LIC Jeevan Umang Plan Details: वाट बघू नका रिटायरमेंटची, आजच तरतूद करा पेन्शनची; जाणून घ्या 8% दराने आयुष्य भर पेन्शन कशी मिळेल?

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

LIC Jeevan Umang Plan Details: आपल्या भारत देशात सर्वच नागरिक LIC INDIA म्हणजेच “लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन” कडे एक सुरक्षित गुंतवणूक करून देणारी संस्था म्हणून पाहतात. LIC नेहमीच लहान मुले, वृद्ध लोक, महिला आणि वेगवेगळ्या उत्पन्न गटातील सर्व व्यक्ती यांचा विचार करून नवनवीन चांगल्या योजना बाजारात आणत असते.

या योजना गुंतवणुकीसाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर असतात. जर तुम्हाला तुमच्या भविष्याच्या दृष्टीने दीर्घ काळासाठी म्हणजेच अनेक वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला LIC ची एक खास योजना, एलआयसी जीवन उमंग योजना संदर्भात सांगणार आहोत.

या LIC Jeevan Umang Plan Details लेखामध्ये आपण ‘एलआयसी जीवन उमंग योजना‘ या पेन्शन योजनेची सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. ही योजना उतारवयात म्हणजेच म्हातारपणात खूप उपयोगी ठरणारी आहे. वृद्धापकाळात सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे दर महिन्याला मिळणाऱ्या नियमित पैशांची, म्हणजेच पेन्शनची आणि या योजनेमध्ये आपल्या सर्व गरज पूर्ण होणार आहेत.

म्हणूनच ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर का आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. यामध्ये आम्ही या योजनेचे फायदे, अटी, आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सर्व सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.

LIC jeevan umang plan details
LIC Jeevan Umang Plan Details: pension

एलआयसी जीवन उमंग योजना का निवडावी?

एलआयसी जीवन उमंग योजना ही एक अनोखी योजना आहे, जी जीवनभर आर्थिक सुरक्षिततेची खात्री देते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला नियमित पेन्शनसोबतच लाईफ कव्हरचा लाभ मिळतो. म्हणजेच वृद्धापकाळात तुम्हाला स्थिर उत्पन्न मिळतं आणि कुटुंबालाही विमा संरक्षण मिळतं.

सरकारी नोकरीतील निश्चित पेन्शन बंद झाल्यामुळे आज प्रत्येकाला स्वतःसाठी दीर्घकालीन योजना आवश्यक आहे. LIC जीवन उमंग योजना यात योग्य पर्याय ठरते कारण ही योजना 100 वर्षांपर्यंत संरक्षण देते आणि दरवर्षी 8% दराने पेन्शनची हमी देते.

LIC जीवन उमंग योजना ही केवळ विमा नसून, करसवलत, नियमित उत्पन्न आणि कुटुंबाला आर्थिक सुरक्षिततेचं कवच देणारी आजीवन योजना आहे. या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल, तितकं भविष्यातील आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत बनेल.

सर्वांसाठी उपयुक्त योजना

ही योजना शासकीय कर्मचारी, खाजगी क्षेत्रातील कामगार, शेतकरी, छोटे उद्योजक, कलाकार किंवा लेखक अशा सर्वांसाठी उपयुक्त आहे. एकदा प्रीमियम भरणे पूर्ण झाल्यावर दरवर्षी “सर्वायवल बेनिफिट” मिळतो आणि शेवटी पॉलिसी परिपक्व झाल्यावर मोठी करमुक्त रक्कम हातात येते. LIC Jeevan Umang Plan Details

LIC जीवन उमंग योजना ही प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त अशी अष्टपैलू योजना आहे. नवजात बाळासाठी गिफ्ट म्हणूनही ती घेता येते आणि त्यातून भविष्यात मोठा आर्थिक आधार तयार होतो. तसेच तरुण, नोकरदार, मध्यमवर्गीय आणि निवृत्तीची योजना करणाऱ्यांसाठी ही योजना आयुष्यभर नियमित पेन्शन देणारा विश्वासार्ह पर्याय आहे.

भविष्यासाठी खात्रीशीर सुरक्षितता

जीवन उमंग योजना फक्त विमा नाही, तर भविष्यासाठी एक विश्वासार्ह गुंतवणूक आहे. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न, मुलांच्या शिक्षण-लग्नासाठी मोठी रक्कम आणि संपूर्ण कुटुंबाला सुरक्षिततेचा कवच – हे सर्व एका योजनेत मिळते. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना निश्चितच उत्तम पर्याय ठरते.

वय आणि प्रवेश मर्यादा

ही योजना पुरुष आणि महिला दोघांसाठी उपलब्ध असून, वय 0 ते 55 वर्षांपर्यंत कोणीही ती घेऊ शकतो. म्हणजेच बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना तिचा लाभ घेता येतो. ही लवचिकता ही योजनेचं मोठं वैशिष्ट्य आहे.

