Umang Yojana: वाट बघू नका रिटायरमेंटची, हवी तेंव्हा तरतूद करा पेन्शनची, 8% दराने आयुष्य भर पेन्शन!

Umang Yojana: आपल्या भारत देशातील अनेक लोक एलआयसी कडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहतात. एलआयसी लहान मुले, वृद्ध लोक, महिला आणि विविध उत्पन्न गटातील लोकांचा विचार करूनच, अनेक नवीन उत्तम योजना चालवत असते. या योजना गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून खूपच चांगल्या असतात. तुम्हाला एखाद्या योजनेत दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल; तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका खूपच चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत.

या लेखामधे अशाच एका फायदेशीर पेन्शन योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. ही योजना आपल्या उतारवयात जास्त फायदेशीर होणार आहे. आपल्या उतारवयात सर्वांनाच अत्यंत गरज आहे ती म्हणजे रिटायरमेंट पेंशनची. म्हणूनच आपणास या योजनेची सर्व माहीती असणे खूप महत्त्वाचे आहे.

2004 च्या गव्हर्मेंटचे निर्णयाप्रमाणे इथून पुढच्या काळात सरकारी नोकरीस लागणाऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना, कसल्याही पद्धतीची पेन्शन योजना लागू केलेली नाही. त्यामुळे भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीला पेन्शन मिळणार नाही, याचसाठी भारत सरकारच्या आयुर्विमा कंपनी एलआयसीने पेन्शन स्वरूपाच्या योजनांची सुरुवात केली आहे; त्यापैकीच एक योजना म्हणजे जीवन उमंग प्लॅन.

भारतामधील अग्रगण्य विमा संस्था एलआयसी ऑफ इंडिया, भारतीय जीवन बीमा निगम यांनी काही दिवसापूर्वीच शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, चित्रपट कलाकार, नाटककार, शेतकरी, खाजगी कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी या व अशा सर्वांसाठी वार्षिक आठ टक्के व्याज परतावा देणारी अशी ही आकर्षक योजना सर्वांसाठी खुली केली आहे. या योजनेमध्ये आपण आठ टक्के वार्षिक दराने प्रत्येक वर्षाला पेन्शन घेऊ शकतो.

Umang Yojana 2024
Umang Yojana 2024

या योजनेचे नाव आहे ‘जीवन उमंग योजना’ जर तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवायचे असेल, तर तुम्ही एलआयसी ची Umang Yojana मध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पॉलिसी धारकाला वयाच्या 100 वर्षापर्यंत आर्थिक सुरक्षिततेचा लाभ मिळतो. जीवन उमंग योजना ही एक आजीवन विमा पॉलिसी आहे, ज्याचा उद्देश तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे आहे.

तुम्ही अंतिम प्रीमियम भरल्यापासून पॉलिसी परिपक्व होईपर्यंत ही Umang Yojana वार्षिक सर्वायवल बेनिफिट देत राहते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसी परिपक्व झाल्यावरती शेवटी, म्हणजेच पॉलिसीच्या मुदतपूर्ती नंतर पॉलिसी धारकास एक रक्कम प्रदान करते. एलआयसी उमंग योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे Umang Yojana धारकाच्या कुटुंबाला पैसे आणि विमा संरक्षण दोन्ही प्रदान करते.

Umang Yojana निवड का करावी?

Umang Yojana निवडण्यापूर्वी अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे आणि माहिती पूर्ण निर्णय घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रत्येक पॉलिसीचे प्राथमिक फायदे जाणून घेतले पाहिजेत.

या योजनेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम ही करमुक्त आहे, आणि तिथून पुढे शंभर वयापर्यंत आयुष्यभरासाठी जोखीम कवच उपलब्ध होते आणि घेतल्या गेलेल्या विमा रकमेवर 8% वार्षिक दराने पेंशन दिली जाते जी हयाती पर्यंत आहे.

ही योजना कोण खरेदी करू शकतो

Umang Yojana ही सर्वात अष्टपैलू योजना आहे. लहान बाळाला त्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना आपण त्याला गिफ्ट देऊ शकतो. तरुण किंवा मध्यम वर्गीय कर वाचवण्यासाठी, तसेच स्वतःच्या आयुष्यावर ही योजना घेऊ शकतात आणि स्वतःची पेन्शन सुरू करण्यासाठी त्याची गुंतवणूक म्हणून ही योजना स्विकारली जाऊ शकते म्हणजेच ही योजना स्त्री आणि पुरुष ज्यांचे वय शून्य ते पन्नास वया पर्यंत कोणीही घेऊ शकतात.

