Monsoon Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मान्सूनचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पडला आहे. गोवा, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ,नागपूर आणि खानदेश या भागात मान्सून पोहोचायला हवा होता पण अजूनही हवा तसा वेग नाही. या समस्येमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता पुढील आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रात बहुतांश भागात उष्णतेच्या लाटा पासून दिलासा मिळणे शक्यता आहे. येत्या काही दिवसात Monsoon Alert मान्सूनचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
कोकण घाट माथ्यावर वाढणार पावसाचा जोर
Monsoon Alert भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD नुसार शुक्रवारी 21 जून पासून सुमारे दहा दिवसाच्या अंतरानंतर मान्सूनचे कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, गोवा या भागामध्ये पावसाने सुरुवात केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असून, दक्षिण कोकणात मात्र जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.
नैऋत्य मोसमी वारे मान्सून सक्रिय होऊ लागल्याने किनारपट्टी लगत ढगांची दाटी झाली आहे. कोकणात पावसाचा जोर वाढू लागला आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. आज (ता. 23) पासून कोकण घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे, तर विदर्भात पाऊस जोर धरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शनिवार (ता. 22) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली दिसून आले. रत्नागिरीतील मंडणगड येथे राज्यातील सर्वाधिक 205 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाने हजेरी लावली.
शनिवारी (ता. 22) राज्यात कोरडे हवामान होते. विदर्भासह मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली होती. पावसाची दडी असली तरी ऊन सावल्यांचा खेळात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम होता. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (येलो अलर्ट) इशारा सह रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) इशारा आहे. विदर्भात काही ठिकाणी जोरदार व उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, गडचिरोली पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट सांगितला आहे.
पुढील 48 तासात देशातील हवामानाचा Monsoon Alert अंदाज
Monsoon Alert हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 48 तासात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, दक्षिण ओडीसा, कोकण आणि गोवा किनारपट्टी, कर्नाटक, केरळ आणि अंदमान निकोबार मध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या सोबतच मध्य महाराष्ट्र आंध्रप्रदेश उत्तर किनारा आणि गुजरात उत्तर, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, लक्षदीप आणि इतर ईशान्य भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे.
100 मिलि पेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाण
मंडणगड 205, वाकवली 150, सावर्डे 148, सुधागड पाली 116.
पुढील 24 तासात हवामानाचा अंदाज
आज तापमान 38.59 अंश सेल्सिअस आहे. आज किमान तापमान 30.5°c आणि कमाल तापमान 25.54, आद्रता 32% आणि वाऱ्याचा वेग 32 किलोमीटर ताशी आहे. संध्याकाळ नंतर पावसाची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या पाच-सहा दिवसात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामानाच्या अधिक माहितीसाठी https://mausam.imd.gov.in या वेबसाईट वरती अपडेट पाहू शकता.