LIC New Jeevan Anand Policy Details:₹ 315 वाचवून बनू शकतो करोडपती, मॅच्युरिटीला येतील 1 कोटी पेक्षा जास्त पैसे, कसे ते इथे वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LIC New Jeevan Anand Policy Details: भारतामधील लोकप्रसिद्ध आणि विश्वासू आयुर्विमा कंपनी म्हणजे ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ (LIC) आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना लाँच करत असते. ज्या ग्राहकांना कोणतीही छोटी रक्कम गुंतवून भविष्यामध्ये चांगले रिटर्न्स पाहिजे आहेत, अशा ग्राहकांसाठी नेहमीच फायदेशीर योजना मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेच्या पैकी एक फायदेशीर योजना म्हणजे एलआयसीची न्यू जीवन आनंद पॉलिसी योजना ही आहे.

आज-काल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी सुरू करणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा विषय बनला आहे. कोणत्याही पद्धतीच्या आर्थिक फटक्यापासून वाचण्यासाठी जीवन विमा पॉलिसी घेणे गरजेचे आहे. एलआयसी पहिल्यापासूनच अशा विशिष्ट पद्धतीच्या पॉलिसी लोकांसाठी घेऊन येत आहे. त्यापैकीच हि एक आयुर्विमा योजना आहे, जी हाय सिक्युरिटी आणि खूप चांगले रिटर्न्स देण्याची गॅरंटी देते.

न्यू जीवन आनंद पॉलिसीमध्ये योजना धारकाला रोजच्या हिशोबाने बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आपण दररोज तीनशे पंधरा रुपये वाचवू शकलो तर, मॅच्युरिटीच्या वेळेस एकूण रक्कम एक कोटी चार लाख चाळीस हजार रुपये आणि तीस लाख दुसरा मॅच्युरिटी लाभ, एलआयसी कडून मिळण्याची गॅरंटी या जीवन आनंद पॉलिसी मध्ये आहे. हि रक्कम आपणास कशापद्धतीने मिळू शकते आणि या योजनेमध्ये अजून कोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत, याची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये केला आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि समजून घ्या.

LIC New Jeevan Anand Policy Details
LIC New Jeevan Anand Policy Details

LIC New Jeevan Anand Policy Details:

LIC New Jeevan Anand Policy Details योजना ही एक अशी पॉलिसी आहे, ज्यामध्ये खूप चांगले रिटर्न दिले जातात तसेच ही योजना आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करते. या योजनेमध्ये मॅच्युरिटी लाभ एकूण दोन वेळा दिला जातो. पाहिला मॅच्युरिटी लाभ योजनाधारकाने घेतलेल्या मुदतीनंतर दिला जातो. मॅच्युरिटी लाभ मिळाल्यानंतर तहयात विमा संरक्षण वय वर्ष शंभर पर्यंत दिले जाते. मॅच्युरिटी लाभ नंतर कोणताही हप्ता न भरता पॉलिसी सुरू रहाते.

दुसरा मॅच्युरिटी लाभ योजनाधारक शंभर वयापर्यंत हयात असेल तर त्याला मॅच्युरिटी लाभ म्हणून विमा रक्कम दिली जाते. पहिला मॅच्युरिटी लाभ दिल्यानंतर योजना धारक व्यक्तीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर विमा रक्कम तीस लाख रुपये अधिकृत नॉमिनीला दिली जाते.

उदाहरण

LIC New Jeevan Anand Policy Details योजनेमध्ये तीस वर्ष वयाच्या स्त्री किंवा पुरूष साठी पुढील उदाहरण आहे आणि या योजनेची एकूण मुदत 30 वर्ष आहे असे गृहीत धरले तर पुढील प्रमाणे रक्कम मिळेल. योजनाधारकाच्या 60 व्या वर्षी ही योजना मॅच्युअर होईल.

315 रुपये रोजचा हप्ता × 30 दिवस = 9450 रुपये महिना हप्ता होतो. तिमाही हप्ता 28,333/- सहामाही 56,067/- वार्षिक 1,10,938/- रुपये पहिल्या वर्षाचा हप्ता भरावा लागेल. दुसर्‍या वर्षी हाच हप्ता 9,241 रुपये महिना, तिमाही हप्ता 27,723 सहामाही 54,860 वार्षिक 1,08,550 असेल.

एकूण मुदत 30 वर्ष असल्या कारणाने हप्ता 30 वर्षे भरावा लागेल. एकूण रक्कम, प्रीमियम स्वरुपात LIC मध्ये ₹ 32,58,888 जमा होईल. योजनाधारकाच्या 60 व्या वर्षी ही योजना मॅच्युअर होईल तेंव्हा LIC कडून, विमा रक्कम ₹ 30,00,000 + गॅरंटेड एडिशन बोनस ₹ 41,40,000 + फायनल ऍडिशनल बोनस ₹ 33,00,000 सह एकूण एक रकमी रक्कम ₹ 1,04,40,000/- एवढी मिळेल. हा पहिला मॅच्युरिटी लाभ असेल, इथून पुढे कोणताही प्रीमियम न भरता योजना सुरु राहील. या दरम्यान विमा संरक्षण तहयात मिळेल आणि वयाच्या शंभर व्या वर्षी दुसरा मॅच्युरिटी लाभ म्हणून विमा रक्कम 30,00,000 रुपये मिळतील. या योजनेची एकूण रक्कम ₹ 1,34,40,000 असेल. योजनेच्या संपूर्ण कालावधीमध्ये तीस लाख रुपयांचे विमा संरक्षण LIC कडून मिळत राहील.

LIC New Jeevan Anand Policy Details:
LIC New Jeevan Anand Policy Details:

जीवन आनंद योजनेचे अतिरिक्त लाभ

एलआयसी जीवन आनंद पॉलिसी मध्ये दोन वेळा मॅच्युरिटी लाभासोबतच आणखीन काही गोष्टी आहेत त्या म्हणजे, या योजनेअंतर्गत अपघाती संरक्षण पर्याय उपलब्ध आहे. योजना धारकाचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर अतिरिक्त विमा रक्कम दिली जाते. थोडा अधिक प्रीमियम भरून या योजनेअंतर्गत टर्म इन्शुरन्स चा लाभ घेऊ शकतो. योजनेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज मिळण्याची सोय आहे. काही कारणाने ही योजना बंद करायची असेल तर तीन वर्षानंतर सरेंडर पर्याय उपलब्ध आहे. पहिल्या मॅच्युरिटी नंतर काही कारणाने पॉलिसी सरेंडर करायची असेल तर, सरेंडर व्हॅल्यू प्रमाणे पैसे मिळू शकतात. ही पॉलिसी कोणत्याही बँकेला असाइन करून, बँकेकडून कर्ज मिळू शकते.

LIC New Jeevan Anand Policy Details योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://licindia.in/web/guest/products ला क्लीक करा

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us

Leave a Comment

12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur