LIC Jeevan Utsav details: 10% वार्षिक दराने आयुष्यभरासाठी पेन्शन मिळवा; जाणून घ्या एलआयसी च्या उत्सव योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

LIC Jeevan Utsav details: भारत सरकारची सर्वात जुनी आणि अत्यंत प्रतिष्ठित आयुर्विमा कंपनी Life Insurance Corporation of India (LIC) ने, आपल्या देशातील सर्व सर्व नागरिकांसाठी 2025 मध्ये एक नवीन योजना सादर केली आहे, जिचे नाव आहे जीवन उत्सव योजना. ही योजना तुम्हाला केवळ विमा संरक्षणच देत नाही, तर आयुष्यभरासाठी निश्चित आर्थिक उत्पन्नाची हमीही पुरवते. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता मिटवण्यासाठी ही योजना खूपच आदर्श ठरते.

ही एलआयसी जीवन उत्सव योजना नॉन-लिंक्ड (Non-Linked), नॉन-पार्टिसिपेटिंग (Non-Participating), इंडिविज्युअल सेविंग्स लाईफ इन्शुरन्स योजना आहे, म्हणजेच या योजनेचं मूल्य शेअर बाजाराच्या चढउतारावर अवलंबून राहत नाही. विशेष म्हणजे, LIC च्या अन्य योजनांप्रमाणे यामध्ये आर्थिक स्थिरतेची आणि दीर्घकालीन सुरक्षेची खात्री दिली जाते. LIC Jeevan Utsav ही योजना एलआयसीने सुरू केलेली एक दीर्घकालीन बचत योजना आहे. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे जे नियमित उत्पन्नाची खात्रीशीर सोय शोधत आहेत.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस जीवनभर नियमितपणे निश्चित रक्कम मिळते. ही योजना केवळ विमा संरक्षणच देत नाही, तर निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य देणारी एक हमखास योजना म्हणूनही ओळखली जाते. यामध्ये एकदा प्रीमियम भरायचा किंवा काही वर्षांसाठीच प्रीमियम भरत राहण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, आणि योजनाधारकास त्याच्या आयुष्यभर विमा रकमेच्या १०% रक्कम नियमित मिळत राहते या लेखा मध्ये या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.

LIC Jeevan Utsav details
LIC Jeevan Utsav details

Jeevan Utsav Yojana वैशिष्ट्ये

ही योजना अल्प कालावधीत प्रीमियम भरून दीर्घकालीन संरक्षण प्रदान करते. तुमच्याकडे दोन अद्वितीय उत्पन्न पर्याय उपलब्ध आहेत:
(1) नियमित उत्पन्न (Regular Income Option) आणि (2) फ्लेक्सी उत्पन्न (Flexi Income Option).

  • Option 1 – Regular Income: पॉलिसीच्या ठराविक वर्षांनंतर दर वर्षी 10% बेसिक सम अ‍ॅशुअर्ड पॉलिसीधारकास दिला जातो. ही रक्कम दरवर्षी नियमितपणे मिळत राहते, जी निवृत्तीपूर्व किंवा निवृत्तीनंतर आर्थिक आधार ठरते.
  • Option 2 – Flexi Income: या पर्यायात पॉलिसीधारक दरवर्षीचा उत्पन्न पुढे ढकलू शकतो व त्या रकमेला 5.5% वार्षिक कंपाऊंड व्याज मिळते. ही रक्कम आवश्यकतेनुसार किमान 75% पर्यंत काढता येते.

या एलआयसी जीवन उत्सव योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात गॅरंटीड अडिशन्स (Guaranteed Additions) मिळतात. प्रत्येक 1000 रुपये विमा रकमेसाठी दरवर्षी 40 रुपये निश्चित बोनस जोडला जातो. हे बोनस आयुष्यभर वाढत राहतात, ज्यामुळे तुमचा आर्थिक पाया भक्कम होतो. हे अ‍ॅडिशन्स पॉलिसीचे एकूण मूल्य वाढवतात व योजनाधारकाच्या मृत्यूच्या वेळी किंवा कोणत्याही वर्षी पॉलिसी बंद करताना भरलेल्या रॅकमरसहित गॅरेंटेड एडिशन बोनस लाभ परत दिला जातो. या लाभामुळे ही योजना केवळ आयुर्विमा संरक्षणच नव्हे तर नियमित बचत व गुंतवणूक म्हणूनही उपयुक्त ठरते.

