Jeevan Utsav Yojana 2024: भारतातील अग्रगण्य आयुर्विमा संस्था ‘भारतीय जीवन बिमा निगम’ म्हणजेच आपल्या सर्वांची विश्वासार्हय आयुर्विमा कंपनी LIC OF INDIA हि होय. १९५६ पासून ते आजपर्यंत अखंड पणे भारतातील लोकांना आयुर्विम्याचे संरक्षण देण्याचं काम करत आहे. हि संस्था लोकांच्या फारच जवळची आर्थिक संस्था म्हणून म्हणून आजही उभी आहे, याचे मुख्य कारण म्हणजे लोकांच्या मध्ये संस्थेबद्दल असणारी विश्वासार्हता होय.
आम्ही तुम्हाला LIC च्या जीवन उत्सव योजना या एका खास योजनेची माहिती देणार आहोत. तुम्ही या योजनेमध्ये कशापद्धतीने आणि कसे ७ कोटी रुपये घेऊ शकता? आणि त्यासाठी तुम्हाला या योजनेमध्ये किती पैसे गुंतवावे लागतील? या सर्व गोष्टींची सर्व माहिती सांगणार आहोत, त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल आणि सांगितलेली माहिती समजून घ्यावी लागेल.
Jeevan Utsav Yojana 2024 योजना ही एक सर्व समावेशक योजना आहे. हि योजना बचतीच्या लवचिकतेसह संपूर्ण आयुष्यभर जीवन विम्याचे संरक्षण प्रदान करत राहते. आपण घेतलेल्या आयुर्विमा संरक्षण किमतीच्या १०% वार्षिक दराने वेटिंग पिरियड नंतर आपणास पेन्शन स्वरूपात परतावा तहयात देत राहते.
Jeevan Utsav Yojana 2024: हि योजना घेण्यासाठी पात्रता
या योजनेमध्ये आपली काही रक्कम गुंतवून ७ कोटी रुपयांचा फायदा आपल्या मुलांना करून द्यायचा असेल तर, कोणीही आई किंवा वडील आपल्या मुलगा किंवा मुलगी च्या नावाने हि योजना घेऊ शकतात आणि आपल्या मुलांना हि योजना भेट देऊ शकतात. या योजनेमध्ये पालकांचे वाय १८ पासून ५० पर्यंत असले पाहिजे पण हि योजना मुलाच्या नावानेच काढली जाणार आहे.
योजनेसाठी पालकांचे वय १८ ते ५० हवे त्याच प्रमाणे आपल्या बाळाचे वय सुद्धा महत्वाचे आहे. म्हणजेच आपल्या बाळाचे वय ० पासून ते १२ वर्षाच्या मध्ये असावे. पण एखाद्या पालकांची मुले १३ वर्षांपासून ते १८ वर्षापर्यंत असतील तरी सुद्धा हे पालक या योजने मध्ये सामील होऊ शकतात. १३ वर्षांपासून ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी या योजनमध्ये आपण भरणारा हप्ता जास्त असेल.
हप्ते स्वरूपात आपणास किती पैसे व केंव्हापर्यंत भरावे लागतील?
या योजने मध्ये आपणास वर्षातून एकदा एक लाख रुपये असे एकूण पंधरा वर्ष, पंधरा लाख रुपये भरावयाचे आहेत. म्हणजेच आपला मुलगा किंवा मुलगी एक वर्षाचे आहेत असे गृहीत धरले तर त्यांच्या वयाच्या सोळा वर्षापर्यंत आपणास एक लाख रुपये वर्षातून एकदा भरावे लागतील. आपणास या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण पंधरा लाख रुपये एलआयसीच्या या योजनेमध्ये जमा करावे लागणार आहेत.
ज्यां पालकांची मुले तेरा आणि अठरा वर्षांच्या मध्ये आहेत त्यांच्यासाठी या योजनेमध्ये हप्ता भरण्याची मुदत पंधरा वर्षेच राहील.
Jeevan Utsav Yojana 2024 चे फायदे काय आहेत?
