LICs Bima Kavach Plan: 2 CR पेक्षा जास्त No Limit Life Cover! तुम्हालाही घ्यायचा आहे का? फायदे पाहून तुम्ही थक्क व्हाल! आधी हि माहिती जरूर वाचा.

LICs Bima Kavach Plan: या आर्थिक वर्षामध्ये LIC India ने लोकांसाठी एक नवीन प्लॅन सादर केला आहे. ज्याचे नाव आहे ‘एलआयसी बिमा कवच’ (LIC’s Bima Kavach) योजना. हा नॉन-पार, नॉन-लिंक्ड आणि केवळ आयुर्विमा संरक्षण देणारा Pure Risk प्रकारातील प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पॉलिसीधारकाच्या अचानक किंवा दुर्दैवी निधनाच्या परिस्थितीत त्याच्या किंवा तिच्या कुटुंबाला तत्काळ आणि मजबूत आर्थिक आधार देणे.

ही योजना नॉन-पार असल्यामुळे या अंतर्गत दिले जाणारे डेथ बेनिफिट्स पूर्णपणे निश्चित आणि गॅरेंटेड असतात. म्हणजेच, बाजारातील चढ-उतार, कंपनीचा नफा तोटा किंवा इतर कोणत्याही परिस्थितीचा परिणाम या योजनेतील लाभांवर होत नाही. या योजनेत कोणतेही बोनस, अतिरिक्त फायदे किंवा कंपनीच्या सरप्लसमधील हिस्सा मिळत नाही, कारण ही पूर्णतः संरक्षण-केंद्रित योजना (Term Insurance Plan) आहे.

त्यात्यामुळे गुंतवणुकीचा परतावा शोधणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त नसली तरी, फक्त कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा अत्यंत विश्वासार्ह पर्याय ठरतो. ही योजना LIC च्या अधिकृत आयुर्विमा प्रतिनिधी मार्फत सहजपणे खरेदी करता येते.

हि LICs Bima Kavach Plan पॉलिसी घेण्यापूर्वी, इच्छुकांनी विमाधारकांनी या योजनेची वैशिष्ट्ये, त्यातील संभाव्य जोखीम, Death Benefit पर्याय आणि इतर अटी नीट समजून घ्याव्यात, जेणेकरून त्यांच्या गरजेनुसार योग्य असा पर्याय निवडणे सोपे जाईल. योग्य निर्णय घेतल्यास, ही योजना कुटुंबासाठी एक दीर्घकालीन सुरक्षाकवच ठरते.

मुख्य वैशिष्ट्ये (KEY FEATURES):

  • आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण.
  • खालील गोष्टी निवडण्याची लवचीकता:
    • दोन Death Benefit पर्याय: Level Sum Assured आणि Increasing Sum Assured
    • Single Premium, Regular Premium किंवा 5, 10 किंवा 15 वर्षांची Limited Premium
    • पॉलिसी टर्म निवडण्याची सुविधा; कव्हरेज 100 वर्षांपर्यंत
  • Regular Premium आणि Level Sum Assured पर्यायांत Life Stage Option मार्फत कव्हर वाढवण्याची सुविधा.
  • मृत्यू लाभ हप्त्यांमध्ये मिळण्याचा पर्याय.
  • महिलांसाठी विशेष कमी प्रिमियम दर.
  • जास्त Sum Assured घेणाऱ्यांना आकर्षक सूट.
  • दोन प्रकारचे प्रिमियम दर: Non-Smoker, Smoker, Non-smoker दर Urinary Cotinine चाचणीच्या निकालावर आधारित.
LICs Bima Kavach Plan
LICs Bima Kavach Plan

पात्रता आणि इतर अटी (ELIGIBILITY CONDITIONS):

Death Benefit पर्याय: LICs Bima Kavach Plan

  • पर्याय 1: Level Sum Assured
  • पर्याय 2: Increasing Sum Assured

प्रवेश वय (Age at Entry):

  • किमान: 18 वर्षे (शेवटचा वाढदिवस)
  • कमाल: 65 वर्षे, (60 वर्षांवरील प्रस्ताव एलआयसीच्या अंडररायटिंग पॉलिसीनुसार स्वतंत्ररीत्या विचारात घेतले जातील.)

