुळे आणि LIC च्या विश्वासार्हतेमुळे अनेक गुंतवणूकदार निश्चिंतपणे या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत.

LIC Nivesh Plus Plan Detail
LIC Nivesh Plus Plan Detail

थोडक्यात, LIC Nivesh Plus ही केवळ एक इन्शुरन्स पॉलिसी नाही तर तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ आहे. एकाचवेळी संरक्षण आणि प्रगतीची संधी देणारी ही योजना आजच्या काळात खरंच एक परिपूर्ण आर्थिक पर्याय ठरते.

निवेश प्लस प्लॅन म्हणजे काय?

LIC निवेश प्लस योजना ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी, Life Insurance Corporation of India (LIC) यांनी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेली एक खास योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला एकाच वेळी जीवन कवच (Life Cover) आणि गुंतवणुकीची (Investment) संधी मिळते.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुमचा प्रीमियम LIC कडून व्यवस्थापित केलेल्या विविध फंड्समध्ये गुंतवला जातो. तुम्ही तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार (Risk Appetite), जसे की इक्विटी फंड, बाँड फंड, बॅलन्स्ड फंड किंवा ग्रोथ फंड, यापैकी कोणताही फंड निवडू शकता. (म्हणजेच, सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास कमी जोखीम असलेले फंड निवडा आणि जास्त परताव्याचा विचार करत असाल तर थोडी जास्त जोखीम असलेले इक्विटी फंड निवडा)

ही योजना तुम्हाला केवळ आयुर्विमाचा आधार देत नाही तर, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची हमखास संधी देते. त्यामुळेच अनेक गुंतवणूकदार LIC Nivesh Plus कडे आकर्षित होत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक ठोस आर्थिक पाया बनवत आहेत.

या योजनेची खास वैशिष्ट्ये

1. एकदाच प्रीमियम भरण्याची सुविधा: LIC Nivesh Plus ही योजना Single Premium Payment प्रकारातील आहे. म्हणजेच तुम्हाला दरवर्षी किंवा दरमहा हप्ते भरण्याची गरज नाही. तुम्ही एकदाच ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरता आणि त्या एकाच प्रीमियमवर तुम्हाला संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी जीवन कवच व गुंतवणुकीचे लाभ मिळत राहतात. यामुळे वारंवार पेमेंट करण्याचा त्रास वाचतो आणि योजना अधिक सोपी व सोयीची बनते.

2. एकत्रित आयुर्विमा आणि गुंतवणूक: या योजनेतून तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कव्हर आणि संपत्ती निर्माण करण्याची संधी असा दुहेरी लाभ मिळतो. म्हणजेच, अनपेक्षित प्रसंगी तुमच्या कुटुंबाचे आर्थिक रक्षण होईल आणि त्याचबरोबर दीर्घकाळात चांगले परतावे मिळवण्याची संधी सुद्धा मिळेल मिळेल.

3. विविध फंड्सचे पर्याय: Nivesh Plus योजनेत LIC कडून चालवले जाणारे मुख्य चार फंड पर्याय उपलब्ध आहेत, इक्विटी (Equity), बाँड (Bond), बॅलन्स्ड (Balanced), ग्रोथ (Growth) यामधील तुमच्या जोखमीची क्षमता आणि उद्दिष्टानुसार कोणतेही फंड निवडता येतात.

4. फंड स्विचिंगची सुविधा: शेअर बाजारातील परिस्थिती बदलत असताना, तुम्हाला तुमचे फंड बदलायचे असतील तर Fund Switching ची सुविधा, या योजनेत दिली जाते. यामुळे तुमची गुंतवणूक अधिक लवचिक (Flexible) बनते.

5. आंशिक पैसे काढण्याची सोय: पॉलिसी घेतल्यापासून 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही Partial Withdrawal करून, तुमच्या फंड व्हॅल्यूमधून काही रक्कम काढू शकता. अशी रक्कम एखाद्या आपत्कालीन प्रसंगी उपयोगी पडू शकते.

6. निष्ठा बोनस आणि अडिशन्स: LIC वेळोवेळी पॉलिसी होल्डर्सना Loyalty Additions म्हणून जादा अतिरिक्त फंड युनिट्स देऊन, फंड व्हॅल्यू वाढवते. हे या योजनेचे एक मोठे आकर्षण आहे.

7. कर सवलती: या योजनेत भरलेले प्रीमियम तुम्हाला Income Tax Act च्या कलम 80C अंतर्गत वजावटीस पात्र ठरतात. तसेच, पॉलिसीची मुदत संपल्यानंतर मिळणारा रक्कम (Maturity Benefit) देखील ठरावीक अटींनुसार कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त असतात.

8. लवचिक विमा रक्कम: तुमच्या गरजेनुसार तुम्ही विमा रक्कम (Sum Assured, मृत्यू झाल्यास मिळणारा लाभ) निवडू शकता. हा पर्याय सुरुवातीला ठरवावा लागतो आणि नंतर बदलता येत नाही.