Jeevan Utsav Yojana 2024 ही योजना पेन्शन स्वरूपाची आहे. आपण घेतलेली १५ वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर आपणास प्रत्येक वर्षी, आपली जी विमा रक्कम असेल त्याच्या वार्षिक १०% रक्कम पेन्शन स्वरूपात वर्षातून एकदा, अशी तहयात मिळणार आहे.
ही Jeevan Utsav Yojana 2024 योजना सुरू केल्यानंतर योजना धारकाच्या मृत्यू लाभाचे सुद्धा संरक्षण दिले आहे. हे संरक्षण बेसिक विमा रक्कम २४,००,०००/- रुपयांचे असेल. घेतलेल्या मुदतीदरम्यान योजना धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला, तर कायदेशीर नॉमिनीला ‘मृत्यूची बेसिक विमा रक्कम २४,००,०००/- आणि त्यावरती जमा झालेला ‘बोनस’ रक्कम एकत्रितरित्या देऊन ही योजना बंद करण्यात येईल.
जीवन उत्सव योजनेमध्ये मध्ये सर्व्हायव्हल बेनिफिट्स कसे कार्य करतात?
या योजनेमध्ये पेन्शन म्हणजे सर्व्हायव्हल बेनिफिट्स घेण्याच्या पद्धती दोन प्रकारच्या आहेत. एक म्हणजे रेग्युलर इन्कम बेनिफिट आणि दुसरी म्हणजे फ्लेक्सी इन्कम बेनिफिट तर आपण हे दोन्हीही पर्याय थोडक्यामध्ये पाहूया.
रेग्युलर इन्कम बेनिफिट/ Regular Income Benefit Option- 1
Jeevan Utsav Yojana 2024 योजनाधारकास आपली पैसे भरण्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर वेटिंग पिरियड नंतर विमा रकमेच्या १०% वार्षिक दराने सर्व्हायव्हल बेनिफिट्स वर्षातून एकदा मिळणार आहे. हा फायदा योजनाधारकाच्या मृत्य पर्यंत म्हणजे तहयात चालूच राहील.
फ्लेक्सी इन्कम बेनिफिट/ Flexi Income Benefit Option- 2
या पर्याय मध्ये योजनाधारकास वेटिंग पिरियड नंतर विमा रकमेच्या १०% प्रमाणेच म्हणजे पर्याय १ प्रमाणेच रक्कम तहयात मिळणार आहे. या पर्यायाच्या अनुसार आपणस मिळणारी १०% रक्कम योजनाधारक स्वतः न घेता, हि १०% रक्कम LIC OF INDIA ला रिटर्न देऊन त्यावरती ५.५ % (साडेपाच टक्के) वार्षिक दराने व्याज घेईल. म्हणजे हि रक्कम चक्रवाढ व्याज दराने वाढत जाईल. काही कारणाने योजनधारकास पैसे काढावयाचे असतील तर जमा झालेल्या रकमेच्या ७५% रक्कम योजनाधारक कधीही काढू शकतो
वेटिंग पिरियड काय असेल
१ वर्षाच्या मुलगा किंवा मुलगी साठी १५ वर्षे हप्ते भरायचे आहेत म्हणजेच १ वर्षांपासून ते १५ वर्षापर्यन्त हप्ते भरल्यानंतर १६,१७,१८ आणि १९ वयापर्यंत म्हणजे ३ वर्षे हा वेटिंग पिरियड असेल. १९ व्या वर्षी पहिला सर्व्हायव्हल बेनिफिट मिळेल व तिथून पुढे सर्व बेनिफिट हे प्रत्येक वर्षी मिळत जातील.
7 कोटी रुपये कसे मिळतील व मॅच्युरिटी काय आहे?
Jeevan Utsav Yojana 2024 योजना धारकांची हप्ते भरण्याची मुदत संपल्यानंतर या योजनेचे विमा रकमेच्या १०% बेनिफीट फायदे सुरू होतात. योजना धारकास मिळणारी ७ कोटी हि रक्कम याच फ्लेक्सी इन्कम बेनिफिटच्या पर्यायाने वाढत जाते. या पर्यायने आपणास १५ वर्षे ते १०० वर्षे किती रक्कम मिळत जाईल हे, खाली दिलेल्या चार्ट नुकसार लक्षात येईल.