मॅच्युरिटी वय:

  • किमान: 28 वर्षे
  • कमाल: 100 वर्षे

Basic Sum Assured:

  • किमान: ₹2,00,00,000/-
  • कमाल: मर्यादा नाही (अंडररायटिंग धोरणानुसार)

Sum Assured Multiples: ₹2 कोटी ते ₹2.75 कोटी: ₹5 लाखांच्या पटीत, ₹2.75 कोटीपेक्षा अधिक: ₹25 लाखांच्या पटीत

Policy Term (वर्षे): LICs Bima Kavach Plan

LICs Bima Kavach Plan
LICs Bima Kavach Plan

लाभ (BENEFITS):

A. मृत्यू लाभ (Death Benefit): पॉलिसी इन-फोर्स असतानाच्या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास मूळ विमा रक्कम (Sum Assured on Death) देय असेल.

Regular आणि Limited Premium मध्ये: Sum Assured on Death = खालीलपैकी सर्वाधिक रक्कम:

a] वार्षिक प्रीमियमच्या 7 पट, b] भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105%, C] Absolute amount assured to be paid on death.

Single Premium मध्ये: Sum Assured on Death = खालीलपैकी सर्वाधिक:

Single Premiumच्या 125%, Absolute amount assured to be paid on death

(Absolute amount assured (मृत्यूच्या वेळी मिळणारी निश्चित रक्कम) Death Benefit पर्यायावर अवलंबून आहे)

पर्याय I: Level Sum Assured

पूर्ण पॉलिसी टर्ममध्ये Basic Sum Assured जशीच्या तशी राहते. जर Life Stage Option वापरला असेल, तर अतिरिक्त Basic Sum Assured त्यानुसार वाढते.

पर्याय II: Increasing Sum Assured

  • पहिली 5 वर्षे = Basic Sum Assured
  • 6वे वर्ष ते 15वे वर्ष = दरवर्षी 10% वाढ
  • 15व्या वर्षी = Basic Sum Assured च्या 2 पट
  • 16वे वर्ष आणि पुढे = 2 पट Sum Assured निश्चित

Death Benefit पर्याय एकदा निवडल्यावर बदलता येत नाही.

परिपक्वता लाभ (Maturity Benefit):

हा प्लॅन Pure Risk (Term Insurance Plan) आहे, त्यामुळे पॉलिसीची टर्म संपेपर्यंत विमेदार हयात असेल तर कोणत्याही प्रकारचा परिपक्वता लाभ (maturity benefit) मिळत नाही.

उपलब्ध पर्याय

I. रायडर बेनिफिट (Rider Benefit): LICs Bima Kavach Plan

पॉलिसीधारकाला प्रीमियम भरण्याच्या Regular Premium किंवा Limited Premium मोडमध्ये अतिरिक्त प्रीमियम भरून LIC’s Accident Benefit Rider (किंवा त्याचा सुधारित आवृत्ती) घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

हा पर्याय घेण्यासाठी: बेस प्लॅन आणि रायडर दोन्हींच्या उर्वरित प्रीमियम भरण्याचा कालावधी किमान 5 वर्षे असावा, तसेच हा पर्याय लाइफ अ‍ॅश्युअर्डच्या वयाचे 65 वर्षे (nearest birthday) पूर्ण होण्याच्या पॉलिसी वर्धापनदिनापूर्वीच घ्यावा लागतो.

या रायडरअंतर्गत मिळणारे संरक्षण: रायडरचे संरक्षण प्रीमियम भरण्याच्या मुदतीपुरते किंवा लाइफ अ‍ॅश्युअर्डचे nearest birthday 70 वर्षे होणाऱ्या पॉलिसी वर्धापनदिनापर्यंत, ज्यापैकी आधी येईल तेवढ्या काळासाठी उपलब्ध असेल.

जर हा रायडर निवडला असेल, तर अपघाती मृत्यू झाल्यास रायडरअंतर्गत मिळणारी Accident Benefit Sum Assured रक्कम, बेस प्लॅनच्या मृत्यू लाभासोबत एकरकमी दिली जाईल.

Also Read:-  LIC New Plan 2025: एलआयसी च्या दोन नवीन योजनांबद्दल जाणून घ्या, LIC जण सुरक्षा आणि बिमा लक्ष्मी; महिला आणि सर्वसामान्यांसाठी अर्थीक संरक्षण.

महत्वाची अट: एखाद्या व्यक्तीच्या नावावर LIC मधील सर्व पॉलिसी (व्यक्तिगत + गट विमा) मिळून Accident Benefit Sum Assured ची कमाल मर्यादा 1 कोटी रुपये (LIC Jeevan Shiromani मधील अतिरिक्त 1 कोटी वगळून) पेक्षा जास्त असू शकत नाही. या रायडरसाठीचा प्रीमियम बेस प्लॅनच्या प्रीमियमच्या 30% पेक्षा जास्त नसावा.

II. लाइफ स्टेज ऑप्शन (Life Stage Option):

हा पर्याय पॉलिसी घेण्याच्या वेळी निवडता येतो. लाइफ अ‍ॅश्युअर्डला त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर Basic Sum Assured वाढवण्याची सुविधा मिळते. हा पर्याय मिळण्यासाठी लागणाऱ्या अटी:

  1. Option I – Level Sum Assured आणि Regular Premium मोड निवडलेला असावा.
  2. पॉलिसी घेताना वय 40 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी (last birthday) असावे.
  3. पॉलिसी घेताना लाइफ अ‍ॅश्युअर्डचे आरोग्य स्टँडर्ड लाइफ म्हणून स्वीकारलेले असावे.

या पर्यायात, खालील घटना घडल्यावर Basic Sum Assured वाढवता येतो:

a. विवाह (एकदाच): Basic Sum Assured च्या 50% पर्यंत वाढ. कमाल वाढ: 2 कोटी रुपये

b. पहिल्या अपत्याचा जन्म: Basic Sum Assured च्या 25% पर्यंत वाढ. कमाल वाढ: 1 कोटी रुपये

c. दुसऱ्या अपत्याचा जन्म: Basic Sum Assured च्या 25% पर्यंत वाढ. कमाल वाढ: 1 कोटी रुपये

टीप: जुळी मुले, तिळी मुले इत्यादी प्रसंगांत एकूण दोनच वाढीची परवानगी आहे.

या पर्यायासाठी अतिरिक्त अटी: LICs Bima Kavach Plan

i. पॉलिसी इन-फोर्स असावी.
ii. पॉलिसी revival झाल्यास ते स्टँडर्ड रेटवरच झालेले असावे.
iii. वाढ प्रभावी होणाऱ्या पॉलिसी वर्धापनदिनाला वय 45 वर्षे किंवा कमी असावे.
iv. उर्वरित पॉलिसी कालावधी, नियमित प्रीमियम मोडमध्ये उपलब्ध किमान कालावधीपेक्षा कमी नसावा.
v. घटनेनंतर 6 महिन्यांच्या आत वाढीसाठी लिखित अर्ज करावा.
vi. वाढ पॉलिसी वर्धापनदिनापासून लागू होईल आणि त्यानुसार अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल.
vii. LIC underwriting नियमांनुसार वाढ नाकारण्याचा अधिकार राखून ठेवते.

एकदा Basic Sum Assured वाढवल्यावर, तो पॉलिसी कालावधीभर कमी करता येत नाही.

