LIC Kanyadan Policy In Marathi: या सुपरहिट योजनेत ₹१४० गुंतवून, तुम्हाला ₹३१ लाख रुपयांचा फायदा मिळेल.

LIC Kanyadan Policy In Marathi: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे तुमची, आमची, सर्वांची आयुर्विमा कंपनी LIC ने आपल्या योजनाधारकांची नेहमीच काळजी घेतली आहे. १९५६ पासून आजपर्यंत वेळेनुसार ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी मार्केट मध्ये नव नवीन योजना आणल्या आहेत आणि प्रत्येक योजनाधारकांना फायदा करून दिला आहे. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका विशेष कन्यादान योजनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज ₹१४० जमा केल्यास तुम्हाला एकाच वेळी ₹३१ लाख रुपये दिले जातील. या योजनेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कृपया हा लेख संपूर्ण वाचा आणि इतर लोकांनाही या योजनेची माहिती द्या.

तुमच्या मुलांच्या लग्नाची, शिक्षणाची आणि त्यांच्या करिअर ची काळजी करण्याची गरज नाही, कारण एलआयसीने एक उत्तम योजना सुरु केली आहे. तुम्ही या योजनेत दररोज ₹१४० रुपये जमा केल्यास तुम्हाला एलआयसीकडून मॅच्युरिटी वेळीस ₹३१ लाख रुपये मिळतील. तुमचे पैसे LIC च्या योजनेत गुंतवा आणि निश्चिन्त राहा. तुम्ही तुमच्या मुलीच्या किंवा बहिणीच्या नावावर कन्यादान पॉलिसी घेऊ शकता, ज्याची मुदत मर्यादा १३ वर्षे ते २५ वर्षे आहे. तुम्हाला किती वर्षे प्रीमियम भरायचा आहे आणि किती भरायचा आहे, त्यावरती तुमची मॅच्युरिटी रक्कम अवलंबून असेल.

lic kanyadan policy in marathi
lic kanyadan policy in marathi

lic kanyadan policy in marathi

तुम्हाला ही LIC कन्यादान पॉलिसी घ्यायची असेल, तर तुमच्या मुलीचे वय किमान तीन महिने पूर्ण असलेले हवे आणि जास्तीत जास्त वय १२ वर्ष च्या आत हवे. वास्तविक, ही एलआयसी कन्यादान पॉलिसी किमान १३ वर्षापासून ते २५ वर्षापर्यंत कोणत्याही मुदतीची घेता येते, ज्यामध्ये तुम्ही घेतलेल्या मुदतीच्या शेवटच्या तीन वर्षाचे कोणतेही प्रीमियम भरावे लागणार नाहीत. किमान विमा रक्कम एक लाख असून कमाल विमा रक्कम मर्यादा नाही.

Also Read:-  ITR Return filing: 'या' 10 प्रकारच्या उत्पन्नावर लागत नाही इन्कम टॅक्स: IT रिटर्न फाइलिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

31 लाख कसे मिळवायचे?

LIC Schemes उदाहरण पाहायचे असेल तर, एक सहा महिन्याच्या मुलीच्या नावावरती आई किंवा वडील यांनी हि योजना सुरु केली तर, त्याचा फायदा किती होतो, हे लक्षात घेऊया. एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये, दररोज ₹१४० रुपये भरल्यानंतर, तुम्हाला दरमहा  ₹४,५३० रुपये गुंतवावे लागतील. हा प्रीमियम फक्त पहिल्या वर्षी असेल, दुसऱ्या वर्षीपासून हा प्रिमियम थोडा कमी होईल म्हणजेच ₹४,३६१ रुपये महिना असेल. हि रक्कम तुम्हाला २२ वर्षे गुंतवायची आहे, म्हणजे तुमची एकूण मुदत २५ वर्षे होईल. २२ वर्षातील तुमची रक्कम ₹११,२८,३६४ जमा होतील. त्यानंतर मुलीच्या वयाच्या २५ व्या वर्षी मुदत पूर्ण झाल्यावर, तुम्हाला LIC योजनेच्या माध्यमातून ₹३१ लाख रुपयांचा लाभ मिळेल.

तुम्ही घेतलेल्या २५ वर्षाच्या मुदतीमध्ये २२ वर्ष LIC च्या योजनेमध्ये प्रीमियम भरायचा आहे. तुमच्याकडून भरल्या गेलेल्या प्रीमियम वरती LIC कडून बोनस स्वरूपात व्याज म्हणून एकूण रक्कम ₹१९,२०,००० मिळेल, सोबत विमा रक्कम ₹१२,००,००० मिळेल, म्हणजेच योजना पूर्ण झाल्यावरती ₹३१,२०,००० एकरकमी रक्कम मॅच्युरिटी म्हणून दिली जाईल. या सोबत ₹३२ लाख रुपयांचे विमा संरक्षण सुद्धा LIC कडून मुदत संपेपर्यंत दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

lic kanyadan policy in marathi कन्यादान योजनेसाठी मुलीचा जन्म दाखला. पालकांचे आधार कार्ड. पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साइज फोटो. इ आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत.

LIC कन्यादान पॉलिसी कशी घ्यावी

एलआयसी कन्यादान पॉलिसी सुरु करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी शाखा कार्यालयात जाऊन विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता किंवा तुमच्या LIC विमा प्रतिनिधींशी या योजनेबाबत सविस्तर चर्चा करून योजना सुरु करू शकता. या योजनेच्या अधिक माहितीसाठी www.licindia.in अधिकृत वेबसाइटल ला भेट द्या

Also Read:-  Palkhi Route: आषाढी वारी पालखीचं लाईव्ह ट्रॅकिंग, ट्रॅफिक अपडेट्स आणि पार्किंग माहिती; आता एका क्लिकवर, पुणे पोलिसांची विशेष सेवा पहा.

Table of Contents

Contact us
WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now