महाराष्ट्र शासनाचे Mahaegram Citizen Connect App: ग्राम पंचायतचे सर्व दाखले आता घरबसल्या डाउनलोड करा!

Mahaegram Citizen Connect App: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या रोजच्या ग्रामपंचात कार्यालयातील व्यवहारासाठी डिजिटल अप्लिकेशन प्लॅटफॉर्म सुरु केला असून, शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज्य विभागाने सुरु केलेला हा एक अभिनव डिजिटल उपक्रम आहे. या ॲपच्या मदतीने नागरिकांना ग्रामपंचायतीचे सर्व आवश्यक महत्त्वाचे ग्रामपंचायतीचे दाखले घरबसल्या मिळवता येतात. हे ॲप Android मोबाईलसाठी उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे. या लेखा मध्ये या ॲप संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, हा लेख संपूर्ण वाचा आणि इथून आपले ॲप डाउनलोड करून घ्या.

महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप मधून उपलब्ध सेवा.

ग्रामीण भागातील लोकांसाठी सुरु केलेल्या या अप्लिकेशन च्या माध्यमातून नागरिक पुढील सेवा मिळवू शकतात जसे कि ऑनलाइन दाखले म्हणजेच जन्म प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, मालमत्तेचे अस्सेसमेंट उतारे इ. आवश्यक दाखले त्वरित मिळवता येतात. हे ॲप डाउनलोड करून वापरण्यास सोपे आहे आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. या ॲपच्या च्या माध्यमातून नागरिक घरबसल्या घरपट्टी, पानीपट्टी व इतर कर ऑनलाइन भरू शकतात.

या ॲप मध्ये ग्रामपंचायतीचा अहवाल, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची माहिती उपलब्ध करून दिली आहे, याचसोबत ग्रामपंचायतीचे नियम, योजना आणि सूचना पेटी अशा अनेक पर्यायांचा लाभ या ॲप मध्ये मिळतो. हे दाखले नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतात, ज्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन वेळ खर्च करण्याची गरज कमी होते.

महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप कसे डाउनलोड करावे?

महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर जा, मोबाईलमधील Play Store मध्ये Mahaegram Citizen Connect App असे टाईप करा आणि सर्च बटन प्रेस करा.
  2. ॲप डाउनलोड करा: सर्च रिझल्टमध्ये Mahaegram Citizen Connect App ॲप दिसेल, त्यावर क्लिक करून ॲप डाउनलोड करा.
  3. नोंदणी करा: ॲप इन्स्टॉल झाल्यावर, त्यावर अकाऊंट तयार करून लॉगिन करा.
Also Read:-  Jeevan Utsav Yojana 2024: 1 लाख भरा 15 वर्षासाठी आणि मुलांना द्या 7 कोटी रु. संपूर्ण माहिती इथे पहा!

डाउनलोड लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum&pli=1

Mahaegram Citizen Connect App
Mahaegram Citizen Connect App

महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप मधून दाखले कसे मिळवावे?

एकदा महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप ॲपवर लॉगिन झाल्यानंतर, दाखले मिळवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:

  • होमपेजवर जाऊन ‘दाखले मिळवा’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्या हवे असलेले दाखले निवडा, जसे की जन्म प्रमाणपत्र, विवाह नोंदणी इत्यादी.
  • आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.
  • निवडलेले दाखले डाउनलोड करा.

महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप वापर करण्याचे फायदे.

  • वेळेची बचत: ग्रामीण भागातील नागरिकांना वेळोवेळी ग्रामपंचायतीत चकरा माराव्या लागत नाहीत.
  • सुलभ प्रक्रिया: ऑनलाईन पद्धतीमुळे दाखले पटकन मिळतात.
  • नागरिकांसाठी सोईचे: दूर असलेल्या गावकऱ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त साधन ठरले आहे.
  • पारदर्शकता: विविध प्रकारचे कर भरणा करणे आणि विविध दाखले मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक आहे.
  • घरबसल्या सुविधा: या ॲप द्वारे घरबसल्या सर्व प्रकारचे दाखले मिळवता येतात.

ग्रामपंचायतीसाठी उपयुक्तता

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीसाठी महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप ची खूप मोठी मदत होत आहे. या आपच्या माध्यमातून ग्रामपणाच्यातीचे ऑनलाइन कर संकलन केले जात आहे जसे कि गृहकर, पानीपट्टी, गाळे भाडे, गायरानातील कर आणि इतर विविध पद्धतीच्या करांची वसूली सोपी होत आहे.

या ॲप द्वारे जमा होणारी सर्व रक्कम थेट ग्रामपंचायतीच्या अधिकृत बँक खात्यात जमा होते, ज्यामुळे ग्रामपंचायतीमधील पारदर्शकता आणखीन वाढते. सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचा अहवाल पाहावयास मिळतो. ग्रामपंचायतीतील पदाधिकारी, सदस्य यांची सर्व माहिती या ॲप मध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रशासनातील पारदर्शकता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे..

Also Read:-  LIC Children's Money Back Plan: सह आपल्या मुलांचे उज्ज्वल करा भविष्य, LIC ची अप्रतिम विमा योजना.

निष्कर्ष: Mahaegram Citizen Connect App

या ॲप चा वापर ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरनारा आहे. यामुळे ग्रामपंचायतीची पारदर्शकता वाढली आहे आणि वेळेची बचत होत आहे. या ॲपच्या मदतीने नागरिकांना घरबसल्या त्यांचे आवश्यक दाखले व प्रमाणपत्रे मिळतात. Mahaegram Citizen Connect App हे महाराष्ट्र शासनाचे एक प्रभावी पाऊल आहे जे ग्रामीण विकासाच्या दिशेने एक मोठी कामगिरी मानली जात आहे.

FAQs

महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप वापरायला कोणासाठी उपयुक्त आहे?

हा ॲप सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना, विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे.

App वर कोणते दाखले उपलब्ध आहेत?

या ॲपवर जन्म प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, मृत्यू प्रमाणपत्र यांसारखे दाखले मिळतात.

महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप सुरक्षित आहे का?

होय, महा-इ-ग्राम सिटीजन कनेक्ट ॲप सुरक्षित आहे आणि महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या विकसित केले आहे.

हे ॲप वापरण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत?

नोंदणी करताना ओळखपत्र व आवश्यक माहिती द्यावी लागते.

Contact us
WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now