NPS Vatsalya Pension Scheme: अल्पवयीन मुलांसाठी नवीन पेन्शन योजना, गुंतवणूक करावी का? जाणून घ्या, सर्व माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

NPS Vatsalya Pension Scheme: भारत सरकारने नुकतीच NPS वत्सल्या (National Pension System) ही अल्पवयीन मुलांसाठी खास तयार केलेली एक नवी पेन्शन योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलांना कमी वयातच बचत आणि गुंतवणुकीची शिस्त लागावी हा आहे.या योजनेअंतर्गत, पालक आपल्या मुलाच्या नावे प्रत्येक महिन्याला किमान ₹1,000 भरू शकतात.

या योजने गुंतवणुकीची मर्यादा नाही. ही खाती मुलांच्या नावाने उघडली जातात आणि त्यांच्या वयाच्या 18 वर्षांपर्यंत ती पालकांच्या नियंत्रणाखाली राहतात. मुलगा किंवा मुलगी वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर हे खाते नियमित NPS खात्यात किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेत रूपांतरित केले जाऊ शकते.

NPS वत्सल्या खाते उघडण्याची पात्रता

  • कोण पात्र आहे?
    सर्व भारतीय नागरिक, त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावे या योजनेत सामील होऊ शकतात, ज्यां मुलांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे.
  • खाते व्यवस्थापन:
    हे खाते अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडले जाते, परंतु मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाचे होईपर्यंत त्याचे व्यवस्थापन पालक किंवा पालक प्रतिनिधी करतात.
  • खाते कुठे उघडायचे?
    खाते PFRDA (Pension Fund Regulatory and Development Authority) नोंदणीकृत Points of Presence (PoPs) द्वारे उघडता येते. PoPs मध्ये प्रमुख सरकारी बँका, इंडिया पोस्ट, तसेच अधिकृत संस्थांचा समावेश आहे.

ऑनलाइन खाते उघडण्यासाठी: eNPS Trust च्या प्लॅटफॉर्मचा वापर करा.

NPS वत्सल्या खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. अल्पवयीन मुलाचे जन्म प्रमाणपत्र.
  2. पालक किंवा पालक प्रतिनिधीचा KYC दस्तऐवज.
  3. पालकाचा पॅन कार्ड.
  4. NRE/NRO बँक खाते (सोलो किंवा संयुक्त खाते).

NPS वत्सल्या योजनेचे फायदे

1. कमी वयात बचतीची सवय: मुलांमध्ये कमी वयातच गुंतवणूक आणि बचतीची सवय लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हि योजना सुरु आहे

2. नियमित गुंतवणूक: पालकांकडून नियमित योगदानाद्वारे आपल्या पाल्यासाठी दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती होण्यास मदत.

3. इक्विटी आणि डेट गुंतवणूक: NPS वत्सल्या योजनेअंतर्गत इक्विटी आणि डेट या दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.

4. कंपाउंड ग्रोथचा फायदा: लहान वयातच गुंतवणूक सुरू केल्यामुळे दीर्घकालीन कंपाउंडिंगद्वारे संपत्ती वाढवण्याची मोठी संधी.

5. करसवलत: NPS योजनेतील गुंतवणुकीवर आयकर कलम 80C आणि 80CCD (1B) अंतर्गत कर सवलत मिळते.

NPS Vatsalya Pension Scheme
NPS Vatsalya Pension Scheme

NPS वत्सल्या योजनेत गुंतवणूक का करावी?

1. निवृत्ती नियोजनात सुधारणा:
सध्याच्या काळात लोकांचे आयुर्मान वाढत चालले आहे. त्यामुळे, लहान वयातच निवृत्तीसाठी नियोजन सुरू केल्यास, भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी मोठा फायदा होतो.

2. बाजाराशी जोडलेले परतावे:
या योजनेत शेअर बाजाराशी जोडलेल्या इक्विटी आणि डेट गुंतवणुकीमुळे भविष्यात चांगले परतावे मिळण्याची संधी जास्त आहे.

3. करसवलतीचा लाभ:
या योजने अंतर्गत भरले जाणारे प्रीमियम साठी पालकांना नियमित बचतीसाठी कर सवलत मिळते, ज्यामुळे ही योजना अधिक फायदेशीर ठरते.

4. पालकांसाठी शिस्तबद्ध बचत:
पालकांना दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याची सवय लागते, ज्यामुळे मुलांच्या भविष्याची आर्थिक तयारी चांगली करता येते.

NPS वत्सल्या खाते उघडण्याच्या प्रक्रिया

ऑनलाइन प्रक्रिया (eNPS प्लॅटफॉर्मद्वारे):

  1. एनपीस ची अधिकृत वेबसाईट eNPS Trust ला भेट द्या.
  2. अल्पवयीन मुलांचे तपशील आणि पालकांचे KYC माहिती ऑनलाईन भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. पहिले इंस्टालमेंट भरा आणि खाते सुरू करा.

ऑफलाइन प्रक्रिया (PoPs द्वारे):

  1. आपल्या जवळच्या PoP केंद्रावर (जसे की सरकारी बँक किंवा इंडिया पोस्ट ऑफिस) भेट द्या.
  2. NPS वत्सल्या खाते उघडण्यासाठीचा अर्ज भरा.
  3. आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी सादर करा आणि नवीन खाते उघडा.

NPS वत्सल्या: अल्पवयीनांसाठी मोठा फायदा

NPS Vatsalya Pension Scheme, पेन्शन नियोजनाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण लवकर गुंतवणूक सुरू करणे हा आहे. NPS वत्सल्या ही योजना पालकांच्या मार्फत त्यांचा मुलगा किंवा मुलगी यांच्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी एक उत्कृष्ट नियोजन आहे.

संबंधित माहितीचे स्रोत: PFRDA अधिकृत वेबसाइट

निष्कर्ष: NPS Vatsalya Pension Scheme

NPS वत्सल्या योजना/ NPS Vatsalya Pension Scheme ही भारतातील भविष्यातील पेन्शन नियोजनासाठी, लहान वयातच सुरुवात करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आपल्या मुलांसाठी नियमित बचतीची सवय आणि शेअर बाजाराशी जोडलेले रिटर्न्स यामुळे NPS वत्सल्या योजना दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी एक चांगला पर्याय आहे.

आजच NPS वत्सल्या खात्यात (NPS Vatsalya Pension Scheme) गुंतवणूक करा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाऊल उचला!

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us