LIC Pension Plan: एकदा गुंतवणूक करा, आजीवन पेन्शन मिळवा, LIC ची ‘हि’ योजना बनेल वृद्धापकाळाची काठी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

LIC Pension Plan: पैशाला म्हातारपणाची काठी म्हटले जाते कारण, वृद्धापकाळात आपल्या शरीरामध्ये कष्ट करण्याची क्षमता कमी होत जाते. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे त्यावेळी पैसे नसतील तर तुम्हाला छोट्या मोठ्या गरजांसाठीही इतरांवर अवलंबून राहावे लागेल. अशाच कारणासाठी तुम्ही तुमच्या तरुणपणामध्ये नोकरी आणि व्यवसायासोबतच तुमच्या निवृत्तीचे नियोजन लवकरच सुरू करून LIC च्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणे हे शहाणपणाचे ठरेल, जेणेकरून तुम्हाला वृद्धापकाळातही कायमस्वरूपी नियमित उत्पन्न मिळत राहील.

LIC Pension Plan: Saral Pension Plan

LIC Pension Plan: Saral Pension Plan
LIC Pension Plan: Saral Pension Plan

LIC ची सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी या बाबतीत खूप उपयुक्त ठरू शकते. LIC सरल पेन्शन प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे, पेन्शन मिळण्यासाठी तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत वाट पाहावी लागत नाही. वयाच्या 40 व्या वर्षापासून तुम्ही निवृत्ती वेतनाचा म्हणजे पेन्शन चा लाभ घेऊ शकता. या लेखामध्ये LIC सरल पेन्शन योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि या योजनेबाबत अधिक जाणून घ्या.

सरल पेन्शन योजना म्हणजे काय?

LIC ची सरल पेन्शन योजना ही इमिजिएट पेन्शन योजना आहे. तुम्ही हि पॉलिसी केल्यावर तुम्हाला पेन्शन मिळते. या योजनेअंतर्गत, पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. पॉलिसीधारकाला प्रीमियम भरल्यानंतर LIC कडून पेन्शन मिळते.

हि पेन्शन वार्षिक, सहामाही, तिमाही, किंवा प्रत्येक महिन्याला घेण्याचा पर्याय उपलब्ध आहेत. योजनाधारकाला पहिल्यांदा ज्या रकमेची आणि ज्या व्याज दराने पेन्शन मिळते, तीच रक्कम आणि तोच व्याज दर आयुष्यभरासाठी असतो. या दरम्यान पॉलिसी खरेदीदाराचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याची जमा केलेली रक्कम त्याच्या अधिकृत नॉमिनीला परत केली जाते.

योजनाधारक अविवाहित असेल तर सिंगल लाईफ मध्ये योजना घेऊ शकतो किंवा विवाहित असेल तर पती आणि पत्नीच्या असे दोघांच्या नावे पॉलिसी घेऊ शकतो. सरल पेन्शन योजनेचा लाभ सुद्धा दोन प्रकारे मिळू शकतो. पहिला लाभ सिंगल लाइफ आणि दुसरा लाभ जॉईंट लाईफ. सिंगल लाइफ, जोपर्यंत पॉलिसीधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील.मृत्यूनंतर गुंतवणुकीची रक्कम नॉमिनीला परत केली जाईल.

जॉईंट लाइफ मध्ये पती-पत्नी दोघांचाही समावेश होतो. यामध्ये प्राथमिक पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत त्याला पेन्शन दिली जाते. त्याच्या मृत्यूनंतर जोडीदाराला पेन्शनचा लाभ मिळतो. दोघांच्या मृत्यूनंतर, जमा केलेली रक्कम नॉमिनीला परत दिली जाते.

तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

LIC Pension Plan सरल पेन्शन योजनेअंतर्गत, तुम्ही मासिक 1000 रुपये पेन्शन घेऊ शकता आणि कमाल मर्यादा नाही. ही पेन्शन तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर अवलंबून असते. पेन्शनसाठी तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पेन्शनचा पर्याय मिळतो. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तुम्हाला पेन्शन दिली जाईल. हि पेन्शन घेण्यासाठी आपणास ठराविक रक्कम एकदाच LIC मध्ये गुंतवावी लागेल. 

समजा 2024 मध्ये तुम्ही 40 वयाचे आहात, तर तूम्हाला या योजनेमध्ये सिंगल लाईफ प्रीमियम साठी ₹10,18,000 एवढी रक्कम एकदम गुंतवावी लागेल. हि योजना सुरु केल्यानंतर पेन्शन सुरु होईल.

आपणास वर्षातून एकदा, वार्षिक पेन्शन हवी असल्यास ₹62,750 हि पेन्शन मिळेल, आपणास वर्षातून दोन वेळा म्हणजे, सहामाही पेन्शन हवी असल्यास ₹30,775 हि पेन्शन मिळेल, आपणास वर्षातून चार वेळा म्हणजे, तिमाही पेन्शन हवी असल्यास ₹15,243 हि पेन्शन मिळेल. आपणास वर्षातून बारा वेळा, म्हणजे मासिक पद्धतीने पेन्शन हवी असल्यास ₹5,041 हि पेन्शन मिळेल.

या पेन्शन प्लॅन चे व्याज दर स्थिर असतात. एकदा लागू झालेले व्याजदर म्हणजे, पेन्शन रक्कम तहयात बदलत नाही, हे या पेन्शन प्लॅन चे खास वैशिष्ट्य आहे.

LIC Pension Plan: Saral Pension Plan
LIC Pension Plan: Saral Pension Plan

तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षापासून लाभ घेऊ शकता

या योजनेत तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी निवृत्ती पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही यामध्ये वयाच्या 40 वर्षे ते 80 वर्षे मध्ये कधीही गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याच वयापासून पेन्शनचे फायदे मिळू लागतात, जे तुमच्या आयुष्यभर मिळतील.

कर्ज सुविधा

एलआयसीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कर्जाची सुविधाही मिळते. योजना खरेदी केल्यानंतर 6 महिन्यांनंतर तुम्हाला कर्जाची सुविधा मिळते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, जर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करायची असेल, तर तुम्हाला ही सुविधा सहा महिन्यांनंतर मिळते. 

Conclusion:

म्हातारपणात पैसा नसेल, तर लहानसहान गरजांसाठीही माणूस इतरांवर अवलंबून राहतो. तुम्ही तुमच्या नोकरी, व्यवसायासोबत तुमच्या सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू करा आणि LIC योजनांमध्ये गुंतवणूक करा, जेणेकरून वृद्धापकाळात तुम्हाला नियमित उत्पन्न मिळत राहील. या योजनेच्या अधिक माहितीसाठी LIC च्या अधिकृत वेबसाईट https://licindia.in/web/guest/lic-s-saral-pension-plan-no.-862-uin-512n342v03- ला भेट द्या. आपल्या नजीकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुमच्या LIC विमा प्रिनिधीशी या योजनेबाबत चर्चा करा आणि आजच हि LIC Pension Plan योजना सुरु करून आपल्या भविष्यातील पेन्शनचे प्लॅनिंग करा.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us