9. प्रीमियमवर जीएसटी नाही: LIC Nivesh Plus या योजनेची एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे या योजनेत भरावयाच्या प्रीमियमवर कोणताही GST (Goods and Services Tax) लागू होत नाही. याचा अर्थ, तुम्ही जेवढा प्रीमियम भरता तो संपूर्ण रक्कम तुमच्या पॉलिसीत गुंतवला जातो. यामुळे गुंतवणुकीतून मिळणारा परतावा अधिक फायदेशीर ठरतो आणि दीर्घकालीन दृष्टीने तुमच्या निधीची वाढ जलद गतीने होते.

LIC Nivesh Plus Plan Detail
LIC Nivesh Plus Plan Detail

Understanding ULIP (युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान)

  • बाजारावर अवलंबून परतावे: या योजनेतील गुंतवणूक बाजाराशी जोडलेली असल्याने परतावे निश्चित नसतात.
  • NAV मधील बदल: निवडलेल्या फंडचा Net Asset Value (NAV) बदलतो आणि त्यावर तुमच्या युनिट्सची किंमत ठरते.
  • विविध चार्जेस: योजनेत प्रीमियम अ‍ॅलोकेशन चार्ज, फंड मॅनेजमेंट चार्ज, मॉर्टॅलिटी चार्ज असे विविध शुल्क लागू होतात. हे शुल्क एकत्रित परताव्यावर परिणाम करू शकतात.
Also Read:-  लॉगिन न करता LIC प्रीमियम ऑनलाइन कसा भरावा ? संपूर्ण माहिती इथे पहा!

LIC निवेश प्लस प्लॅन प्रवेशाची अट

  • किमान वय: 90 दिवस
  • कमाल वय: पर्याय 1: 70 वर्षे, पर्याय 2: 35 वर्षे
  • किमान प्रीमियम: ₹1,25,000 (₹5,000 च्या पटीत)
  • कमाल प्रीमियम: कमाल मर्यादा नाही.
  • Sum Assured पर्याय:
    • Option 1: प्रीमियमच्या 1.25 पट
    • Option 2: प्रीमियमच्या 10 पट
  • मॅच्युरिटी वय:
    • Option 1: 85 वर्षांपर्यंत
    • Option 2: 50 वर्षांपर्यंत

निवेश प्लस प्लॅन गुंतवणुकीचे परतावे

हि योजना ULIP असल्यामुळे याचे रिटर्न्स, हे थेट बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतात. म्हणजेच तुम्ही निवडलेल्या फंडचा Net Asset Value (NAV) वाढला तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढते आणि बाजारात घसरण झाली तर परतावे कमी होऊ शकतात. LIC Nivesh Plus मधील फंड्सने अनेक वर्षांतील ऐतिहासिक आकडेवारीनुसार सरासरी 12%, 15%, 18% इतके परतावे काही कालावधीत दिलेले आहेत.

तथापि, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, भूतकाळातील परतावे हे भविष्यातही हमखास मिळतील, अशी खात्री देता येत नाही. कारण बाजाराचे चढउतार, आर्थिक परिस्थिती, जागतिक घडामोडी यांचा परताव्यांवर परिणाम होतो.

या योजनेची रचना आणि LIC ची विश्वासार्हता लक्षात घेतली तर, LIC Nivesh Plus ही योजना पारंपरिक फिक्स्ड डिपॉझिट किंवा बचत योजनांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करण्याची क्षमता ठेवते. म्हणजेच, दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार केला तर तुमच्या पैशाला वाढीची चांगली संधी या योजनेत मिळते, आणि त्याच वेळी लाईफ कव्हरची सुरक्षितताही मिळते.

निवेश प्लस प्लॅनचे अंदाजे उदाहरण

एलआयसी निवेश प्लस योजनेचे एक उदाहरण समजून घेऊया: समजा, 25 वर्षांचा एखादा पुरुष किंवा स्त्री ही योजना सुरू करतो/करते. या योजनेत एकदाच भरणारा प्रीमियम म्हणजेच Single Premium ₹15,00,000 इतका ठेवला आणि योजनेची मुदत 25 वर्षे निश्चित केली.

पॉलिसी सुरू होताना निवडलेल्या फंडाचा प्रारंभिक NAV (Net Asset Value) ₹10 असा धरूया. या कालावधीत जर गुंतवणूकदाराने Growth Fund निवडला आणि या फंडाने सरासरी 15% वार्षिक वाढ दिली, तर 25 वर्षांनंतर त्या गुंतवणुकीची एकूण किंमत सुमारे ₹4,28,10,883 इतकी होऊ शकते.