प्रीमियम भरण्याचे पर्याय

LIC Jeevan Utsav योजनेमध्ये ग्राहकाच्या सोयीसाठी प्रीमियम भरण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत जसे कि मासिक (Monthly – NACH प्रणालीद्वारे), त्रैमासिक (Quarterly), सहामाही (Half-Yearly), वार्षिक (Yearly) यासाठी किमान विमा रक्कम ₹5,00,000/- असावी लागते.

LIC आयुर्विमा ग्राहकांसाठी प्रीमियम भरण्यासाठी विशिष्ट ग्रेस पीरियड देते: मासिक प्रीमियमसाठी: 15 दिवस, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक प्रीमियमसाठी: 30 दिवस. ही मुभा प्रीमियम भरण्यात चुक झाल्यास पॉलिसी रद्द होण्यापासून वाचवते आणि विमा संरक्षण अखंड चालू ठेवते.

एलआयसी जीवन उत्सव योजना फायदे

मृत्यू लाभ (Death Benefit):

योजना कालावधीमध्ये जर कोणत्याही कारणाने विमाधारकाचा मृत्यु झाला, तर नामनिर्देशित व्यक्तीस (Nominee) विमा रक्कम आणि जमा झालेले गॅरंटीड बोनस एकरकमी स्वरूपात दिले जाईल. यामुळे कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पूर्तता होते. हा लाभ एकूण भरलेल्या प्रीमियमच्या किमान 105% पेक्षा कमी नसतो.

सर्व्हायवल बेनिफिट (Survival Benefit):

नियमित उत्पन्न पर्याय: प्रीमियम भरण्याची मुदत संपल्यानंतर व ठराविक deferment period पूर्ण झाल्यानंतर, दरवर्षी विमा रकमेच्या 10% इतकी रक्कम आयुष्यभर मिळत राहील.

फ्लेक्सी उत्पन्न पर्याय: जर सर्वायवल बेनिफिट लाभ लगेच नको असेल तर, तो पुढे ढकलून त्यावरती रिइन्वेस्टमेन्ट करता येत आणि या रेइन्वेस्टमेन्ट वरती आपणास दरवर्षी 5.5% व्याज मिळते. यामुळे आपले उत्पन्न अजून वाढते आणि वाढीव बचत शक्य होते.

उत्पन्न लाभ सुरू होण्याचा कालावधी

प्रीमियम पूर्ण केल्यानंतर खालीलप्रमाणे उत्पन्न लाभ सुरू होतो: LIC Jeevan Utsav details

5 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 11 वे पॉलिसी वर्ष, 6 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 11 वे पॉलिसी वर्ष, 7 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 11 वे पॉलिसी वर्ष, 8 वर्षे प्रीमियम भरणे मुदत-11 वे पॉलिसी वर्ष, 9 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 12 वे पॉलिसी वर्ष, 10 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 13 वे पॉलिसी वर्ष, 11 वर्षे प्रीमियम भरणे मुदत – 14 वे पॉलिसी वर्ष, 12 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 15 वे पॉलिसी वर्ष, 13 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 16 वे पॉलिसी वर्ष, 14 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 17 वे पॉलिसी वर्ष, 15 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 18 वे पॉलिसी वर्ष, 16 वर्षे प्रीमियम भरणे मुदत- 19 वे पॉलिसी वर्ष

हे स्ट्रक्चर आपल्याला योजना निवडताना दीर्घकालीन योजना आखण्याची संधी देते. या लवचिकतेमुळे विमाधारकाला त्यांच्या गरजेनुसार उत्पन्न नियोजन करता येते.

उदाहरण

हि योजना 1 वर्ष असणाऱ्या मुलगा किंवा मुलगी यांच्या नावाने सुरु केली तर, विमा रक्कम ₹25,00,000 असेल आणि वार्षिक प्रीमियम 16 भरायचा असेल आणि याची मुदत 19 वर्षे असेल तर एकूण 16 वर्षांमध्ये ₹23,26,315 रुपये गुंतवले जातील आणि 19 वर्षानंतर ₹2,50,000 दरवर्षी तहयात परत मिळत राहतील.