LIC Jeevan Umang Plan Details
LIC Jeevan Umang Plan Details

प्रीमियम भरण्याची सोय

LIC जीवन उमंग योजनेत ग्राहकाला प्रीमियम भरण्यासाठी वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक हप्ता असे अनेक पर्याय दिले आहेत. याशिवाय, ऑनलाईन बँकिंग, ECS किंवा सेविंग अकाउंटमधून ऑटोमॅटिक कट अशा डिजिटल सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे वेळ वाचतो आणि पॉलिसी कायम सुरु राहते.

Also Read:-  LIC Saral Jeevan Yojana: प्रमुख वैशिष्ट्ये, कर लाभ, प्रीमियम, संपूर्ण माहिती पहा

करसवलतीचे फायदे

या योजनेत गुंतवणूक केल्यास भरलेले प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलतीस पात्र ठरतात. एका वर्षात 1,50,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करून कर बचत करता येते. शिवाय पेंशन, बोनस आणि परिपक्वतेवेळी मिळणारी रक्कम हे सर्व परतावे कलम 10(10D) अंतर्गत पूर्णपणे करमुक्त असतात. LIC Jeevan Umang Plan Details

पेन्शनची रक्कम कशी ठरते?

तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या आजच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. तुम्ही भविष्यात कोणत्या वयापासून आणि किती रक्कम हवी आहे हे ठरवल्यानंतर LIC त्यानुसार प्रीमियमची गणना करते. त्यामुळे योग्य नियोजन करून गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळात स्थिर आणि विश्वासार्ह उत्पन्नाची हमी मिळते.

LIC जीवन उमंग योजना ही दीर्घकालीन पेन्शन योजना आहे ज्यामध्ये ठराविक कालावधीत तुम्ही हप्त्यांद्वारे प्रीमियम भरता. या प्रीमियमवर LIC बोनस व व्याजाची जोड देते आणि त्यातून पुढे तुम्हाला नियमित पेन्शन मिळते. त्यामुळे ही योजना निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न शोधणाऱ्यांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.

गुंतवणुकीचे उदाहरण

जर एखाद्या 35 वर्षांच्या स्त्री किंवा पुरुष आयुर्विमा धारकांकडून LIC जीवन उमंग योजना निवडली असेल आणि त्यांना वयाच्या 50 व्या वर्षापासून नियमित पेन्शन घ्यायची असेल, तर त्यांना ₹25,00,000 विमा रक्कम साठी 15 वर्षे प्रीमियम भरावा लागेल. LIC Jeevan Umang Plan Details

या 15 वर्षांच्या कालावधीत त्यांना प्रत्येक वर्षी ₹2,00,656 इतका प्रीमियम भरावा लागेल. अशा प्रकारे, त्यांच्याकडून एकूण ₹30,09,840 इतकी रक्कम LIC मध्ये प्रीमियम स्वरूपात जमा होईल.

यानंतर जेव्हा विमेदार 50 वर्षांचा होईल, तेव्हापासून त्याला दरवर्षी ₹2,00,000 पेन्शन मिळायला सुरुवात होईल. ही रक्कम दर महिन्याला सुमारे ₹16,666 इतकी होते. या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे, ही पेन्शन त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर मिळत राहते. म्हणजेच, एकदा पेन्शन सुरु झाल्यावर ती त्याच्या हयातीपर्यंत चालूच राहते म्हणूनच त्यांच्या उतारवयात आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते.

मॅच्युरिटीचा मोठा फायदा

या योजनेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे विमा धारकांचे 100 वर्ष वय पूर्ण झाल्यावर LIC एक मोठी मॅच्युरिटी रक्कम देते. या उदाहरणात ती रक्कम ₹2,06,37,500 इतकी आहे. महत्वाचं म्हणजे, ही मॅच्युरिटी रक्कम, आपणास मिळालेल्या पेन्शनपासून पूर्णपणे वेगळी असते. म्हणजेच दरवर्षी मिळणाऱ्या पेन्शनच्या जोडीला शेवटी एक मोठी रक्कम कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मिळते.

जीवन उमंग योजना फक्त पेन्शन देणारी नाही तर भविष्यासाठी संपत्ती निर्माण करणारी योजना आहे. नियमित पेन्शन, बोनस, करमुक्त मॅच्युरिटी आणि आयुष्यभराचं संरक्षण; हे सर्व एका योजनेत मिळाल्यामुळे ती प्रत्येक गुंतवणूकदारासाठी फायदेशीर ठरते.