याशिवाय, या योजनेतून त्यांना ₹18,75,000 चे जीवन विम्याचे कव्हर (Life Cover) देखील मिळत राहते. म्हणजेच, केवळ गुंतवणूकच नाही तर कुटुंबासाठी एक भक्कम आर्थिक सुरक्षा कवच सुद्धा या योजनेत उपलब्ध होते

LIC Nivesh Plus Plan Detail
LIC Nivesh Plus Plan Detail
वय (सुरुवातीस)प्रीमियम (एकदाच)पॉलिसी मुदतनिवडलेला फंडसरासरी वाढ (वार्षिक)अंदाजे परतावा (कालावधी संपल्यानंतर)जीवन कवच (Life Cover)
30 वर्षे₹5,00,00015 वर्षेBalanced Fund12%
₹24,37,086₹6,25,000
35 वर्षे₹100000020 वर्षेSecured
Fund
14%₹1,20,19,513₹12,50,000
40 वर्षे₹20,00,00025 वर्षेGrowth Fund16%₹7,00,02,182₹25,00,000

टीप: वरील आकडे हे फक्त अंदाजे परतावे दाखवण्यासाठी आहेत. प्रत्यक्ष परतावे बाजाराच्या कामगिरी, फंड निवड आणि इतर घटकांवर अवलंबून बदलू शकतात.

महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • बाजार जोखीम: गुंतवणूक केल्यावर फंड व्हॅल्यू कमी-जास्त होऊ शकते.
  • चार्जेस वाचा: पॉलिसीमध्ये विविध चार्जेस असतात, ते नीट समजून घ्या.
  • पॉलिसी दस्तऐवज नीट वाचा: अटी, शर्ती, फंड पर्याय यांचा बारकाईने अभ्यास करा.
  • तज्ज्ञ सल्ला: गुंतवणूक करण्याआधी LIC आयुर्विमा प्रतिनिधी/एजंट किंवा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

निवेश प्लस प्लॅन मध्ये कशी गुंतवणूक करायची?

तुम्ही हि योजना सुरु करण्यासाठी तुमच्या LIC आयुर्विमा प्रतिनिधींशी संपर्क करा किंवा तुमच्या परिसरात असलेल्या अधिकृत व प्रमाणित LIC आयुर्विमा प्रतिनिधी/एजंटकडून या योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकता. ते तुम्हाला या योजनेचे सर्व फायदे, अटी आणि संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतील व योग्य कागदपत्रे भरण्यात मदत करतील. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण विश्वासाने ही गुंतवणूक सुरू करू शकता.

निवेश प्लस प्लॅन का निवडावा?

LIC ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह आयुर्विमा संस्था असून, 1956 पासून लाखो लोकांच्या जीवनात आर्थिक सुरक्षा निर्माण करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. त्यांच्या विविध Unit Linked Plans नेहमीच गुंतवणूकदारांसाठी आकर्षक आणि उपयुक्त ठरल्या आहेत. याच परंपरेत आणखी एक पाऊल पुढे टाकत Nivesh Plus ही योजना सादर करण्यात आली आहे.

ही योजना निवडण्यामागे अनेक कारणे आहेत. Nivesh Plus तुम्हाला केवळ एक साधा आयुर्विमा पुरवते असे नाही, तर त्याचवेळी भविष्यातील संपत्ती निर्माण करण्याची संधी देखील देते. म्हणजेच, तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही एक मजबूत जीवन सुरक्षा कवच तयार करता आणि गुंतवलेल्या रकमेवरून दीर्घकाळात वाढीव परतावे मिळवू शकता.

LIC Nivesh Plus Plan Detail
LIC Nivesh Plus Plan Detail

आजच्या बदलत्या बाजारपेठेत आणि अनिश्चित आर्थिक परिस्थितीत, एकाच योजनेत विमा व गुंतवणुकीचा दुहेरी लाभ मिळवणे ही एक मोठी जमेची बाजू आहे. LIC Nivesh Plus हेच तुम्हाला देते; विश्वासार्ह संस्था, लवचिक फंड पर्याय, करसवलती आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता.

LIC Nivesh Plus Plan Detail

LIC Nivesh Plus ही योजना फक्त विमा नाही, तर एक सखोल गुंतवणूक संधी आहे. यातील फंड पर्याय, लवचिकता, करसवलती, आंशिक पैसे काढण्याची सुविधा आणि निष्ठा बोनस यामुळे ही योजना इतर अनेक पर्यायांपेक्षा वेगळी ठरते.

तथापि, ही योजना बाजार जोखीमेला अधीन असल्याने गुंतवणूक करण्याआधी तुमची जोखीम क्षमता, आर्थिक उद्दिष्टे आणि पॉलिसीचे तपशील नीट समजून घ्या आणि हो, Return Calculator वापरून अंदाज घेतल्यास गुंतवणूक अधिक सोपी आणि विचारपूर्वक होईल.

तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करताना तुमच्या पैशांची योग्य गुंतवणूक करण्यासाठी LIC Nivesh Plus हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो.

LIC Nivesh Plus Plan Detail link: https://licindia.in/nivesh-plus

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment