LIC Term Life Insurance: टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचे प्रकार, फायदे आणि योग्य लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडाल?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

LIC Term Life Insurance: लाईफ इन्शुरन्स हा आपल्या कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्याचा मुख्य आधार आहे. विमेदार व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास, विमा पॉलिसीद्वारे आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक रक्कम पुरवली जाते. भारतातील विमा कंपन्या प्रामुख्याने 5 ते 40 वर्षांच्या कालावधीसाठी लाईफ इन्शुरन्स विमा योजना उपलब्ध करून देतात. विम्याची रक्कम (सम ॲश्युअर्ड) आणि त्याचा प्रीमियम, पॉलिसी सुरु करताना निश्चित केली जाते.

योग्य विमा पॉलिसी निवडणे ही एक जबाबदारीची प्रक्रिया आहे, या लेखामध्ये अशाच काही टर्म इन्शुरन्स योजना आणि त्याची माहिती दिली आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.

लाईफ इन्शुरन्सचे प्रकार

लाईफ इन्शुरन्स निवडताना, विमा कंपन्यांनी दिलेले विविध पर्याय समजून घेणे गरजेचे आहे. भारतात विमा कंपन्या 5 ते 40 वर्षांपर्यंतच्या पॉलिसी टर्मसाठी विविध योजना देतात. प्रमुख लाईफ इन्शुरन्स प्रकारांमध्ये खालील प्रकार समाविष्ट आहेत.

  • टर्म इन्शुरन्स (Term Insurance): हा सर्वात सोपा आणि परवडणारा विमा प्रकार आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला निश्चित रक्कम मिळते.
  • युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIPs): या पद्धतीच्या योजना मध्ये शेअर मार्केट मधील गुंतवणूक आणि विमा यांचा समतोल राखला जातो.
  • एंडोमेंट प्लॅन: या प्रकारात ठराविक मुदत निवडावी लागते आणि मुदत पूर्ण झाल्यानंतर विमा रक्कम आणि बोनस रक्कम विमेदारास परत मिळते.
  • मनी-बॅक पॉलिसी: या प्रकारात घेतलेल्या योजनांमध्ये घेतलेल्या मुदतीत मध्ये पाच वर्षाच्या फरकाने रक्कम मिळत परत दिली जाते; सर्वात शेवटी बोनस आणि शिल्लक विमा रक्कम मिळते.
  • चिल्ड्रन्स प्लॅन्स: लहान मुलांच्या भविष्यासाठी खास करून डिजाइन केलेल्या या योजना असतात.
  • पेंशन प्लॅन्स: या प्रकारात मोठी रक्कम एक्दम भरून त्यावरती पेंशन दिली जाते.

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर हे एक सुलभ ऑनलाइन टूल आहे जे आपल्या आर्थिक गरजांनुसार लाईफ कव्हर आणि ठरवतो. यामध्ये आपल्याला वय, उत्पन्न व बचत, वैद्यकीय इतिहास, व्यसन, सवयी (उदा. धूम्रपान, मद्यपान), कर्जाचे तपशील इ. माहिती भरावी लागते.

LIC Term Life Insurance
LIC Term Life Insurance

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचे प्रकार:

1. बेसिक किंवा लेव्हल टर्म प्लॅन:

  • निश्चित विमा रक्कम आणि निश्चित प्रीमियम असतो .
  • बेसिक टर्म कॅल्क्युलेटर वापरून याचे कॅलक्युलेशन केली जाते.

2. वाढणारा (Increasing) टर्म प्लॅन:

  • विमा रक्कम रक्कम दरवर्षी वाढत जाते.
  • प्रीमियम बदलत नाही.

3. कमी होणारा (Decreasing) टर्म प्लॅन:

  • विमा रक्कम रक्कम दरवर्षी कमी होते, परंतु प्रीमियम स्थिर राहतो.

4. रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन (ROP):

  • विमा मुदत संपल्यानंतर पूर्ण प्रीमियम परत मिळतो.
  • यासाठी प्रीमियम जास्त असतो.

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटरचे फायदे:

  • योग्य विमा योजना निवडणे सोपे होते: विविध विमा योजनांच्या किंमती आणि लाभ यांची तुलना करता येते.
  • प्रीमियमची अचूक गणना: आपल्या गरजेनुसार योग्य लाईफ कव्हर आणि प्रीमियमची रक्कम ठरवता येते.
  • सोपे आणि विनामूल्य साधन: कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता स्वतः निर्णय घेता येतो.
  • आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त: भविष्यातील आर्थिक गरजा ओळखण्यासाठी मदत होते.

टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर कसा वापरावा?

अधिकृत विमा कंपनीच्या वेबसाईटवर जा. www.licindia.in वय, उत्पन्न, पॉलिसी कालावधी आणि अन्य आवश्यक माहिती भरा. प्रीमियमची अचूक रक्कम मिळवा. आपल्या गरजेनुसार विमा योजना निवडा.

LIC Term Life Insurance योजनांचे उदाहरण

भारताची प्रमुख विमा कंपनी एलआयसी (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अनेक प्रकारच्या टर्म इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध करून देते. या पॉलिसी आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या असून प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार तयार केल्या जातात. खाली एलआयसीच्या काही महत्त्वाच्या टर्म इन्शुरन्स योजनांची माहिती दिली आहे:

LIC Term Life Insurance
LIC Term Life Insurance

एलआयसी टेक टर्म (LIC Tech Term): LIC Term Life Insurance

ही पॉलिसी खास डिजिटल स्वरूपात विकली जाते आणि ती पूर्णतः ऑनलाइन उपलब्ध आहे. या पॉलिसीचे प्रमुख फायदे:

  • जास्त कवच रक्कम: ₹50 लाखांपासून सुरू.
  • कवच प्रकार: सिंगल लाइफ (फक्त पॉलिसीधारकासाठी) किंवा जॉइंट लाइफ (पती-पत्नी दोघांसाठी) पर्याय.
  • कमीत कमी प्रीमियम: ही योजना खास तरुणांसाठी परवडणारी आहे.
  • धूम्रपान करणाऱ्यांसाठी व धूम्रपान न करणाऱ्यांसाठी वेगळे प्रीमियम दर.
  • विमा कालावधी: 10 ते 40 वर्षे.

एलआयसी जीवन अमर (LIC Jeevan Amar): LIC Term Life Insurance

ही योजना ऑफलाइन स्वरूपात उपलब्ध आहे. जीवन अमर पॉलिसीच्या वैशिष्ट्ये:

  • फ्लेक्सिबल प्लॅन: विमा रक्कम मध्ये वाढ किंवा घट करण्याचा पर्याय.
  • प्रीमियम साठी सिंगल, नियमित किंवा लिमिटेड टर्मचा पर्याय.
  • धूम्रपान करणाऱ्या व न करणाऱ्यांसाठी वेगळे प्रीमियम दर.
  • विमा धारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीस करमुक्त विमा रक्कम.

एलआयसी अनमोल जीवन II (LIC Anmol Jeevan II): LIC Term Life Insurance

ही परवडणारी योजना कमी कवच रक्कम असलेल्या ग्राहकांसाठी योग्य आहे.

  • कवच रक्कम: ₹6 लाखांपासून सुरू.
  • विमा कालावधी: 5 ते 25 वर्षे.
  • कमी प्रीमियममध्ये आर्थिक संरक्षण देणारी योजना.

एलआयसीच्या या योजना का निवडाव्यात?

एलआयसीच्या टर्म इन्शुरन्स योजनांमध्ये विश्वासार्हता, करसवलती (80C अंतर्गत), आणि वेळोवेळी सुलभ प्रीमियम पर्यायांसह कुटुंबासाठी मोठे संरक्षण मिळते. या योजनांमुळे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही.

जर आपण योग्य योजना निवडण्यात गोंधळात असाल, तर एलआयसी टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर वापरून आपल्यासाठी योग्य योजना आणि प्रीमियम तपासा. एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळवा.

निष्कर्ष: LIC Term Life Insurance

लाईफ इन्शुरन्स हा आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विमा दुर्दैवी परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्रदान करतो. योग्य विमा योजना निवडण्यासाठी टर्म इन्शुरन्स कॅल्क्युलेटर हा एक महत्त्वाचा टूल आहे. हा कॅल्क्युलेटर आपल्याला आपल्या गरजा आणि बजेटनुसार योग्य प्रीमियम आणि कवच रक्कम ठरवण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी आजच योग्य विमा पॉलिसी निवडा आणि आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करा.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us