LIC Jeevan Utsav details:
LIC Jeevan Utsav details: Age SA
LIC Jeevan Utsav details:
LIC Jeevan Utsav details: Premium chart
LIC Jeevan Utsav details:
LIC Jeevan Utsav details: benefit 1
LIC Jeevan Utsav details:
LIC Jeevan Utsav details: benefit 2

फ्लेक्सी उत्पन्न पर्याय मध्ये जर सर्वायवल बेनिफिट लाभ लगेच नको असेल तर, तो पुढे ढकलून त्यावरती रिइन्वेस्टमेन्ट करता येत आणि या रेइन्वेस्टमेन्ट वरती आपणास दरवर्षी 5.5% व्याज मिळते.

LIC Jeevan Utsav details
LIC Jeevan Utsav details: benefit 3
LIC Jeevan Utsav details
LIC Jeevan Utsav details: Benefit 4

अतिरिक्त रायडर्स

तुमच्या विमा योजनेला आणखी व्यापक बनवण्यासाठी खालील रायडर्स (Riders) जोडता येतात: LIC Jeevan Utsav details

  • अपघाती मृत्यू व अपंगत्व लाभ रायडर (Accidental Death and Disability Rider)
  • गंभीर आजार रायडर (Critical Illness Rider)
  • नवीन टर्म अश्युरन्स रायडर (New Term Assurance Rider)
  • प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर (Premium Waiver Benefit Rider)

हे रायडर्स विमा संरक्षणात विशेष भर घालतात आणि अपघात किंवा गंभीर आजाराच्या वेळी मोठा आर्थिक आधार देतात.

LIC Jeevan Utsav details
LIC Jeevan Utsav details

योजनेचे इतर मुख्य फायदे

रिव्हायव्हल: जर प्रीमियम वेळेवर भरला गेला नाही तर पॉलिसी रद्द होते. पण प्रीमियम न भरल्याच्या 5 वर्षांच्या आत, थोड्या अटी व नियमांसह, पॉलिसी पुन्हा सुरू करता येते. ही सुविधा विमाधारकाला त्यांच्या विमा संरक्षणाला नवे बळ देण्याची संधी देते.

पॉलिसी सरेंडर: जर विमाधारकाने किमान दोन वर्षांचे प्रीमियम भरले असतील तर गरज असल्यास पॉलिसी सरेंडर करता येते. सरेंडर व्हॅल्यूसुद्धा आकर्षक असते आणि गरजेच्या वेळी मोठी मदत ठरते.

कर्ज सुविधा: पॉलिसी सुरू झाल्यानंतर दोन वर्षे पूर्ण प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीवर काही विशिष्ट अटींमध्ये, विमाधारकाला कर्ज मिळू शकते. ही सुविधा वैयक्तिक गरजांसाठी, शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. ही सुविधा अनपेक्षित आर्थिक गरजांसाठी मदत करते.

कर सवलती (Tax Benefits) या योजनेत प्रीमियम भरताना आणि मिळणाऱ्या उत्पन्नावर भारत सरकारच्या Income Tax Section 80C & 10(10D) अंतर्गत विविध कर सवलती उपलब्ध आहेत.

LIC Jeevan Utsav details

LIC Jeevan Utsav योजना ही एक अशी संधी आहे जी गुंतवणुकीसोबतच हमखास उत्पन्न आणि विमा संरक्षण देते. ही योजना विशेषतः त्या व्यक्तींना योग्य आहे जे निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार शोधत आहेत. अत्यंत विश्वासार्ह LIC सारख्या संस्थेची ही योजना असल्यामुळे गुंतवणुकीची सुरक्षितता नक्कीच खात्रीशीर आहे.

थोडक्यात सांगायचं झालं, तर LIC Jeevan Utsav योजना ही “निवृत्तीचे आर्थिक बळ आणि कुटुंबासाठी विमा संरक्षण” या दोन्हींचा उत्तम मिलाफ आहे. तुम्ही दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.

तुम्हाला या योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास, नजीकच्या LIC शाखेत संपर्क करा किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

LIC Jeevan Utsav details external links: https://licindia.in/

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now