LIC Aadhar Stambh Plan: योजनेमध्ये मिळेल, विमा संरक्षणसह अधिक लाभ, कमी प्रीमियम मध्ये, जाणून घ्या कसे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

LIC Aadhar Stambh Plan : भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येतील पुरुष वर्गाला आर्थिक सुरक्षा आणि बचत प्रदान करण्यासाठी LIC OF INDIA ने अतीशय खास अशी योजना डिझाइन केली आहे, जिचे नाव आहे ‘आधार स्तंभ’ योजना. हि योजना नॉन-लिंक्ड, नफ्यासह, एंडोमेंट पद्धतीची असून संरक्षण आणि बचत यांचे एकत्रीकरण आहे. या योजनेमार्फत पॉलिसीधारकांचे भविष्य सुरक्षित होण्याची सुनिश्चिती मिळते.

LIC Aadhar Stambh Plan हि योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) प्रमुख योजनापैकी एक आहे, विशेषतः योजनधारकांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हि योजना सुरू करण्यात आलेली आहे. या लेखामध्ये योजनेसंदर्भात फायदे, अटी, पात्रता इ. गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व समजून घ्या.

LIC Aadhar Stambh Plan काय आहे?

LIC आधारस्तंभ योजना ही एक नॉन-लिंक्ड, नफ्यासह असलेली, एंडोमेंट पद्धतीची विमा योजना आहे, जी UIDAI द्वारे जारी  केलेल्या, आधार कार्ड असलेल्या पुरुष गुतवणूकदारांसाठी तयार केलेली आहे. ही योजना संरक्षण आणि बचतीचे यांचे दुहेरी लाभ देते. योजनाधारकाचे मुदतीदरम्यान अकाली निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी मॅच्युरिटीच्या वेळेस एकरकमी रक्कम देते. ही योजना नफ्यात सहभाग देखील घेते, याचा अर्थ पॉलिसीधारक LIC द्वारे घोषित बोनस प्राप्त करण्यास पात्र आहेत.

LIC Aadhar Stambh Plan: पात्रता, निकष

किमान वय: 8 वर्षे

कमाल वय: 55 वर्षे

पॉलिसी टर्म: 10 ते 20 वर्षे

प्रीमियम भरण्याची मुदत: घेतलेल्या मुदतीप्रमाणे (10 पासून 20 वर्षापर्यंत)

किमान मूळ विमा रक्कम: ₹2,00,000

कमाल मूळ विमा रक्कम: ₹5,00,000

कमाल परिपक्वता वय: 70 वर्षे

LIC Aadhar Stambh Plan
LIC Aadhar Stambh Plan

LIC आधारस्तंभ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

संरक्षण: पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नॉमिनीला संपूर्ण विमा रक्कम आणि जमा झालेला लॉयल्टी एडिशन मिळेल 

बचत: पॉलिसीची मुदत संपेपर्यंत योजना धारक हयात असेल तर, त्याला  संपूर्ण विमा रक्कम आणि एकूण मुदतीपर्यंत जमा झालेला लॉयल्टी एडिशन मिळेल.

नफ्यात सहभाग: ही योजना कॉर्पोरेशनच्या नफ्यात सहभाग घेऊन, पॉलिसी मुदतीदरम्यान घोषित केलेल्या लॉयल्टी एडिशन साठी पात्र होईल.

ऑटो कव्हर कालावधी: किमान तीन पूर्ण वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर, ही योजना दोन वर्षांचा ऑटो लाईफ कव्हर कालावधी देते.

कर्ज सुविधा: पॉलिसीधारक गरजेच्या वेळी पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात.

प्रीमियम पेमेंट मोड : प्रीमियमची रक्कम पॉलिसीधारकाचे वय, पॉलिसीची मुदत आणि निवडलेल्या मूळ विमा रकमेवर आधारित बदलते. या योजनेसाठी भरावे लागणारे प्रीमियम वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक पद्धतीने भरू शकतो.

वाढीव कालावधी: वार्षिक, सहामाही किंवा त्रैमासिक प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा आणि मासिक प्रीमियमसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी प्रदान केला जातो.

LIC आधार स्तंभ योजना: फायदे

मृत्यू लाभ: पॉलिसीची मुदत पूर्ण होण्याआधी कोणत्याही कारणाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला, वार्षिक प्रीमियमच्या 10 पट किंवा मूळ विमा रक्कम किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियमच्या 105% यापैकी जे जास्त असेल ते दिले जाईल, त्याचबरोबर जमा झालेला लॉयल्टी एडिशन दिला जाईल.