LICs Bima Kavach Plan
LICs Bima Kavach Plan

मृत्यू लाभ हप्त्यांमध्ये (Death Benefit in Instalments):

पॉलिसीधारकाला मृत्यू लाभाची रक्कम एकरकमी न घेता, पुढील 5 / 10 / 15 वर्षांमध्ये हप्त्यांनी घेण्याचा पर्याय आहे. हा पर्याय लाइफ अ‍ॅश्युअर्ड जिवंत असताना निवडता येतो. रक्कम पूर्ण किंवा अंशतः हप्त्यात घेऊ शकतो. जर निवडलेल्या रकमेवर किमान हप्ता मिळत नसेल, तर ती रक्कम एकरकमी दिली जाते.

प्रीमियम भरण्याची पद्धत

या LICs Bima Kavach Plan प्लॅनमध्ये: 1) Regular Premium, 2) Limited Premium (5, 10, 15 वर्षे), 3) Single Premium हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. आणि हे प्रीमियम फक्त सहामाही किंवा वार्षिक (yearly / half-yearly) पद्धतीने भारत येतात. या प्रीमियमचे दर; विमेदारचे वय, Smoking status, Gender, पॉलिसी टर्म, PPT, Death Benefit Option etc गोष्टींवर अवलंबून असेल.

उदा. श्री. सतीश नायर यांचे वय 35 आहे आणि त्यांनी इथून पुढे त्यांच्या वयाच्या 50 वर्षांसाठी (म्हणजे वयाच्या 85 पर्यँत) LICs Bima Kavach Plan इन्शुरन्स प्लॅन घेतला असेल, Leval Sum Assured अंतर्गत एकूण ₹2 CR चे लाईफ कव्हर सोबत ₹1 CR Accidental death cover घेत असतील तर त्यांना रेगुलर प्रीमियम पेमेंट साठी ₹77,000 वार्षिक प्रीमियम पुढील 50 वर्षांसाठी असेल, लिमिटेड प्रीमियम पेमेंट 15 वर्ष हा पर्याय निवडला तर ₹1,23,600 वार्षिक प्रीमियम असेल आणि सिंगल प्रीमियम पेमेंट साठी ₹11,21,200 एकदाच प्रीमियम भरावा लागेल.

ग्रेस पीरियड (Regular आणि Limited Premium साठी)

प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळतो. या काळात पॉलिसी इन-फोर्स राहते. 30 दिवसांचा ग्रेस पीरियड संपल्यानंतर, प्रीमियम न भरल्यास पॉलिसी Lapsed होते. त्यानंतर सर्व लाभ थांबतात पण आवश्यक कागदपत्रांसहित सर्व लाभ पुन्हा सुरु करता येतात.

रिव्हायवल (Revival)

ग्रेस पीरियडनंतर प्रीमियम न भरल्यास पॉलिसी lapse होते. लॅप्स झालेली पॉलिसी 5 वर्षांच्या आत revive करता येते. arrear प्रीमियम + व्याज भरावे लागते. Revival Interest Rate: 9.50% (compounding half-yearly)

LIC ला Revival स्वीकारणे/नाकारणे/modified terms देणे याचा अधिकार आहे. जर revival कालावधी संपला तर: LICs Bima Kavach Plan

  • Regular Premium → काहीही मिळत नाही
  • Limited Premium → किमान 2 किंवा 3 वर्षांचे प्रीमियम भरले असल्यास Unexpired Risk Premium Value मिळू शकते. रायडर revival फक्त बेस पॉलिसीसोबतच शक्य आहे.

पेमेंट थांबल्यास (Paid-Up):

या LICs Bima Kavach Plan योजनेअंतर्गत ‘पेड-अप व्हॅल्यू’ उपलब्ध नाही.

