LIC Saral Pension Yojana: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कमाईतील काही भाग खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या योजनांच्यामध्ये गुंतवावा लागत असतो. शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून पासून ते सरकारी योजनांपर्यंत प्रत्येकजण, आपल्या भविष्यातील खर्चाचे नियोजन सुरक्षित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत असतो. विशेषत: कोणत्याही पद्धतीची जोखीम न घेता योग्य ठिकाणी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांमध्ये, LIC OF INDIA च्या अनेक योजनांची लोकप्रियता वाढत आहे. यापैकी एक लोकप्रिय पेन्शन योजना म्हणजे, LIC ची ‘सरल पेन्शन’ योजना आहे, ज्या मध्ये निवृत्तीनंतर दरमहा पेन्शनची देण्याची हमी आहे.
LIC Saral Pension Yojana योजनेची वैशिष्ट्ये
LIC Saral Pension Yojana ही अशी एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शन मिळते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. या पॉलिसी अंतर्गत, किमान मासिक 1,000 रुपयांची पेन्शन, तीन महिन्यातून एकदा किमान 3,000 रुपये पेन्शन, सहा महिन्यातून एकदा किमान 6,000 रुपये आणि वर्षातून एकदा पेन्शन हवी असल्यास किमान 1,2000 रुपयांची पेन्शन तरतूद करावी लागेल.
12,000 रुपये मासिक पेन्शन कशी मिळेल?
या योजनेमध्ये तुम्ही किमान 12,000 रुपयांची वार्षिक पेन्शन घेण्यासाठीची गुंतवणूक करू शकता पण या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवली जाऊ शकते. गुंतवणुक रक्कम वरती कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही, तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता आणि त्यानुसार पेन्शन मिळवू शकता.
उदाहरणार्थ, जर एका 42 वयाच्या स्त्री किंवा पुरुष अर्जदार व्यक्तीने 25 लाख रुपयांची, एक रकमी रक्कम, सिंगल पद्धतीने गुंतवली तर, त्याला वर्षातून एकदा पेन्शन पाहिजे असेल तर 1,59,625 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. सहामहिन्यातून एकदा हा पर्याय निवडला तर 78,313 रुपये सहामाही पेन्शन मिळेल. तीन महिन्यातून एकदा पर्यायाद्वारे 38,781 रुपये तिमाही पेन्शन मिळेल आणि प्रत्येक महिन्याला पेन्शन हवी असल्यास 12,813 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल. हि पेन्शन तहयात उपलब्ध असणार आहे.
कर्ज सुविधा आणि इतर फायदे
या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे, पॉलिसीधारकाच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती गंभीर आजारी असल्यास, पॉलिसी घेतल्यानंतर सहा महिन्यांनंतर ती परत करता येते आणि त्यावरील पैसे परत मिळू शकतात. याव्यतिरिक्त, पॉलिसी सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनंतर काही थोड्या अटीवर कर्ज देखील मिळू शकते.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी LIC OF INDIA ची अधिकृत वेबसाइट www.licindia.in ला भेट देऊ शकता किंवा आपल्या जवळच्या शाखा कार्यालयामध्ये भेट देऊ शकता किंवा तुमच्या विमा प्रतिनिधींशी सम्पर्क साधून, त्यांना हि माहिती विचारू शकता तसेच, या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.
LIC Saral Pension Yojana ही एक सुरक्षित आणि फायदेशीर सिंगल प्रीमियम गुंतवणूक योजना आहे, जी निवृत्तीनंतर आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवन जगण्यास मदत करत राहील. यासाठी आजच या योजनेमध्ये गुंवणूक करण्याचा विचार करा.
Table of Contents