Red line on medicine strip: आपण अनेकदा मेडिकल स्टोअरवरून औषधं घेत असतो आणि त्या पॅकेटवर एक लाल रंगाची आडवी किंवा उभी पट्टी पाहत असतो. ही पट्टी केवळ पॅकेट्च्या डिजाईनसाठी नसते, तर ती एक महत्त्वाचा इशारा देत असते. म्हणजेच ही पट्टी त्या औषधाच्या गंभीरतेचं आणि जबाबदारीने वापर करण्याचा संकेत असतो.
लाल पट्टीचा खरा अर्थ काय असतो?
लाल पट्टी असलेली औषधं म्हणजे हे औषध स्ट्रॉंग आहे म्हणजेच प्रभावी औषधं आहे असे समजावे. मेडिकल स्टोअर मधून ही औषधं सरसकट कुणालाही देणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे ही औषधं फक्त नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच विकली जाऊ शकतात.
जर कोणी ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकत घेत असेल, तर ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात आणि त्या विक्रेतावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Antibiotic Resistance म्हणजे काय?
भारतात अनेक वेळा लोक स्वतःच डॉक्टर बनून मेडिकलमधून औषधं विकत घेतात, विशेषतः अँटीबायोटिक्स. हे पूर्ण चुकीचं आहे कारण अयोग्य औषधं घेतल्यामुळे शरीर त्यांच्याशी प्रतिकार करायला शिकतं. यामुळे पुढे जाऊन Drug Resistance म्हणजे औषधं शरीरावर काम न करणं, ही समस्या वाढते. त्यामुळे आजार बरा होण्यासाठी नवीन औषधं वापरावी लागतात आणि उपचार महाग होतात. हे टाळण्यासाठीच केंद्र सरकारने आणि औषध कंपन्यांनी काही विशिष्ट औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी लावण्याचे नियम बनवले आहेत.
लाल पट्टी कोणत्या औषधांवर असते?
लाल पट्टी ही प्रामुख्याने पुढील प्रकारच्या औषधांवर असते: Red line on medicine strip
- अँटीबायोटिक्स (जसे Amoxicillin, Azithromycin इ.)
- सशक्त Painkillers
- Hormonal Medicines
- Tuberculosis, HIV, Epilepsy यांसारख्या गंभीर आजारांची औषधं
- Psychiatric medicines (मानसिक आजारांवरील औषधं)
औषधांवरील Rx, NRx, XRx याचा अर्थ काय?
Rx – Take only with Doctor’s Prescription
ही औषधं फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची असतात. स्वतःहून घेणं धोकादायक असतं.
NRx – Special Restricted Drugs
ही औषधं लिहिण्याचा अधिकार विशेष प्रशिक्षित डॉक्टरांनाच असतो आणि हि अधिक सावधगिरीने वापरावी लागतात.
XRx – Extreme Caution Drugs
ही औषधं अत्यंत शक्तिशाली आणि गंभीर परिणाम करणारी असतात.फक्त डॉक्टरांच्या तपासणी आणि देखरेखीखालीच ती दिली जातात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं टाळावं?
तुमच्या शरीरात कोणतेही आजार असतील, तर डॉक्टर त्यांची योग्य तपासणी करून योग्य औषध लिहीत असतात. स्वतःच औषध घेतल्यास साइड इफेक्ट्स, ॲलर्जीज, आणि इतर आजार वाढू शकतात. त्यामुळे लाल पट्टी असलेली औषधं सावधगिरीने आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्या.

कायदा काय सांगतो?
भारत सरकारच्या “Drugs and Cosmetics Act, 1940” अंतर्गत लाल पट्टी असलेली औषधं फक्त वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनवरच विकावी लागतात. मेडिकल स्टोअरने ही औषधं कुणालाही थेट दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अनेक राज्य सरकारे आणि औषध नियंत्रक विभागांनी यावर कडक उपाययोजना केल्या आहेत.
भारतातील बहुतांश लोकांना अजूनही औषधांवरील कोड्स आणि पट्ट्यांबाबत माहिती नाही. त्यामुळे: लोक स्वतःच औषधं घेतात आणि आरोग्य बिघडवतात. अयोग्य औषधं घेऊन आजार अधिक गंभीर होतात. त्यामुळे सरकार आणि आरोग्य संस्था सार्वजनिक जनजागृती मोहीम राबवत आहेत.
Red line on medicine strip
लाल पट्टी असलेली औषधं म्हणजे केवळ औषध नव्हे, तर तो एक सावधतेचा आणि जबाबदारीचा संदेश आहे. आपण ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, कारण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. औषध वापरताना आरोग्य हीच प्राथमिक गरज ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जर तुम्हाला हा लेख उपयोगी वाटला असेल तर शेअर करा आणि इतरांनाही याबाबत माहिती द्या. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हा लेख खूप महत्त्वाचा आहे. आणखी अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आमचा ब्लॉग फॉलो करा आणि हेल्थ अपडेट्स मिळवत रहा!
Red line on medicine strip external links: MOHFW India Safe Use of Medicines.
Table of Contents