LIC Nivesh Plus Plan details: जाणून घ्या, एलआयसीचा अद्भुत प्लॅन ‘निवेश प्लस’; एकदाच गुंतवा ₹10 लाख आणि मिळावा ₹77 लाखापेक्षा जास्त रक्कम.

WhatsApp Group Join Now

LIC Nivesh Plus Plan details: ‘एलआयसी निवेश प्लस योजना’ ही LIC द्वारे सुरु करण्यात आलेली एक युनिट लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, सिंगल प्रीमियम लाईफ इन्शुरन्स योजना आहे. जीचे रिटर्न्स शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवर दिले जातात, ही योजना विमा संरक्षणासोबतच गुंतवणुकीसाठी विविध फंड्समध्ये पैसे गुंतवण्याची संधी देते. पॉलिसीधारक एकदाच प्रीमियम भरून विमा संरक्षण आणि गुंतवणूक या दोन्हीचे फायदे घेऊ शकतात

lic nivesh plus 749 योजनेत एकदाच प्रीमियम भरून दीर्घकालीन विमा संरक्षण आणि गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. या योजनेत चार प्रकारचे फंड पर्याय उपलब्ध आहेत: बॉन्ड फंड, सिक्युअर्ड फंड, बॅलन्स्ड फंड आणि ग्रोथ फंड. गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत विमा संरक्षणासह गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते, ज्यामुळे ही योजना दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी उपयुक्त ठरते.

ही lic nivesh plus 749 योजना विशेषतः त्यांच्यासाठी खूप चांगली आहे, जे दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी कॅपिटल appreciation (भांडवली वृद्धी) करू इच्छितात आणि एका वेळी मोठा प्रीमियम भरू शकतात. ही पॉलिसी मध्ये प्रत्येकाच्या गरजेनुसार विमा रक्कम निवडण्यास आणि फंड बदलण्याची मुभा असते. या लेखा मध्ये या LIC Nivesh Plus Plan details बद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा

एलआयसी निवेश प्लस योजनेची मुख्य वैशिष्ट्ये.

युनिट लिंक्ड योजना

ही lic nivesh plus 749 योजना युनिट लिंक्ड असल्याने पॉलिसीधारकाचे पैसे विविध गुंतवणूक फंड्समध्ये गुंतवले जातात. यामुळे बाजारातील चांगल्या कामगिरीचे रिटर्न्स मिळण्याची शक्यता वाढते.

सिंगल प्रीमियम

या lic nivesh plus 749 योजनेत फक्त एकदाच प्रीमियम गुंतवला जातो त्यानंतर कोणतेही प्रीमियम भरण्याची गरज राहत नाही. या योजनेत किमान प्रीमियम ₹1,25,000 पासून सुरू होतो आणि जास्त प्रीमियम भरण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.

गुंतवणुकीची लवचिकता

पॉलिसीधारक lic nivesh plus 749 खालीलपैकी कोणताही फंड निवडू शकतो: LIC Nivesh Plus Plan details

  • Bond Fund (कमी जोखीम)
  • Secured Fund (मध्यम जोखीम)
  • Balanced Fund (मिश्रित जोखीम)
  • Growth Fund (जास्त जोखीम)
Also Read:-  Petrol Diesel Fresh Prices: 19 डिसेंबर 2024: भारतातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेल दर तपासा; नवीन किमती आणि शहरानुसार माहिती.

विमा संरक्षण

पूर्ण पॉलिसी कालावधीत विमा संरक्षण उपलब्ध असते. पॉलिसी कालावधीमध्ये योजना धारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला सध्याचा जमा झालेला युनिट फंड व्हॅल्यू किंवा मूळ विमा रक्कम (जे अधिक असेल) दिली जाते.

फंड स्विचिंग

पॉलिसीधारकाला त्यांच्या जोखमीच्या बदलत्या गरजेनुसार फंड बदलण्याची मुभा आहे.

LIC Nivesh Plus Plan details
LIC Nivesh Plus Plan details

पात्रता निकष

‘निवेश प्लस’ योजनेची पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत: LIC Nivesh Plus Plan details

LIC Nivesh Plus चे फायदे

या lic nivesh plus 749 योजनेत मृत्यू लाभ, परिपक्वता लाभ आणि गॅरण्टी अ‍ॅडिशन यांसारखे फायदे मिळतात. मृत्यू लाभामध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, नामनिर्देशित व्यक्तीस विमा रक्कम, युनिट फंड मूल्य किंवा एकूण प्रीमियमच्या 105% पैकी जे जास्त असेल ती रक्कम मिळते. परिपक्वता लाभामध्ये, पॉलिसी मुदतीच्या शेवटी एकूण युनिट फंड मूल्य मिळते

मृत्यू लाभ (Death Benefit)

पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला मूळ विमा रक्कम – मागील दोन वर्षांत काढलेले पैसे किंवा युनिट फंड व्हॅल्यू – यापैकी जे अधिक असेल ते दिले जाते.

मॅच्युरिटी लाभ (Maturity Benefit)

पॉलिसी पूर्ण केली असता, पॉलिसीधारकाला युनिट फंड व्हॅल्यू मिळतात, हे पैसे त्याच्या निवडलेल्या फंड्सच्या परफॉर्मन्सवर आधारित असतात.

गॅरेंटेड एडिशन

पॉलिसी मुदत दरम्यान पुढील प्रमाणे गॅरेंटेड एडिशन रक्कम फंड मध्ये जोडली जाते: 6 वर्षांनंतर – 3%, 10 वर्षांनंतर – 4%, 15 वर्षांनंतर – 5%, 20 वर्षांनंतर – 6%, 25 वर्षांनंतर – 7%

रायडर फायदे (Rider Benefit)

पॉलिसीला LIC Linked Accidental Death Benefit Rider जोडून अपघाती मृत्यूसाठी अतिरिक्त संरक्षण मिळवता येते.

उदाहरण: प्रीमियम आणि रिटर्न्स lic nivesh plus 749

Also Read:-  ATM Bank Charges: बँक एटीएम चार्जेस वाढल्याने तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? जाणून घ्या नवीन दर, नियम आणि पैसे वाचवण्याचे उपाय.
LIC Nivesh Plus Plan details
LIC Nivesh Plus Plan details

इतर वैशिष्ट्ये

Partial Withdrawal: पॉलिसी घेतल्यापासून 5 वर्षांनंतर काही विशिष्ट अटींवर आंशिक पैसे काढता येतात. 2 वर्षांत विमा रक्कम कमी होते, पण त्यानंतर पुन्हा पूर्ववत होते.

Fund Switching: कधीही फंड बदलण्याची मुभा असून त्यावर काही शुल्क लागू होऊ शकते.

Settlement Option: मृत्यूनंतर नॉमिनीला पैसे हप्त्यांमध्ये मिळावेत अशी सोय पॉलिसीधारक करू शकतो.

Charges: ‘निवेश प्लस’ योजनेत विविध शुल्क आकारले जातात, ज्यामध्ये Premium Allocation Charge, Fund Management Charge, Mortality Charge, Switching Charge, Partial Withdrawal Charge, Discontinuance Charge, Tax Charge, Miscellaneous Charges आणि इतर शुल्कांचा समावेश आहे. या शुल्कांची माहिती पॉलिसी दस्तऐवजात दिली जाते, ज्यामुळे पॉलिसीधारकांना त्यांच्या गुंतवणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होते.

फ्री लूक कालावधी

LIC Nivesh Plus Plan details कोणत्याही कारणाने पॉलिसी आवडली नाही तर, या योजनेत ‘फ्री लुक’ कालावधी दिला जातो, ज्यामध्ये पॉलिसीधारक पॉलिसी घरपोच मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करू शकतात.

LIC Nivesh Plus Plan details

निवेश प्लस’ योजना (lic nivesh plus 749) ही विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचे संयोजन आहे, जी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी उपयुक्त ठरते. या योजनेत एकदाच प्रीमियम भरून, पॉलिसीधारकांना विमा संरक्षणासह गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्याची संधी मिळते. यामध्ये विविध फंड पर्याय, अंशतः पैसे काढण्याची सुविधा, फंड स्विचिंग आणि हमी जोडणी यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

lic nivesh plus 749 योजना ही दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. एका वेळेचा प्रीमियम भरून विमा संरक्षण आणि गुंतवणूक यांचा दुहेरी फायदा मिळवता येतो. ही योजना त्यांच्या साठी खास आहे जे बाजाराशी निगडीत परताव्याचा लाभ घेऊन भविष्यातील गरजांसाठी संपत्ती निर्माण करू इच्छितात. बाजारातील जोखीम स्वीकारण्याची तयारी असेल तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

LIC Nivesh Plus Plan details External Sources: https://licindia.in/web/guest/lic-s-nivesh-plus