LIC money back policy: एलआयसी ची मनी बॅक योजना, 20 वर्षाच्या कालावधीसाठी अतिशय सर्वोत्तम पर्याय असणारी योजना आहे. एलआयसी कडून चालवली जाणारी ही योजना सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखी आहे. या योजनेमध्ये ठराविक कालावधी नंतर मिळणाऱ्या मनी बॅक मुळे, योजना धारकाला आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी फार मोलाची मदत होत असते. या योजनेमध्ये लाईफ कव्हर सह नियमित मनी बॅक चे अनोखे मिश्रण आपणास दिसून येते. या काही कारणामुळे ही योजना विमा धारकांच्या मध्ये खूप लोकप्रिय आहे.
ही LIC money back policy योजना इंडोमेंट योजनेसारखीच आहे. पॉलिसी धारकाला मनी बॅक प्रदान करत असते. कमी जोखीम आणि उच्च तरलता पद्धतीच्या योजना शोधत असलेल्या लोकांसाठी मनी बॅक योजना ही सर्वोत्तम पर्याय असल्याचे मानले जाते. एलआयसी न्यू मनी बॅक प्लॅन 20 वर्षाच्या कालावधी मध्ये जो हमी परतावा आणि बोनस ऑफर करते, हे कुटुंबासाठी मिळू शकणाऱ्या सर्वोत्तम आर्थिक सहाय्यापैकी एक सहाय्य आहे.
LIC money back policy योजना काय आहे ?
एलआयसी ची मनी बॅक योजना ही नॉन लिंक असलेली योजना आहे. बोनस साठी पात्र असलेली ही योजना, संपूर्ण कालावधीमध्ये योजना धारकास आर्थिक संरक्षण प्रदान करते आणि विशिष्ट कालावधीने योजना धारकाला मनी बॅक स्वरूपात रक्कम देत राहते.
पात्रता निकष
प्रवेशाचे वय: 13 ते 50 वर्ष
पॉलिसी मुदत: 20 वर्षे
हप्ते भरण्याची मुदत: 15 वर्षे
विम्याची रक्कम: किमान एक लाख रुपये, कमाल मर्यादा नाही
प्रीमियम पेमेंट पर्याय: वार्षिक, सामायिक, तिमाही किंवा मासिक.
मुदतपूर्तीस काय मिळेल ?
LIC money back policy या योजनेअंतर्गत योजना धारकास संपूर्ण कालावधीमध्ये संरक्षणासह बचत निर्माण करता येते. योजना धारक एक मोठी रक्कम आपल्या भविष्यातील स्वप्नांसाठी राखून ठेवू शकतो. मुदत पुरतीस विमा रकमेच्या 40% रक्कम व बोनस रक्कम विमाधारकास दिली जाते.
मृत्यू लाभ कसा असेल ?
LIC money back policy योजनेच्या कालावधीमध्ये विमाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर मृत्यूची विमा रक्कम आणि जमा झालेला बोनस योजना धारकाच्या वारसांना दिला जाईल. त्यापैकी नैसर्गिक मृत्यू आणि अपघाती मृत्यू या दोन्ही प्रकारापैकी विमा रक्कम ही थोड्याफार फरकाने वेगळी असेल.
मनी बॅक योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये.
- या योजनेच्या कालावधीमध्ये पाचव्या, दहाव्या आणि पंधराव्या वर्षी, मूळ विमारकमेच्या 20% रक्कम, म्हणजे एकूण 100% रकमेपैकी 60% रक्कम, मनी बॅक स्वरूपात योजना धारकाला परत दिली जाईल.
- योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर शेवटी, मूळ विमारकमेच्या 40% रक्कम आणि त्यावरील संपूर्ण कालावधीसाठी जमा झालेला बोनस, योजना धारकास दिला जाईल.
- योजनेच्या एकूण रिटर्न्स मध्ये वाढ करून एलआयसी ने वेळोवेळी घोषित केलेल्या बोनस साठी पात्र.
- अपघाती मृत्यू आणि अपंगत्व लाभ आणि गंभीर आजार रायडर्स उपलब्ध आहे.
- योजना बंद न करता आर्थिक लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी, योजना सुरू केल्यापासून तीन वर्षानंतर कर्ज घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
मनी बॅक योजना निवडण्याचे फायदे
LIC money back policy योजना धारकाच्या मुलांसाठीच्या शिक्षण, लग्न, मोठी खरेदी यासारखे विविध आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, मनी बॅक पॉलिसीच्या आर्थिक तरलतेचा फायदा होतो. योजना धारकाच्या कुटुंबासाठी प्रति असणारी, आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक जीवन संरक्षण मिळत राहते.
भारत सरकारच्या 1961 च्या आयकर कायदा कलम 80C अंतर्गत भरलेले सर्व हप्ते कर सवलतीसाठी पात्र असतील. काही अटींच्या अधीन राहून कलम 10(10D) अंतर्गत मुदतपूर्तीस मिळणारी मॅच्युरिटी रक्कम आणि मिळणारे सर्व मनी बॅक तसेच मृत्यूचे फायदे करमुक्त असतील. या योजनेमध्ये बचती सोबतच विमा संरक्षण यांची सांगड घातली गेली आहे. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक नियोजना साठी या योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते आणि आपणास मिळणाऱ्या मनी बॅक मुळे आपली लक्षपूर्ती होण्याची शक्यता वाढते.
एलआयसीची अधिकृत वेबसाइट www.licindia.in
या योजनेमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट हे योजना धारकासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन म्हणून काम करते. एक रकमी रक्कम या मिळाल्यामुळे विविध आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वापरले जाऊ शकते, जसे की शैक्षणिक खर्चासाठी निधी देणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा सेवानिवृत्तीसाठी पूरक सोय.
एलआयसीच्या मनी बॅक योजना ही पॉलिसीधारक मध्ये एक लोकप्रिय योजना आहे जी विमा आणि मनी बॅक यांचा परतावा नियोजन करते. वीस वर्षाच्या कालावधीसह ही योजना लाईफ कव्हरेज आणि नियमित मनी बॅक असे दुहेरी फायदे देते, ज्यामुळे संरक्षण आणि बचत या दोन्ही गोष्टी शोधणाऱ्यांसाठी ही एक आकर्षक विमा योजना आहे.
Table of Contents