LIC Children’s Money Back Plan: सह आपल्या मुलांचे उज्ज्वल करा भविष्य, LIC ची अप्रतिम विमा योजना.

LIC Children’s money back plan: आपल्या मुलांसाठी संपूर्ण आर्थिक सुरक्षा: एलआयसी (भारतीय जीवन बीमा निगम) ने आपल्या ग्राहकांसाठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी अनेक विमा योजना आणल्या आहेत. या योजनांमधला चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन हि एक अत्यंत लोकप्रिय विमा योजना आहे. या लेखा मध्ये याच योजनेबद्दलची सर्व वैशिष्ट्य, फायदे, तोटे, उदाहरण, आणि महत्वाचे पॉइंट्स याची सर्व माहिती पाहणार आहोंत, या माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा.

LIC Children’s money back plan: वैशिष्ट्ये:

वयोमर्यादा: या योजनेत प्रवेश करण्यासाठी मुलांचे वय 0 ते 12 वर्षांच्या दरम्यान असावे.

पालकांचे वय : आई, वडील, पालक किंवा कायदेशीर संरक्षका यांचे वय 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे

पॉलिसी कालावधी: या योजनेचा कालावधी 25 वर्षांचा आहे, मात्र मुलांच्या वयानुसार हा कालावधी कमी होऊ शकतो.

मनी बॅक परतावा: योजना कालावधीमध्ये ठराविक टप्प्यांवर मुलांना मनी बॅक परतावा दिला जातो. हे टप्पे सामान्यत: मुलांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक गरजांसाठी महत्त्वाचे असतात. ते म्हणजे त्यांच्या वयाच्या 18, 20, 22 व्या वर्षी विमा रकमेच्या 20% प्रमाणे मिळतील.  

बोनस: योजना कालावधी मध्ये प्रत्येक वर्षी नियमित बोनस पॉलिसीधारकांच्या खातेवरती जमा केला जातो, जो त्यांच्या बचतीत भर घालतो. हा बोनस मुदत सम्पल्यावरत्ती मूळ विमा रक्कम सोबर योजनाधारकाला दिला जातो.

विमा संरक्षण: या संपूर्ण कालावधीमध्ये कोणत्याही कारणाने पॉलिसीधारकाच्या आकस्मिक निधनाच्या स्थितीत, पॉलिसी चालू राहते आणि मुलांना आर्थिक सुरक्षा मिळते.

LIC Children's money back plan
LIC Children’s money back plan

एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनचे फायदे:

शैक्षणिक खर्चाची पूर्तता: मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची पूर्तता, या योजनेद्वारे करता येते. उदाहरणार्थ, जर मुलांचे वय 18 वर्षे असेल, तर त्या वयात मिळणारा मनी बॅक परतावा त्याच्या कॉलेज शिक्षणासाठी उपयोगी पडतो.

वैयक्तिक गरजांची पूर्तता: विवाह, करियर किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी आर्थिक मदत मिळते. उदाहरणार्थ, 22 व्या वयात मिळणारा मनी बॅक परतावा मुलांच्या करियरच्या सुरवातीच्या खर्चासाठी उपयुक्त ठरतो.

कर लाभ: भारतीय आयकर कायद्या 1961 नुसार विमा प्रीमियमवर 80C नुसार कर सवलत मिळते. मनी बॅक परताव्यावर मिळणारा लाभ देखील करमुक्त असतो. त्यामुळे पालकांना आर्थिक सवलत मिळते

एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनचे उदाहरण:

समजा, एक पालक आपल्या 1 वर्षांच्या मुलासाठी एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन घेतात. त्यांनी पॉलिसी टर्म 24 वर्षे निवडली आणि प्रत्येक वर्षी 1,10,000/- रुपये प्रीमियम भरला. या पॉलिसीच्या आधारे  विमा रकमेच्या 20% मनी बॅक परतावा मुलाच्या 18व्या वर्षी त्याला 5,00,000/- 20व्या वर्षी त्याला 5,00,000/-  आणि 22व्या वर्षी त्याला 5,00,000/-  मिळेल, जो त्याच्या शिक्षण आणि करियरसाठी उपयुक्त  ठरणार आहे.

याचबरोबर मुदत संपल्यानंतर म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षी बोनस रक्कम 35,75,000/- आणि राहिलेली 40% विमा रक्कम 10,00,000/- रुपये असे एकत्रितरीत्या 45,75,000/ एकूण रक्कम परत मिळेल. या योजनेनुसार एकूण रक्कम 60,75,000/- रुपये विमाधारकाला मिळणार आहे. याच सोबत 25,00,000/- रुपयांचे विमा संरक्षण 24 वर्षे सुरु राहील.

एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनचे तोटे:

या योजने मधून मिळणारा परतावा इतर गुंतवणूक योजनांच्या तुलनेत कमी असू शकतो. त्यामुळे उच्च परताव्याची अपेक्षा असणाऱ्यांसाठी हा प्लॅन योग्य नाही. पॉलिसीचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी ठराविक टप्प्यांवर प्रतीक्षा करावी लागते. जर पालकांना तातडीने मोठी रक्कम आवश्यक असेल तर या योजनेत ते मिळणार नाही.

LIC Children's money back plan
LIC Children’s money back plan

एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनचे पॉइंट्स:

गुंतवणूक विविधता: पालकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या गुंतवणूक योजनांचा विचार करावा, जेणेकरून उच्च परताव्यासाठी विविध पर्याय असू शकतील.

प्रीमियमची नियमितता: पॉलिसीधारकांनी नियमितपणे प्रीमियम भरावे, जेणेकरून पॉलिसीचे फायदे सतत मिळू शकतील.

आर्थिक नियोजन: पालकांनी आर्थिक नियोजन करताना पॉलिसीचा विचार करावा, जेणेकरून त्यांच्या मुलांच्या भविष्यातील गरजांची योग्य पूर्तता होऊ शकेल.

LIC Children’s money back plan: कसा घ्यावा?

विमा प्रतिनिधींच्या माध्यमातून: एलआयसीच्या अधिकृत विमा प्रतिनिधींच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊ शकता. प्रतिनिधी आपल्याला सर्व प्रक्रिया समजावून देतील आणि अर्ज भरायला मदत करतील.

आवश्यक कागदपत्रे: आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की मुलांचा जन्म प्रमाणपत्र, पालकांचा ओळखपत्र, पत्ता पुरावा इ.

निष्कर्ष: LIC Children’s money back plan

LIC Children’s money back plan हा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेद्वारे मुलांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक गरजांची पूर्तता होते, तसेच त्यांना विमा संरक्षण मिळते. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी या योजनेचा विचार नक्की करा. या योजनेद्वारे पालकांना मानसिक शांती मिळते कारण त्यांच्या मुलांच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होते.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी LIC OF INDIA ची अधिकृत www.licindia.in वेबसाईट ला भेट द्या

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now