LICs Bima Kavach Plan
LICs Bima Kavach Plan

सरेंडर (Surrender):

या LICs Bima Kavach Plan योजनेअंतर्गत सरेंडर व्हॅल्यू उपलब्ध नाही. मात्र पुढील परिस्थितींमध्ये (Level Sum Assured – Option I आणि Increasing Sum Assured – Option II दोन्ही पर्यायांमध्ये) पॉलिसी सरेंडर केल्यास, शिल्लक अवधीसाठी असलेली “Unexpired Risk Premium Value” (असल्यास) दिली जाईल:

a) Regular Premium पॉलिसी: यामध्ये काहीही देय राहणार नाही.

b) Single Premium पॉलिसी: पॉलिसी टर्ममध्ये कधीही पॉलिसी सरेंडर केल्यास लागू असलेली Unexpired Risk Premium Value (असल्यास) दिली जाईल.

Also Read:-  LIC Saving Plans: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम LIC योजना, विमा आणि Savings दोन्हीचा लाभ! जाणून घ्या टॉप 5 प्लॅन्स.

c) Limited Premium Payment पॉलिसी:

लागू असलेली Unexpired Risk Premium Value (असल्यास) केवळ पुढील अटी पूर्ण झाल्यासच देय असेल:
i) Premium Paying Term 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास – सलग किमान 2 वर्षांचे प्रीमियम भरलेले असणे आवश्यक.
ii) Premium Paying Term 10 वर्षे किंवा अधिक असल्यास – सलग किमान 3 वर्षांचे प्रीमियम भरलेले असणे आवश्यक.

इन-फोर्स पॉलिसी सरेंडर केल्यास Unexpired Risk Premium Value (असल्यास) दिली जाईल आणि पॉलिसी समाप्त होईल.

लॅप्स झालेल्या पॉलिसीसाठी Unexpired Risk Premium Value (असल्यास) खालील घटनांमध्ये देय असेल आणि पॉलिसी समाप्त होईल:

  • पुनरुज्जीवन (Revival) कालावधीत बीमाधारकाचा मृत्यू झाल्यास; किंवा
  • पुनरुज्जीवन कालावधीत पॉलिसी सरेंडर केल्यास; किंवा
  • पुनरुज्जीवन कालावधी संपल्यानंतर पॉलिसी रिव्हाईव न केल्यास.

पॉलिसी कर्ज (Policy Loan):

या LICs Bima Kavach Plan योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध नाही.

चुकीची माहिती दिल्यास (Forfeiture):

या योजने मध्ये प्रपोजल फॉर्म, वैयक्तिक निवेदन, घोषणापत्र किंवा इतर कोणत्याही कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिली असल्यास किंवा महत्त्वाची माहिती लपविल्यास, पॉलिसी रद्द होईल. त्यावेळी मिळणारे लाभ “Insurance Act 1938” च्या सेक्शन 45 (सुधारित) अंतर्गत दिलेल्या तरतुदींनुसार मान्य राहतील.

पॉलिसी समाप्ती (Termination of Policy):

खालील पैकी कोणतीही घटना प्रथम घडताच पॉलिसी तत्काळ व आपोआप समाप्त होईल:

a) मृत्यू लाभाची एकरकमी रक्कम / शेवटची हप्त्याने दिलेली रक्कम देण्यात आलेल्या दिवशी
b) पॉलिसी सरेंडर केल्यावर Unexpired Risk Premium Value (असल्यास) दिलेल्या दिवशी
c) पॉलिसी मॅच्युरिटीच्या दिवशी
d) रिव्हायवल कालावधी संपल्यानंतर पॉलिसी रिव्हायवल न झाल्यास
e) फ्री लूक रद्द प्रक्रिया अंतर्गत देय रक्कम दिल्यानंतर
f) चुकीच्या माहितीमुळे पॉलिसी जप्त (Forfeiture) केल्यास.

