SEBI Recruitment 2024: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) सिक्युरिटीजमधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, सिक्युरिटीच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचे नियमन करण्यासाठी संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित केलेली एक वैधानिक संस्था आहे.
SEBI ने विविध विभागांतर्गत ‘असिस्टंट मॅनेजर’ या पदासाठी जाहिरात काढली असून, एकूण 97 पदांसाठी परीक्षा पद्धती द्वारे भारती केली जाणार आहे, या संदर्भातली जाहिरात 11 जूनला SEBI च्या अधिकृत वेबसाईट वरती दिली आहे . या लेखांमध्ये आपण त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी कृपया हा लेख संपूर्णपणे वाचा आणि दिलेल्या लिंक वरती जाऊन तुमचा फॉर्म ऑनलाईन भरा.
SEBI Recruitment 2024 Notification: जाहिरात
इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार कोणत्याही दोन पदासाठी अर्ज करण्याची परवानगी आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेमध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर्स असतील. एकूण 200 मार्कांसाठी पेपर असेल त्यापैकी पेपर क्रमांक एक कालावधी 60 मिनिटांचा असून पेपर क्रमांक दोनचा कालावधी 40 मिनिटाचा आहे. या संपूर्ण परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे बंधनकारक राहील. या सर्व पदासाठी 31 मार्च 2024 रोजी उमेदवारी इच्छुक उमेदवाराचे वय 30 व त्याच्या आत मध्ये असावे.
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा / SEBI recruitment 2024 notification https://www.sebi.gov.in/sebiweb/other/careerdetail.jsp?careerId=343
Qualification / पात्रता
सेबीच्या विविध पदासाठी पात्रता विविध आहेत. कोणत्याही तेही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर ऑफ लॉ डिग्री आणि किमान दोन वर्षाचा वर्क एक्सपिरीयन्स महत्त्वाचा असेल. बॅचलर इन इंजीनियरिंग एनी ब्रांच, मास्टर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कम्युनिकेशन, मास्टर डिग्री इन हिंदी ट्रान्सलेशन अँड इंग्लिश ट्रान्सलेशन, बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इ. पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी इच्छुक पदासाठीच्या नियमानुसार अर्ज करावा.
Syllabus / अभ्यासक्रम
ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेमध्ये एकूण 40 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असणार आहे, पैकी सर्व प्रश्न दिलेल्या सिलॅबस मधीलच असतील. प्रत्येक पदासाठी अभ्यासक्रम हा वेगवेगळा असून अधिक माहितीसाठी कृपया वेबसाईट वरती जाऊन सिलॅबस ऑप्शन मध्ये पहावा.
Exam Pattern
एक्झाम पॅटर्न मल्टिपल चॉइस क्वेश्चन असतील, पहिला पेपर 100 मार्कांसाठी 60 मिनिटांचा, त्याच्यामध्ये कमीत कमी 30% टक्के गुण मिळवणे बंधनकारक असणार आहे. जनरल स्ट्रीम मध्ये मल्टिपल चॉइस क्वेश्चन सब्जेक्ट कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट फायनान्स, कॉस्टिंग, इकॉनॉमिक्स या संदर्भातले प्रश्न विचारले जातील.
पेपर क्रमांक दोन मध्ये मल्टिपल चॉइस क्वेश्चन ऑन सब्जेक्ट कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टिंग, कंपनी ॲक्ट अँड इकॉनॉमिक्स त्याचबरोबर लीगल स्टीम रिसर्च, स्टीम इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल स्ट्रीम, ऑफिशियल लांग्वेज ट्रिम अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टीम यासाठी मल्टिपल चॉइस क्वेश्चन आणि स्पेशल सब्जेक्ट रिलेटेड प्रश्न असतील. पेपर क्रमांक दोन चे मार्क्स 100 असणार आहेत पैकी 40% गुण मिळवणे बंधनकारक असेल, या एक्झाम साठी कालावधी 40 मिनिटांचा आहे.
ऑनलाइन अर्ज: SEBI recruitment 2024 apply online
या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30 जून 2024 पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने आणि संबंधित कागदपत्र सहित सेबीकडे सादर करणे महत्त्वाचे आहे. पेपर क्रमांक एक आणि दोन साठी ऑनलाईन परीक्षा 27 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 या दरम्यान होतील. त्यानंतरच इंटरव्यू साठी कॉल लेटर्स वेबसाईट वरती उपलब्ध होतील व ठराविक काळाचे प्रशिक्षण दिल्यानंतर काम करण्याची संधी दिली जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा / SEBI recruitment 2024 apply online https://ibpsonline.ibps.in/sebimarc24
SEBI मध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांना याद्वारे सावध केले जाते की SEBI मध्ये नोकऱ्या मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन उमेदवार/जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही घटकांना बळी पडू नका. कोणत्याही उमेदवाराला अशी ऑफर आढळल्यास, अशा सहभागी असलेल्या घटकांचे नाव आणि संपर्क यासारख्या संपूर्ण तपशीलांसह, recruitment@sebi.gov.in येथे SEBI च्या निदर्शनास तत्काळ आणले जाऊ शकते.
या जाहिरातीचे संपूर्ण माहिती, ऑनलाइन अप्लाय, त्याचबरोबर इतर सर्व माहिती तुम्हाला सेबीच्या अधिकृत वेबसाईट https://www.sebi.gov.in/ वरती मिळेल
Table of Contents