LIC Jeevan Umang Plan Details: वाट बघू नका रिटायरमेंटची, आजच तरतूद करा पेन्शनची; जाणून घ्या 8% दराने आयुष्य भर पेन्शन कशी मिळेल?

LIC Jeevan Umang Plan Details: आपल्या भारत देशात सर्वच नागरिक LIC INDIA म्हणजेच “लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन” कडे एक सुरक्षित गुंतवणूक करून देणारी संस्था म्हणून पाहतात. LIC नेहमीच लहान मुले, वृद्ध लोक, महिला आणि वेगवेगळ्या उत्पन्न गटातील सर्व व्यक्ती यांचा विचार करून नवनवीन चांगल्या योजना बाजारात आणत असते.

या योजना गुंतवणुकीसाठी खूप उपयुक्त आणि फायदेशीर असतात. जर तुम्हाला तुमच्या भविष्याच्या दृष्टीने दीर्घ काळासाठी म्हणजेच अनेक वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला LIC ची एक खास योजना एलआयसी जीवन उमंग योजना संदर्भात सांगणार आहोत.

या LIC Jeevan Umang Plan Details लेखामध्ये आपण ‘एलआयसी जीवन उमंग योजना‘ या पेन्शन योजनेची सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. ही योजना उतारवयात म्हणजेच म्हातारपणात खूप उपयोगी ठरणारी आहे. वृद्धापकाळात सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे दर महिन्याला मिळणाऱ्या नियमित पैशांची, म्हणजेच पेन्शनची आणि या योजनेमध्ये आपल्या सर्व गरज पूर्ण होणार आहेत.

म्हणूनच ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर का आहे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. यामध्ये आम्ही या योजनेचे फायदे, अटी, आणि अर्ज करण्याची प्रक्रिया सर्व सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.

एलआयसी जीवन उमंग योजना का निवडावी?

LIC ची उमंग योजना ही एक अशी खास योजना आहे, जी तुमच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी खूप उपयुक्त ठरते. ही योजना तुम्हाला जीवनभर पेन्शन देण्याची सुविधा देते, ज्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक अडचण येत नाही. तसेच ही योजना लवकर गुंतवणूक सुरू करून भविष्यासाठी बचत करण्याची संधी देते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, हि योजना तुमच्यासाठी एकत्र लाईफ कव्हर आणि पेन्शन या दोन्हीचा लाभ निर्माण करते.

म्हणूनच जर तुम्हाला दीर्घकाळासाठी एक खात्रीशीर आणि फायदेशीर योजना शोधायची असेल, जी तुमच्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवेल आणि म्हातारपणात तुम्हाला नियमित उत्पन्न देईल, तर LIC उमंग योजना ही एक चांगला पर्याय ठरू शकते.

IC ची जीवन उमंग योजना ही निवडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. कोणतीही विमा पॉलिसी घेताना, फक्त जाहिराती किंवा इतर लोक काय म्हणतात यावर भर न देता, आपण स्वतःच्या गरजा, भविष्याची योजना आणि उपलब्ध पर्याय यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या विमा योजना उपलब्ध आहेत, पण त्यातील कोणती योजना आपल्या गरजांनुसार योग्य आहे, हे समजून घेण्यासाठी त्या प्रत्येक योजनेचे फायदे, अटी आणि परतावा यांची माहिती असणे गरजेचे आहे. LIC Jeevan Umang Plan Details

2004 मध्ये भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर नव्याने सरकारी सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे निश्चित पेन्शन मिळण्याची सुविधा बंद करण्यात आली. म्हणजेच आता सरकारी नोकरीतील कर्मचारी असोत, की इतर कोणतेही नोकरदार असोत, कोणालाच वृद्धापकाळात आपोआप पेन्शन मिळणार नाही. अशा वेळी आपल्याला स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी दीर्घकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक योजना निवडावी लागते, ज्यातून भविष्यात नियमित उत्पन्न मिळू शकेल.

LIC jeevan umang plan details
LIC Jeevan Umang Plan Details: pension

हीच गरज ओळखून भारत सरकारच्या मालकीची आयुर्विमा कंपनी एलआयसी (LIC – Life Insurance Corporation of India) ने अशा काही खास योजनांची सुरुवात केली, ज्यामधून ग्राहकांना आजीवन संरक्षणासोबतच नियमित उत्पन्नाचीही खात्री मिळते. LIC Jeevan Umang योजना ही त्यापैकीच एक अत्यंत लोकप्रिय आणि फायदेशीर योजना आहे.

ही LIC Jeevan Umang Plan Details योजना एलआयसीने शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, खाजगी क्षेत्रातील कामगार, शेतकरी, छोटे व्यवसाय करणारे, कलाकार, लेखक अशा सर्वसामान्य लोकांच्या गरजेनुसार बनवलेली आहे. विशेष म्हणजे ही योजना वार्षिक 8% व्याजदराच्या परताव्याची हमी देते. म्हणजेच यामध्ये गुंतवणूक केल्यावर प्रत्येक वर्षी तुम्हाला ठराविक रक्कम पेंशन स्वरूपात मिळते, तीही जीवनभर.

जर तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असेल, जसे की निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार, तर LIC Jeevan Umang Plan ही एक उत्तम पर्याय असू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, पॉलिसीधारकाला वयाच्या 100 वर्षांपर्यंत आर्थिक सुरक्षा मिळते. हे या योजनेचे एक मोठे वैशिष्ट्य आहे.

जीवन उमंग योजना ही एक आजीवन विमा योजना (Whole Life Insurance Plan) आहे, ज्याचा मुख्य उद्देश तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि संरक्षण देणे आहे. ही योजना दीर्घकालीन असून, तुम्ही सर्व प्रीमियम भरून झाल्यानंतरदेखील, तुम्हाला दरवर्षी “सर्वायवल बेनिफिट” मिळत राहतो, जोपर्यंत पॉलिसी परिपक्व होत नाही तोपर्यंत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसी परिपक्व झाल्यावरती शेवटी, म्हणजेच पॉलिसीच्या मुदतपूर्ती नंतर पॉलिसी धारकास एक मोठी रक्कम (Maturity Amount) एकत्र मिळते. ही रक्कम तुम्ही भविष्याच्या गरजांसाठी, जसे की अपत्यांचे शिक्षण, लग्न, निवृत्तीनंतरचा खर्च, यासाठी वापरू शकता.

या योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त आहे, आणि तिथून पुढे शंभर वयापर्यंत आयुष्यभरासाठी जोखीम कवच उपलब्ध होते आणि घेतल्या गेलेल्या विमा रकमेवर 8% वार्षिक दराने पेंशन दिली जाते जी हयाती पर्यंत आहे. ही योजना विमा संरक्षण, नियमित उत्पन्न, आणि भविष्याचा आर्थिक आत्मविश्वास या तीनही गोष्टी एकत्र देणारी आहे.

ही योजना कोण खरेदी करू शकतो

LIC Jeevan Umang योजना ही एक अष्टपैलू आणि सर्व वयोगटासाठी उपयुक्त असलेली विमा योजना आहे. ही योजना केवळ एक विमा पॉलिसी नसून, ती तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी एक मजबूत पाठबळ बनू शकते. ही योजना इतकी लवचिक आहे की, ती आपण नवजात बाळासाठी एक भविष्य सुरक्षित करणारी गिफ्ट म्हणून देऊ शकतो. लहान वयात ही योजना घेतल्यास, त्याचा फायदा दीर्घकालीन मिळतो आणि बाळ मोठं झाल्यावर त्याला मोठा आर्थिक आधार तयार होतो.

तसेच ही योजना तरुण, मध्यमवर्गीय, नोकरदार वर्ग आणि स्वतःच्या निवृत्तीचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. कारण या योजनेमधून आयुष्यभर पेंशन मिळवण्याची सोय आहे. त्यामुळे, वय वाढल्यावर कमाई थांबली तरीही दरवर्षी उत्पन्नाचा स्रोत चालू राहतो. ही योजना स्वतःच्या भविष्यासाठी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी एक शाश्वत आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो. LIC Jeevan Umang Plan Details

LIC जीवन उमंग योजना ही पुरुष व महिला दोघांसाठी खुली असून, वय 0 (शून्य) वर्षांपासून 55 वर्षांपर्यंत कोणीही ही पॉलिसी घेऊ शकतो. म्हणजेच ही योजना अगदी नवजात बालकांपासून ते प्रौढ व्यक्तींनाही उपलब्ध आहे.

LIC Jeevan Umang Plan Details
LIC Jeevan Umang Plan Details

या योजनेमध्ये प्रीमियम भरण्याचे अनेक पर्याय LIC ने दिले आहेत. प्रत्येक ग्राहक आपल्या सोयीप्रमाणे प्रीमियम वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक हप्त्यांमध्ये भरू शकतो. इतकेच नव्हे तर, प्रीमियम भरताना डिजिटल सोय देखील देण्यात आलेली आहे – म्हणजेच तुम्ही ऑनलाईन बँकिंग, ECS सुविधा किंवा सेविंग बँक खात्यातून ठराविक तारखेला प्रीमियम कट करून ही योजना कायम चालू ठेवू शकता. त्यामुळे वेळ वाचतो आणि प्रीमियम वेळेवर भरण्यासाठी धावपळ करण्याची गरज राहत नाही.

या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे करसवलत (Tax Benefit). जीवन उमंग पॉलिसी अंतर्गत भरलेले सर्व प्रीमियम हे भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र ठरतात. तुम्ही एका आर्थिक वर्षात LIC जीवन उमंग योजनेमध्ये रु. 1,50,000 पर्यंत गुंतवणूक करून त्यावर आयकरातून सूट घेऊ शकता. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित ठेवल्या जातात आणि त्यावर कर देखील लागत नाही. LIC Jeevan Umang Plan Details

याशिवाय, ही योजना केवळ प्रीमियमवर करसवलत देत नाही, तर या योजनेतून मिळणारे पेंशन, बोनस आणि परिपक्वतेवेळी मिळणारी एकरकमी रक्कम हे सर्व मिळकती देखील आयकर कायद्यातील कलम 10(10D) अंतर्गत पूर्णतः करमुक्त (Tax Free Returns) असतात. याचा अर्थ असा की तुम्ही या योजनेतून जे काही परतावा मिळवाल, त्यावर कोणताही कर लागणार नाही.

म्हणजे, LIC Jeevan Umang Plan ही केवळ एक विमा योजना नसून, भविष्यासाठी एक आर्थिक सुरक्षा कवच, करसवलतीचा पर्याय आणि जीवनभर नियमित उत्पन्न मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्ही लवकरात लवकर ही योजना घेतल्यास भविष्यातील अनेक आर्थिक अडचणींपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.

LIC जीवन उमंग योजनेतून पेन्शन मिळवण्यासाठी आवश्यक टप्पे आणि माहिती

जर तुम्हाला भविष्यात नियमित पेन्शन मिळवायची असेल, तर सर्वप्रथम LIC Jeevan Umang Plan मध्ये योग्य पद्धतीने आणि वेळेवर प्रीमियम स्वरूपात एक ठराविक रक्कम गुंतवावी लागते. ही गुंतवणूक तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एकदा का तुम्ही ठराविक कालावधीपर्यंत ही प्रीमियमची रक्कम भरायला सुरुवात केली, की त्यानंतर तुम्हाला निवडलेल्या कालावधीच्या शेवटी दरवर्षी नियमितपणे पेन्शन मिळू लागते.

एलआयसीच्या जीवन उमंग योजनेत प्रीमियम भरण्याची सुविधा वार्षिक (Yearly), सहामाही (Half-Yearly), तिमाही (Quarterly) किंवा मासिक (Monthly) अशा अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आणि सोयीनुसार प्रीमियम भरू शकतो. ही लवचिकता ग्राहकासाठी अतिशय उपयुक्त ठरते.

या योजनेतील प्रीमियम भरण्याची मुदत म्हणजेच Premium Payment Term (PPT) ही LIC ने ठरवलेली आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये ही मुदत 15 वर्षांपर्यंत असते, म्हणजेच तुम्हाला सलग 15 वर्षे ठराविक प्रीमियम भरावा लागतो. ही कालमर्यादा संपल्यावर, LIC तुमच्यासाठी दरवर्षी एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात द्यायला सुरुवात करते.

पेन्शन किती मिळेल हे ठरवण्यासाठी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आजपासून किती वर्षांनंतर पेन्शन सुरू करायची आहे आणि तेव्हा तुम्हाला दरवर्षी किती रक्कम हवी आहे, हे ठरवणे आवश्यक असते. त्यानुसार, तुम्हाला आजपासून भरावयाची प्रीमियमची रक्कम LIC तुमच्यासाठी कॅल्क्युलेट करते. म्हणजेच, तुमच्या भविष्यातील पेन्शनच्या आकड्यावर तुमच्या आताच्या गुंतवणुकीची रक्कम अवलंबून असते.

LIC जीवन उमंग योजनेमध्ये प्रीमियम, व्याज आणि पेन्शन यांचा परस्पर संबंध

LIC Jeevan Umang Plan ही एक दीर्घकालीन आणि अष्टपैलू पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये आपण ठराविक हप्त्यांमध्ये म्हणजेच हप्ता पद्धतीने काही रक्कम एलआयसी कडे गुंतवणूक स्वरूपात जमा करतो. ही गुंतवणूक म्हणजेच प्रीमियमची रक्कम एकत्र करून त्यावर LIC ठराविक व्याज (बोनस) जुळवते आणि त्यातूनच पुढे तुम्हाला दरवर्षी किंवा दरमहा पेन्शन स्वरूपात निश्चित उत्पन्न देण्यात येते. ही योजना खास करून अशा व्यक्तींसाठी उपयुक्त आहे, ज्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची आवश्यकता आहे.

उदाहरणादाखल पाहूया: समजा कोणताही एक पुरुष किंवा स्त्री वय वर्षे 35 असलेला आहे आणि त्याला/तिला वयाच्या 50व्या वर्षापासून पेन्शन सुरू हवी आहे. अशा वेळी त्याने LIC Jeevan Umang Plan अंतर्गत 15 वर्षांच्या कालावधीत प्रीमियम भरून ठेवायचा आहे. या कालावधीत, म्हणजेच 15 वर्षे, त्याला खालीलप्रमाणे हप्ता भरावा लागतो: LIC Jeevan Umang Plan Details

  • पहिल्या वर्षी: ₹2,09,686 वार्षिक प्रीमियम
  • दुसऱ्या वर्षीपासून पुढे: ₹2,05,171 वार्षिक प्रीमियम
  • एकूण 15 वर्षांत LIC मध्ये जमा होणारी रक्कम: ₹30,82,080

ही संपूर्ण रक्कम LIC मध्ये सुरक्षित ठेवली जाते आणि त्यावर दरवर्षी बोनस आणि व्याज जमा होत राहतो. प्रीमियमचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 50व्या वर्षापासून, संबंधित पॉलिसीधारकास दरवर्षी ₹2,00,000 इतकी पेन्शन सुरू होते. हि पेन्शन रक्कम जर दर महिन्याला घेतली तर प्रत्येक महिना ₹16,666 रुपये तहयात म्हणजेच मृत्यूपर्यंत दिली जाईल. ही पेन्शन तुमच्या हयातभर चालू राहते, तुमचे वय कितीही झाले तरीही! LIC Jeevan Umang Plan Details

योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे पॉलिसी धारक 100 वर्षांचा झाल्यावर, या योजनेची मुदत संपते आणि त्यावेळी LIC एक मोठी रक्कम, म्हणजेच ₹2,06,37,500 मॅच्युरिटी रक्कमच्या स्वरूपात प्रदान करते. ही रक्कम म्हणजे तुमच्या सर्व प्रीमियम्स व बोनस यांची एकत्रित परतफेड आहे, जी तुमच्या कुटुंबाला एक आर्थिक बळकटी देते.

महत्वाची बाब म्हणजे, ही मॅच्युरिटी रक्कम आणि दरवर्षी मिळणारी पेन्शन रक्कम या पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणजेच तुम्ही ज्या रकमेचे पेन्शन दरवर्षी घेत आहात, त्या व्यतिरिक्त तुम्हाला शेवटी एक प्रचंड रक्कम मॅच्युरिटी स्वरूपात मिळते. त्यामुळे ही योजना केवळ पेन्शनसाठीच नव्हे, तर भविष्यातील संपत्ती निर्माण करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरते.

LIC Jeevan Umang Plan Details
LIC Jeevan Umang Plan Details

LIC जीवन उमंग योजनेत सरेंडरचा पर्याय: गरजेनुसार योजना बंद करण्याची सोय

LIC Jeevan Umang योजना ही दीर्घकालीन आणि शाश्वत फायदे देणारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही पंधरा वर्षांपर्यंत ठराविक रक्कम प्रीमियम स्वरूपात भरून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. ही योजना मुख्यतः आयुष्यभर पेन्शन देण्यासाठी आखलेली असली तरी, काही अपरिहार्य कारणांमुळे जर तुम्हाला योजना बंद (सरेन्डर) करावी लागली, तर LIC त्यासाठीही एक लवचिक आणि पारदर्शक पर्याय उपलब्ध करून देते. LIC Jeevan Umang Plan Details

या योजनेनुसार, तुम्ही जर 15 वर्षे नियमित प्रीमियम भरल्यानंतर काही काळ पेन्शन घेतली असेल आणि त्यानंतर तुम्हाला योजना बंद करायची असेल, तर तुम्ही ही योजना सरेंडर करू शकता. ही सुविधा विशेषतः त्या वेळेस उपयुक्त ठरते, जेव्हा योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला एकरकमी मोठी रक्कम हवी असते, किंवा पुढे प्रीमियम भरण्यात अडचण निर्माण होते.

योजना सरेंडर करताना LIC तुमच्याकडून घेतलेल्या एकूण प्रीमियम्सवर आधारित एक निश्चित सरेंडर व्हॅल्यू (Surrender Value) प्रदान करते. यामध्ये तुम्ही भरलेली मुद्दल (Premium Paid) आणि त्यावर मिळालेलं बोनस किंवा व्याज यांचा समावेश असतो. विशेष बाब म्हणजे, या सरेंडर व्हॅल्यूमधून तुम्ही आधी घेतलेली पेन्शन रक्कम वजा केली जात नाही. म्हणजेच, आधी मिळालेल्या पेन्शनचा कोणताही परतावा द्यावा लागत नाही. तुम्ही जेवढा प्रीमियम भरला आहे आणि त्यावर जमलेला लाभ तेवढाच विचारात घेतला जातो.

ही सुविधा ग्राहकाला आर्थिक अडचणीच्या वेळेस मदतीचा हात देते आणि योजनेचा लाभ घेण्याचा लवचिकपणा टिकवून ठेवते. LIC कडून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाते आणि तुम्हाला सरेंडरसाठी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या LIC शाखेत अर्ज करावा लागतो. एकदा अर्ज मंजूर झाला की काही दिवसांत सरेंडर व्हॅल्यूची रक्कम तुमच्या खात्यावर जमा केली जाते.

तुमचं भविष्यातील नियोजन किंवा गरज बदलल्यास, ही योजना थांबवता येणे ही एक महत्त्वाची आणि विश्वासार्ह सुविधा आहे, जी ग्राहकाच्या हक्काचे संरक्षण करते. LIC Jeevan Umang Plan Details

LIC जीवन उमंग योजनेमध्ये प्रीमियम भरण्याची वेळ आणि पुनर्जीवनाचा पर्याय

जीवन उमंग योजनेसाठी आपण ठरलेल्या वेळेत प्रीमियम भरणे खूप महत्त्वाचे असते. मात्र, जर कोणत्याही कारणामुळे तुम्ही वेळेत प्रीमियम भरू शकला नाही, तर LIC तुम्हाला 30 दिवसांचा वाढीव कालावधी (Grace Period) देतो. या कालावधीत तुम्ही प्रीमियम भरल्यास तुमची पॉलिसी सुरळीतपणे सुरू राहते आणि तुम्हाला कोणतीही आर्थिक दंड आकारली जात नाही.

जर वाढीव कालावधीतही प्रीमियम भरला गेला नाही, तर काळजी करू नका! तुम्हाला पहिल्या न भरलेल्या हप्त्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांच्या आत कधीही पॉलिसी पुनर्जीवित (Revival) करण्याची संधी दिली जाते. म्हणजेच, तुम्ही या कालावधीत प्रीमियमची बाकी रक्कम भरून पुन्हा आपल्या योजनेचा फायदा घेऊ शकता. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तुम्हाला योजना बंद करावी लागणार नाही, तर तुम्ही ती पुनः सुरु करू शकता. LIC Jeevan Umang Plan Details

तसेच, जर तुम्ही किमान दोन वर्षे नियमितपणे प्रीमियम भरले असतील, तर तुम्हाला पॉलिसी कधीही सरेंडर करण्याचा पर्याय मिळतो. म्हणजे तुम्हाला कोणत्याही वेळी ही योजना बंद करण्याचा किंवा गुंतवणूक परत घेण्याचा अधिकार असतो.

दोन वर्षे प्रीमियम भरल्यानंतर, तुम्हाला काही विशेष सोयीसुद्धा मिळतात. उदाहरणार्थ, थोड्या अतिरिक्त प्रीमियम भरून तुम्ही रायडर बेनिफिट (Rider Benefit) देखील जोडू शकता, जे तुमच्या पॉलिसीच्या संरक्षणाचा विस्तार करतात. याशिवाय, योजनेत तुम्हाला काही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यास कर्ज घेण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, ज्यामुळे अचानक आर्थिक गरज भासल्यास तुम्ही त्याचा उपयोग करू शकता.

या योजनेत विमा संरक्षणाची हमी दिली जाते, म्हणजे तुमच्या अनुपस्थितीत तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहील. यासाठी पॉलिसीमध्ये नॉमिनेशन करण्याची सोय सुद्धा केली आहे, ज्यामुळे मृत्यू झाल्यास विमा रक्कम नॉमिनीला थेट मिळते.

एकंदरीत, LIC जीवन उमंग योजना तुमच्या गरजेनुसार प्रीमियम भरण्याच्या लवचिक पर्यायांसह अनेक अतिरिक्त फायदे देते, जे तुमच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहेत.

LIC Jeevan Umang Plan Details: अधिक माहितीसाठी कृपया www.licindia.in या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्याच शाखेला भेट द्या.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now