Umang Yojana 2024
Umang Yojana 2024

या योजनेत प्रीमियम वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक भरले जाऊ शकतात. ऑनलाईन तसेच तुमच्या तारखेच्या दिवशी सेविंग बँक अकाउंट मधून सुद्धा कट केले जातात. या योजने मध्ये भरलेले सर्व प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर बचतीसाठी विचारात घेतले जातात. तुम्ही 80C अंतर्गत एक लाख पन्नास हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता आणि दरवर्षी करासाठी पात्र होऊ शकतात. या योजनेतील पेन्शन आणि इतर रिटर्न्स देखील आयकर कायदा 10(10D) अंतर्गत करमुक्त आहेत.

पेंशन कशी मिळेल?

पेन्शन मिळण्यासाठी आपण सर्वप्रथम या प्लॅनमध्ये प्रीमियम स्वरुपात काही ठराविक रक्कम भरली पाहिजे तर आपणास घेतलेल्या मुदतीनंतर पेन्शन दिली जाईल.

एलआयसीच्या जीवन उमंग प्लॅनमध्ये प्रत्येक वर्षी, सहामाही तिमाही, किंवा मासिक पद्धतीने डिपॉझिट करायचे आहेत. या योजनेची मुदत प्रीमियम भरण्याची मुदत 15 वर्षे असेल. तुम्हाला आज पासून पंधरा वर्षानंतर किती रुपयांची पेन्शन हवी आहे त्या अनुषंगाने आपली आत्ताची आपण भरणारी प्रीमियम ची रक्कम अवलंबून असेल.

Umang Yojana मध्ये किती वर्षे व किती पैसे भरावे लागतील?

काही रक्कम हप्ता स्वरूपामध्ये आपण एलआयसी कडे जमा करायचे आहेत आणि त्यावरील मिळणार व्याज आणि आपली मुद्दल या दोन्हीची सांगड घालून एलआयसी आपल्याला पेन्शन देणार आहे. उदा. आपण जर पाहिलं की एखादा व्यक्ती आता 35 वर्षांची आहे. त्याला त्याच्या वयाच्या 50 वर्षापासून पेन्शन हवी आहे तर प्रत्येक महिन्याला 24,000/- रु. ही पेन्शनची रक्कम हवी असल्यास वयाच्या 35 वर्षापासून ते 50 वयापर्यंत म्हणजे 15 वर्षे त्याला प्रीमियम भरावा लागेल. हा प्रीमियम वार्षिक 2,40,000/- असेल.

Umang Yojana 2024
Umang Yojana 2024

पेंशन केंव्हा मिळेल?

Umang Yojana मध्ये 15 वर्षांमधे एकूण 36,00,000/- एवढी रक्कम जमा होईल व वय पन्नास पासून शंभर वया पर्यंत 24,000/- प्रत्येक महिना पेंशन मिळत रहातील.

Umang Yojana योजना सरेंडर चा ऑप्शन

ही योजना सुरू केल्यानंतर आपण एकूण पंधरा वर्षे प्रीमियम भरावयाचा आहे व त्यानंतरच आपणास पेन्शन स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्यास रक्कम परत दिली जाईल काही वर्ष पेन्शन घेतल्यानंतर आपणास जर ही योजना बंद करायची असेल तर बंद करता येते. ही योजना बंद करत असताना आपण भरलेली मुद्दल व त्यावरील व्याज आपणास सरेंडर व्हॅल्यू च्या रूपामध्ये मिळेल. या रकमेमधून आपणास मिळणारी पेन्शन वजा होणार नाही.

अजून कोणते फायदे आहेत?

या योजनेसाठी प्रीमियम ची रक्कम आपण वेळेत नाही भरली तर आपल्याला 30 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो, तसेच वाढीव कालावधीमध्ये प्रीमियम नाही भरला तर तुम्ही पहिल्या न भरलेल्या हप्त्याच्या तारखेपासून पुढच्या पाच वर्षांमध्ये कधीही संपूर्ण पॉलिसीचे प्रीमियम रक्कम भरून ही योजना पुनर्जीवित करू शकता. दोन वर्षाचे पूर्ण हफ्ते भरले असल्यास तुम्ही ही पॉलिसी कधीही सरेंडर करू शकता. दोन वर्षाचे हप्ते व्यवस्थित भरले असतील तर तुम्हाला काही अटींच्या अधीन या योजनेमध्ये थोडे कर्ज मिळून शकते. काही एक्स्ट्रा प्रीमियम भरून आपण रायडर बेनिफिट सुद्धा घेऊ शकतो. या योजनेमध्ये विमा संरक्षण दिले जाईल, या योजना वरती नॉमिनेशन ची सुद्धा सोय केली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया www.licindia.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या किंवा जवळच्याच शाखेला भेट द्या..

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now