LIC Jeevan Umang Plan Details
LIC Jeevan Umang Plan Details

LIC जीवन उमंग योजनेतील सरेंडरची सोय

LIC जीवन उमंग योजना ही दीर्घकालीन पेन्शन देणारी लाभदायी योजना आहे. मात्र, जर काही कारणास्तव तुम्हाला योजना बंद करायची गरज भासली, तर LIC सरेंडरचा लवचिक पर्याय उपलब्ध करून देते. यामुळे ग्राहकाला गरजेनुसार एकरकमी रक्कम मिळवण्याची संधी मिळते.

Also Read:-  Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: महाराष्ट्र सरकार वरिष्ठ नागरिकांना देत आहे ₹3,000, ते पण मोफत!

जर तुम्ही 15 वर्षे नियमित प्रीमियम भरल्यानंतर काही काळ पेन्शन घेतली असेल आणि पुढे योजना बंद करायची ठरवली, तर LIC तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू देते. यात तुम्ही भरलेली एकूण प्रीमियम रक्कम आणि त्यावर मिळालेला बोनस किंवा व्याजाचा समावेश असतो. विशेष म्हणजे, आधी मिळालेली पेन्शन यामधून वजा केली जात नाही.

LIC जीवन उमंग योजनेतील पर्यायी राइडर (Rider) फायदे

या योजनेअंतर्गत अतिरिक्त प्रीमियम भरून तुम्हाला चार प्रकारचे राइडर मिळू शकतात. परंतु, पॉलिसीधारक खालीलप्रमाणे निवड करू शकतो:

Accidental Death and Disability Benefit Rider किंवा Accident Benefit Rider, तसेच उरलेले दोन राइडर पात्रतेनुसार निवडले जाऊ शकतात. LIC Jeevan Umang Plan Details

1. Accidental Death and Disability Benefit Rider

हा राइडर पॉलिसी सुरू असताना प्रीमियम भरण्याच्या कालावधीत कधीही घेता येतो, वय 70 वर्षांपर्यंत हा राइडर उपलब्ध आहे. या रायडर मध्ये अपघातामुळे मृत्यू झाल्यास Accident Benefit Sum Assured एकत्र रक्कमेत दिली जाते.

या सोबत विमाधारकाला अपघातामध्ये एखादा अवयव गमवावा लागला तर तिथून पुढचे सर्व हप्ते माफ केले जातात आणि विमा पॉलिसी, प्रीमियम न भरता चालूच राहते

2. Accident Benefit Rider

हा राइडर पॉलिसी सुरू असताना प्रीमियम भरण्याच्या कालावधीत कधीही घेता येतो, हा राइडर फक्त प्रीमियम भरण्याच्या कालावधीपर्यंतच उपलब्ध आहे. अपघातामुळे मृत्यू झाल्यास Accident Benefit Sum Assured एकत्र रक्कम नॉमिनीला दिली जाते. LIC Jeevan Umang Plan Details

3.New Term Assurance Rider

ही राइडर फक्त पॉलिसी सुरू करताना घेता येतो. या राइडरची मुदत 35 वर्षे किंवा Life Assured वय 75 वर्षे होईपर्यंत असते, जे आधी असेल ते लागू. Death झाल्यास मूळ विमा रकमेसोबत Term Rider Sum Assured रक्कम दिली जाते.

4. Premium Waiver Benefit Rider

हा राइडर Base Policy सुरू असताना, पॉलिसी अ‍ॅनिव्हर्सरीच्या दिवशी आणि प्रीमियम भरण्याच्या कालावधीत कधीही घेता येतो. लहान मुलांसाठी हा राइडर मिळू शकतो. विमा कालावधीमध्ये जर proposer चा मृत्यू झाला, तर Base Policy चे प्रीमियम राइडर कालावधीत माफ केले जातात आणि पॉलिसी पूर्ण रकमेसाठी चालू राहते

LIC Jeevan Umang Plan Details

LIC जीवन उमंग योजना ही केवळ एक विमा पॉलिसी नसून, भविष्यासाठीचा एक सुरक्षित आर्थिक आधार आहे. या योजनेत प्रीमियम भरण्याच्या शिस्तबद्ध प्रक्रियेनंतर आयुष्यभरासाठी पेन्शनचा लाभ मिळतो, तसेच शेवटी मोठी मॅच्युरिटी रक्कमही मिळते. त्यामुळे नियमित उत्पन्नाची खात्री, कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण आणि निवृत्तीनंतरही स्थिर जीवन हे सर्व एका योजनेत साध्य होते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि निश्चिंत भविष्याच्या दृष्टीने ही योजना प्रत्येक गुंतवणूकदारासाठी उपयुक्त ठरते.

LIC Jeevan Umang Plan Details: अधिक माहितीसाठी कृपया www.licindia.in या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्याच शाखेला भेट द्या.

Leave a Comment