कर (Taxes):

भारत सरकार किंवा संबंधित कर प्राधिकरणांनी या योजनेवर लागू केलेले कर, त्या-त्या वेळी लागू असलेल्या करकायद्यांनुसार पॉलिसीधारकाने प्रीमियम व्यतिरिक्त भरावे लागतील. प्रीमियम (बेस + रायडर + एक्स्ट्रा प्रीमियम, जर लागू असेल) यावर लागू कर स्वतंत्रपणे आकारला जाईल. भरलेला कर कोणत्याही लाभाच्या गणनेत समाविष्ट केला जाणार नाही.

LICs Bima Kavach Plan
LICs Bima Kavach Plan

या LICs Bima Kavach Plan पॉलिसीवर मिळणाऱ्या इन्कम टॅक्स लाभांविषयी किंवा कर परिणामांविषयी माहितीसाठी कृपया आपल्या कर सल्लागाराचा सल्ला घ्या.

फ्री लूक कालावधी (Free Look Period):

LICs Bima Kavach Plan पॉलिसीधारकास पॉलिसीच्या अटी व शर्ती समाधानकारक वाटत नसल्यास, पॉलिसी प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत पॉलिसी परत करू शकतात. पॉलिसी परत करताना असमाधानाचे कारण नमूद करावे. कॉर्पोरेशन पॉलिसी रद्द करून प्रीमियम परत करेल, त्यातून खालील कपाती केल्या जातील: कव्हर कालावधीसाठी लागणारा प्रोपोर्शनल रिस्क प्रीमियम, वैद्यकीय तपासणीचे खर्च (जर झाले असतील), स्टॅम्प ड्युटी शुल्क

LICs Bima Kavach Plan

LIC Bima Kavach ही आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत कुटुंबाला सर्वात मजबूत संरक्षण देणाऱ्या Pure Risk Life Insurance योजनांपैकी एक आहे. या योजनेची वैशिष्ट्ये; जसे की Level व Increasing Sum Assured पर्याय, उच्च कव्हर मिळण्याची क्षमता, महिलांसाठी विशेष दर, तसेच Premium Payment मधील लवचिकता योजना खरेदी करणाऱ्या प्रत्येकासाठी ती अत्यंत आकर्षक बनवतात.

या पॉलिसीमध्ये कोणतेही गुंतवणूक लाभ किंवा बोनस नसले तरी, मृत्यूच्या परिस्थितीत कुटुंबाला निश्चित आणि हमीदार आर्थिक साहाय्य मिळते, हे या योजनेचं सर्वात मोठं बलस्थान आहे. तसेच या योजनेत Non-Smoker / Smoker दरांची व्यवस्था, High Sum Assured Rebate आणि 100 वर्षांपर्यंत कव्हरेज यामुळे आधुनिक कुटुंबाच्या दीर्घकालीन संरक्षणाच्या गरजा पूर्णपणे भागतात.

जरी surrender value किंवा loan सुविधा उपलब्ध नसली तरी, संरक्षण मिळवण्याच्या उद्देशाने घेतली जाणारी ही योजना त्या दृष्टीने पूर्णपणे योग्य आणि उपयुक्त आहे. एकूणच, दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा, कमी प्रीमियममध्ये मोठा Life Cover आणि कुटुंबासाठी हमीदार संरक्षण हवे असेल, तर LIC Bima Kavach ही एक विश्वासार्ह, सुरक्षित आणि उपयोगी योजना ठरते. तुमच्या गरजा, प्रीमियम भरण्याची क्षमता आणि भविष्यातील जबाबदाऱ्या लक्षात घेऊन ही पॉलिसी योग्य पर्याय ठरू शकते.

LICs Bima Kavach Plan अधिक माहितीसाठी LIC च्या अधिकृत आयुर्विमा प्रतिनिधी / LIC शाखेशी संपर्क साधावा किंवा रायडरच्या ब्रॉशरचा संदर्भ घ्यावा: www.licindia.in

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

Leave a Comment