LIC Jeevan Utsav single premium plan: एलआयसीची शानदार स्कीम; एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर रिटर्न मिळवा!

WhatsApp Group Join Now

LIC Jeevan Utsav single premium plan: भारतातील सर्वात मोठी आणि अत्यंत विश्वासार्ह विमा कंपनी Life Insurance Corporation of India (LIC) ने गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि नवीन संधी आणली आहे. अनेकांना वार्षिक किंवा मासिक प्रीमियम भरणे आवडत नाही, पण ते आयुष्यभर संरक्षण आणि निश्चित परतावा मिळवू इच्छितात. अशी अपेक्षा लक्षात घेऊन LIC ने जीवन उत्सव सिंगल प्रीमियम नावाची नवीन योजना सुरू केली आहे जी फक्त एकदाच प्रीमियम भरून दीर्घकालीन फायदे देण्यावर आधारित आहे.

या LIC Jeevan Utsav single premium plan योजनेमध्ये तुम्हाला फक्त एकदाच सिंगल प्रीमियम भरावा लागतो, आणि त्यानंतर तुम्हाला नियमित हप्त्यांची चिंता न करता दीर्घकाळ फायदे मिळत राहतात. हे खासकरून निवृत्त झालेल्या लोकांसाठी, स्थिर उत्पन्न शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा वार्षिक प्रीमियम भरण्याची जबाबदारी नको असलेल्या लोकांसाठी एक उपयुक्त पर्याय ठरू शकते.

या LIC Jeevan Utsav single premium plan योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला दीर्घकालीन आयुष्यभर लाईफ कव्हरेज मिळते आणि मर्यादित व्याजावर निश्चित आर्थिक सुरक्षितता मिळते. या योजनेमध्ये नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग वैशिष्ट्य असल्याने बाजारातील अस्थिरतेचा परिणाम तुमच्या परताव्यावर होत नाही आणि जो लाभ ठरलेला तोच निश्चित मिळतो. यामुळे तुमचे बचत आणि विमा संरक्षण दोन्ही सुरक्षित राहते.

एकंदरीत, आयुष्यभर चालणारी ही योजना फक्त एकदा प्रीमियम भरून तुमच्या कुटुंबाला दीर्घकालीन आर्थिक संरक्षक आधार देते आणि तुमच्या आर्थिक नियोजनाला स्थिरता प्रदान करते.

जीवन उत्सव सिंगल प्रीमियम प्लॅन म्हणजे काय?

जीवन उत्सव सिंगल प्रीमियम ही एक होल लाईफ (Whole Life) नॉन-लिंक्ड विमा योजना आहे. यामध्ये पॉलिसीधारकाला फक्त एकदाच एकरकमी प्रीमियम भरावा लागतो. त्यानंतर दरमहा किंवा दरवर्षी हप्ता भरण्याची गरज राहत नाही पण त्याद्वारे आपणास दरवर्षी निश्चित परतावा मिळतो.

ही LIC Jeevan Utsav single premium plan योजना शेअर बाजाराशी जोडलेली नसल्यामुळे (Non-Linked Plan) बाजारातील चढ-उतारांचा तुमच्या परताव्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे जो परतावा ठरलेला आहे, तोच मिळतो. जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक सुरक्षित पर्याय आहे.

आयुष्यभराचे विमा संरक्षण

या LIC Jeevan Utsav single premium plan प्लानचे सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे होल लाईफ कव्हरेज. म्हणजेच पॉलिसीधारक जिवंत असेपर्यंत विमा संरक्षण सुरू राहते. बर्‍याच लोकांना दरवर्षी किंवा दरमहा प्रीमियम भरणे जड जाते. कधी आर्थिक अडचणी, कधी विसरभोळेपणा आणि पॉलिसी लॅप्स होण्याचा धोका निर्माण होतो. पण या सिंगल प्रीमियम प्लॅनमध्ये हा प्रश्नच राहत नाही.

एकदाच गुंतवणूक करा आणि नंतर निश्चिंत व्हा. त्यामुळे दीर्घकालीन शिस्तबद्ध गुंतवणूक सुलभ होते. जर पॉलिसीधारकाच्या आयुष्यात कधीही अनपेक्षित घटना घडली, तर नामनिर्देशित व्यक्तीस निश्चित विमा रक्कम दिली जाते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळते. आजच्या अनिश्चित काळात कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हा मोठा आधार ठरतो.

बचत आणि सुरक्षा – दुहेरी फायदा

ही LIC Jeevan Utsav single premium plan योजना केवळ पारंपरिक विमा संरक्षणापुरती मर्यादित नसून ती एक प्रभावी आणि शिस्तबद्ध दीर्घकालीन बचत पर्याय म्हणूनही कार्य करते. निश्चित आणि स्थिर परतावा मिळत असल्यामुळे भविष्यातील आर्थिक गरजांचे नियोजन अधिक आत्मविश्वासाने करता येते.