AGE | PREMIUM | RETURNS | SURRENDER | LOAN |
1 | 100320 | 0 | 0 | 0 |
2 | 98160 | 0 | 57600 | 43200 |
3 | 98160 | 0 | 180000 | 135000 |
4 | 98160 | 0 | 274050 | 205537 |
5 | 98160 | 0 | 390840 | 293130 |
6 | 98160 | 0 | 530350 | 397762 |
7 | 98160 | 0 | 652800 | 489600 |
8 | 98160 | 0 | 784710 | 588532 |
9 | 98160 | 0 | 926160 | 694620 |
10 | 98160 | 0 | 1077000 | 807750 |
11 | 98160 | 0 | 1237400 | 928250 |
12 | 98160 | 0 | 1380880 | 1035660 |
13 | 98160 | 0 | 1529760 | 1147320 |
14 | 98160 | 0 | 1684350 | 1263262 |
15 | 98160 | 0 | 1845000 | 1383750 |
16 | 0 | 0 | 1683840 | 1262880 |
17 | 0 | 0 | 1789920 | 1342440 |
18 | 0 | 0 | 1903200 | 1427400 |
19 | 0 | 150000 | 1904640 | 1428480 |
20 | 0 | 308250 | 1906080 | 1428480 |
25 | 0 | 1240031 | 1913039 | 1434779 |
30 | 0 | 2457831 | 1919039 | 1439279 |
35 | 0 | 40494447 | 1922640 | 1441660 |
40 | 0 | 6129627 | 1924080 | 1443060 |
45 | 0 | 8848338 | 1925280 | 1443960 |
50 | 0 | 12401584 | 1926480 | 1444860 |
55 | 0 | 17045535 | 1927920 | 1445940 |
60 | 0 | 23114994 | 1929120 | 1446840 |
65 | 0 | 31047533 | 1930320 | 1447740 |
70 | 0 | 41415046 | 1931520 | 1448640 |
75 | 0 | 59664970 | 1932720 | 1449540 |
80 | 0 | 72674178 | 1933920 | 1450440 |
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आई किंवा वडील यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, आयडेंटी साईज फोटो.
- मुलगा किंवा मुलगी यांचे आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखल, शाळेत जात असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट, पॅन कार्ड (जर असेल तर)
आपण जीवन उत्सव योजना बंद करू शकतो काय?
योजना धारक हि योजना चालू केल्यापासून दोन वर्षानंतर काही कारणाने बंद करायची असल्यास सरेंडर म्हणजे बंद करू शकतो. त्यासाठी या प्लॅन मध्ये किमान दोन वर्षाचे हप्ते भरले गेले असले पाहिजेत. योजनेच्या नियमानुसार याची सरेंडर व्हॅल्यू दिली जाईल.
जीवन उत्सव करमुक्त आहे का?
Jeevan Utsav Yojana 2024 योजनाधारकास आयकर कायदा १९६१ च्या कलाम 80C अंतर्गत LIC जीवन उत्सव योजनेसाठी भरलेल्या सर्व हप्त्यांवर कर लाभ मिळेल. याचबरोबर प्राप्त होणारे सर्व सर्व्हायव्हल बेनिफिट्स आयकर कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त असतील.
निष्कर्ष
आमच्या माहिती प्रमाणे, या लेखामध्ये LIC OF INDIA जीवन उत्सव योजनेमध्ये आपणास कशा पद्धतीने फायदा होणार आहे, त्याची कागदपत्रे, तपशील, हप्ते संदर्भांत माहिती आणि आपणास मिळणाऱ्या बेनिफिट्सने ७ कोटी रुपये कशा पद्धतीने मिळतील या सर्व गोष्टी विस्तृत पणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला अधिक माहिती असल्यास https://licindia.in ला क्लिक करा किंवा नजीकच्या LIC office ला भेट द्या किंवा तुमच्या LIC विमा प्रतिनिधीशी संपर्क करा, योग्य गुंतवणूक करण्यास आजच प्रारंभ करा
Table of Contents