मॅच्युरिटी लाभ: योजनेची कालावधी पूर्ण होईपर्यंत योजना धारक हयात असल्यास, योजना धारकास संपूर्ण विमा रक्कम आणि त्यावरील पूर्ण वर्षांचा जमा झालेला लॉयल्टी एडिशन, मॅच्युरिटी लाभ म्हणून परत मिळेल.

कर लाभ: या योजनेंतर्गत भरलेले प्रीमियम आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत. कलम 10(10D) अंतर्गत मॅच्युरिटी लाभ रक्कम देखील करमुक्त आहे.

LIC आधारस्तंभ योजना का निवडावी?

LIC Aadhar Stambh Plan योजना विमा संरक्षण आणि बचत या दोन्हीचं एकत्रिकरण असल्यामुळे आणि लॉयल्टी एडिशनचा सहभाग, कर्ज सुविधा, कर लाभ आणि इतर बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे, ही योजना सर्व समावेशक आणि खास योजना बनली आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना परवडणारे प्रीमियम असल्यामुळे, वेगवेगळ्या रकमेचे पर्याय मिळतात, त्यामुळे कमी रकमेमध्ये जास्तीत जास्त विमा संरक्षण व जास्तीत जास्त लाभ घेण्याची संधी या योजनेने दिली आहे.

एलआयसी आधार स्तंभ प्लॅन उदाहरण

या योजनेसाठी एका 35 वयाच्या पुरुष योजना धारकाचे उदाहरण घेणार आहोत. या योजनेची मुदत 20 वर्ष आणि विमा रक्कम 5,00,000 लाख रुपये असेल, हप्ता भरण्याची पद्धत वार्षिक असेल तर आपणास किती रक्कम भरावी लागेल आणि किती रक्कम मिळेल, ते पुढील उदाहरण लक्षात येईल. याचसोबत योजनाधारकास मुदत कालावधीमध्ये ₹5,00,000 लाख रुपयांचे नैसर्गिक मृत्यू विमा संरक्षण आणि ₹10,00,000, लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळेल, जे प्रत्येक वर्षी काही प्रमाणात वाढत जाईल.

या योजनेअंतर्गत, 35 वयाच्या योजना धारकास ₹19,514 रुपये वार्षिक प्रीमियम असेल दुसऱ्या वर्षी तोच प्रीमियम ₹19,094 रुपये असा होईल. योजना धारकास पूर्ण वीस वर्ष हप्ता भरायचा आहे. वीस वर्षांमधील भरली जाणारी रक्कम ₹3,82,300 रुपये होईल. मॅच्युरिटी वेळेस वीस वर्षानंतर विमाधारकास ₹6,62,500 रुपये ही रक्कम मॅच्युरिटी लाभ म्हणून, एक रकमी मिळणार आहे. (ही रक्कम लॉयल्टी एडिशनच्या आजच्या रेट नुसार आहे, भविष्यामध्ये हा रेट कमी किंवा जास्त होऊ शकतो)

आवश्यक कागदपत्रे

LIC Aadhar Stambh Plan योजनेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आयडेंटिटी साइज फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स, अधिकृत मोबाईल नंबर, ई-मेल आयडी इत्यादी आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत.

LIC Aadhar Stambh Plan योजना ही पुरूष पॉलिसीधारकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली, एक उत्तम विमा पॉलिसी आहे. संरक्षण आणि बचत, नफ्यातील सहभाग आणि कर्ज सुविधा आणि कर लाभ यासारख्या अतिरिक्त वैशिष्ट्यांसह, दुहेरी लाभांसह, एक विश्वासार्ह आणि फायदेशीर योजना म्हणून उभी आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित भविष्य शोधत असाल किंवा चांगला परतावा देणारी बचत योजना खरेदी करण्याचे विचारात असाल तर, LIC आधारस्तंभ योजना ही एक सुज्ञ निवड आहे.

तुम्हाला या LIC Aadhar Stambh Plan योजनेद्वारे तुमचे भविष्य सुरक्षित करण्यात स्वारस्य असल्यास, तुमच्या LIC आयुर्विमा प्रतीनिधीला संपर्क करा किंवा आपल्या नजीकच्या एलआयसी ऑफ इंडिया च्या शाखेला भेट द्या किंवा एलआयसी ऑफ इंडियाच्या अधिकृत ऑनलाइन वेबसाईटला www.licindia.in भेट द्या.