ही योजना बाजारातील चढ-उतारांपासून पूर्णपणे सुरक्षित असल्याने गुंतवणूकदारांना भांडवल सुरक्षिततेची खात्री मिळते. एकदाच एकरकमी गुंतवणूक करून दीर्घकाळासाठी आर्थिक लाभ मिळवण्याची संधी या योजनेत उपलब्ध आहे, ज्यामुळे वारंवार प्रीमियम भरण्याचा ताण राहत नाही.

Also Read:-  Quick Easy Personal Loans: आता फक्त आधार कार्डवर सुद्धा मिळणार त्वरित वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

दीर्घकालीन आर्थिक नियोजन करताना भांडवल संरक्षण, निश्चित लाभ आणि कुटुंबासाठी आर्थिक कवच या तिन्ही बाबी महत्त्वाच्या ठरतात आणि या योजनेत या सर्व गोष्टींचा संतुलित समावेश आहे. कमी जोखीम स्वीकारणारे, सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देणारे आणि स्थिर लाभाची अपेक्षा ठेवणारे गुंतवणूकदार यांच्यासाठी हा एक विचार करण्यासारखा आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.

LIC Jeevan Utsav single premium plan
LIC Jeevan Utsav single premium plan

Survival Benefit म्हणजे काय?

Survival Benefit म्हणजे विमाधारक (Life Assured) पॉलिसी कालावधीत जिवंत असल्यास त्याला दरवर्षी मिळणारा लाभ. हा लाभ तुम्ही पॉलिसी घेताना निवडलेल्या पर्यायानुसार दिला जातो:

  • Option I – Regular Income Benefit
  • Option II – Flexi Income Benefit

Option I – Regular Income Benefit: LIC Jeevan Utsav single premium plan

जर विमाधारक हयात असेल, तर त्याला दरवर्षी खालीलप्रमाणे रक्कम दिली जाते:

किती रक्कम मिळते? Basic Sum Assured च्या 10% रक्कम दरवर्षी, म्हणजेच, तुमच्या मूळ विमा रकमेच्या 10% इतका नियमित उत्पन्न लाभ (Regular Income Benefit) दरवर्षी दिला जातो.

कधीपासून मिळायला सुरुवात होते? ही रक्कम पॉलिसी वर्षाच्या शेवटी दिली जाते. कोणत्या वर्षापासून सुरू होईल हे पॉलिसीच्या अटींमध्ये दिलेल्या Table-1 नुसार ठरते. उदाहरणार्थ (समजण्यासाठी): जर Table-1 नुसार 6व्या वर्षापासून लाभ सुरू होणार असेल, तर 6व्या वर्षाच्या शेवटी पहिला हप्ता मिळेल.

Option II – Flexi Income Benefit: LIC Jeevan Utsav single premium plan

Option II मध्ये विमाधारक (Life Assured) जिवंत असल्यास दरवर्षी मिळणारी रक्कम थेट हातात दिली जात नाही, तर ती जमा (accumulate) केली जाते आणि त्यावर व्याज मिळते. गरजेनुसार ती नंतर काढता येते.

किती रक्कम मिळते? दरवर्षी Basic Sum Assured च्या 10% इतकी Flexi Income Benefit पात्र ठरते. ही रक्कम पॉलिसीच्या ठरलेल्या वर्षापासून (Table-1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे) प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी जमा होण्यास सुरुवात होते.

किती काळ मिळते? Flexi Income Benefit खालीलपैकी जे आधी होईल तोपर्यंत चालू राहते: विमाधारक जिवंत असेपर्यंत किंवा मॅच्युरिटीच्या आधी येणाऱ्या शेवटच्या पॉलिसी ऍनिव्हर्सरीपर्यंत.

व्याजदर किती आहे? 5.5% वार्षिक (p.a.) दराने, compounding yearly म्हणजे: अपूर्ण महिने (fraction of month) गणनेत धरले जात नाहीत. प्रत्येक Flexi Income रक्कम तिच्या देय तारखेपासून जमा होऊ लागते. ती रक्कम 5.5% दराने दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वाढते. फक्त पूर्ण झालेले महिने (completed months) धरले जातात.

रक्कम काढण्याची (Withdrawal) सुविधा

पॉलिसीधारक लेखी विनंती करून: आधी काढलेली रक्कम पुन्हा मोजली जात नाही. एका पॉलिसी वर्षात फक्त एकदाच पैसे काढू शकतो. जास्तीत जास्त जमा रकमेच्या 75% पर्यंत पैसे काढता येतात. उरलेली रक्कम 25% (किंवा शिल्लक रक्कम) पुढेही 5.5% दराने जमा होत राहते.

Survival Benefit Option बदलण्याची सुविधा

Guaranteed Addition Period दरम्यान पॉलिसीधारक खालील बदल करू शकतो: Option I (Regular Income Benefit) → Option II (Flexi Income Benefit) किंवा Option II → Option I म्हणजेच, गरजेनुसार नियमित उत्पन्न घ्यायचे की जमा करून व्याजासह घ्यायचे हे बदलता येते.

जीवन उत्सव सिंगल प्रीमियम उदाहरण

एका 35 वयाच्या स्त्री किंवा पुरुष, यांनी ही योजना स्वतःसाठी घेतली तर त्यांना, एका वेळी ₹10,04,000 एवढा प्रीमियम एकदाच भरावा लागेल. LIC Jeevan Utsav single premium plan

पर्याय क्र. 1 नुसार (Regular Income Benefit): पॉलिसी सुरू केल्यापासून सात वर्ष वेटिंग पिरीयड असेल आणि त्यानंतर म्हणजेच 42 वयापासून त्यांना दरवर्षी ₹1,00,000 रक्कम तहायत मिळत राहील. सोबत ₹12,80,000 चे नैसर्गिक विमा संरक्षण आणि ₹22,80,000 चे अपघाती विमा संरक्षण तहायत मिळत राहील.

Also Read:-  ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक पाहणी ॲप, डिजिटल युगाची एक नवी पायरी.

पर्याय क्र 2 नुसार (Flexi Income Benefit): पॉलिसी सुरू केल्यापासून सात वर्ष वेटिंग पिरीयड असेल आणि त्यानंतर म्हणजेच 42 वयापासून त्यांना दरवर्षी ₹1,00,000 सोबत 5.5 टक्के वार्षिक प्रमाणे त्यावरती तहायत व्याज मिळेल. म्हणजे 42 व्या वर्षी ₹1,00,000, 43 व्या वर्षी ₹2,05,000, 44 व्या वर्षी ₹3,16,802, 45 व्या वर्षी ₹4,34,226, 46 व्या वर्षी ₹5,58,109 अशी रक्कम वाढत जाईल. जमा झालेल्या रकमेच्या 75% रक्कम तुम्ही केंवही काढून घेऊ शकता.

Maturity Benefit (मॅच्युरिटी लाभ)

जर विमाधारक (Life Assured) पॉलिसीची पूर्ण मुदत संपेपर्यंत हयात असल्यास, तर त्यांना खालील रक्कम दिली जाते: LIC Jeevan Utsav single premium plan

1} Sum Assured on Maturity: ही रक्कम पुढीलपैकी जास्त असलेली असेल म्हणजेच Basic Sum Assured (मूलभूत विमा रक्कम) किंवा Tabular Single Premium च्या 1.25 पट रक्कम म्हणजेच, दोन्ही रक्कमांची तुलना करून जी जास्त रक्कम असेल ती मॅच्युरिटी वेळी दिली जाते. सोबत त्यावरील जमा बोनस रक्कम दिली जाईल

2} Accrued Guaranteed Additions (जमा झालेले हमी ऍडिशन): पॉलिसीच्या कालावधीत जेवढा बोनस जमा झाला असेल (Guaranteed Additions) अशी संपूर्ण रक्कम विमा रक्कम सह मॅच्युरिटी वेळी दिली जाते.

हा प्लॅन कोणासाठी योग्य आहे ?

हा प्लॅन खालील लोकांसाठी विशेषतः उपयुक्त आहे: LIC Jeevan Utsav single premium plan

निवृत्त व्यक्ती आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता शोधणारे – ज्यांना निवृत्तीनंतर नियमित आणि स्थिर उत्पन्नाची चिंता असते व ज्यांना एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर फायदे मिळवायचे आहेत.

एकरकमी गुंतवणूक करू इच्छिणारे लोक – जे वारंवार प्रीमियम भरण्याचा त्रास टाळून फक्त एकदाच प्रीमियम भरून दीर्घकालीन फायदे मिळवू इच्छितात.

कमी जोखीम असलेला आणि निश्चित परतावा शोधणारे गुंतवणूकदार – जे बाजारातील चढ-उतार पासून दूर राहून सुरक्षित, निधारित लाभ शोधत आहेत.

कुटुंबासाठी आयुष्यभर आर्थिक संरक्षण हवे असणारे लोक – जे आपल्या कुटुंबाच्या भवितव्याची हमी हवी आहे, आणि अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक आधार देणारी योजना शोधत आहेत.

वारंवार हप्ते भरण्याचा त्रास टाळू इच्छिणारे व्यस्त लोक किंवा उद्योजक – ज्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि ते सुलभ, ताण-रहित आर्थिक योजना हवी आहे.

LIC Jeevan Utsav Single Premium Plan

जीवन उत्सव सिंगल प्रीमियम योजना ही बचत आणि सुरक्षा यांचा संतुलित संगम आहे. एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभर विमा संरक्षण आणि निश्चित परतावा मिळवण्याची संधी या प्लॅनमुळे उपलब्ध झाली आहे.

दीर्घकालीन आर्थिक नियोजन करताना स्थिरता, सुरक्षितता आणि कुटुंबाचे संरक्षण या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एलआयसीची ही योजना त्या दृष्टीने विचार करण्यासारखी आहे. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

LIC Jeevan Utsav single premium plan Disclaimer: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी आयुर्विमा सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Comment