Kagadi Limbu Sheti: कमी खर्चात लाखों रुपये देणारी शेती; एक एकर कागदी लिंबू लागवडीचे संपूर्ण अर्थशास्त्र जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now

Kagadi Limbu Sheti: महाराष्ट्रातील शेतकरी आता पारंपरिक फलबाग शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. त्यामध्ये कागदी लिंबू (lemon) हे कमी खर्च, कमी पाण्याची गरज आणि वर्षभर बाजारपेठ असलेल्या मागणीमुळे अत्यंत फायदेशीर पीक मानले जाते. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कागदी लिंबू लागवड शेतकऱ्यांना दरवर्षी चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतो.

विशेषता: महाराष्ट्रातील उष्ण आणि कोरड्या हवामानात साई- सरबती आणि फुले- सरबती या जातींची लागवड अधिक यशस्वी ठरते. या जाती रोगप्रतिकरक असून वर्षभर फळ धारणा करण्याची क्षमता ठेवतात.

कागदी लिंबू लागवडीसाठी योग्य जमीन आणि हवामान

कागदी लिंबू पिकासाठी उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम काळी जमीन योग्य मानली जाते. जमिनीचा सामू (PH) 5.5 ते 7.5 दरम्यान असल्यास झाडांची वाढ चांगली होते.

या लागवडीसाठी जुलै ते सप्टेंबर हा पावसाळी कालावधी सर्वोत्तम मनाला जातो. एकूण झाडांमद्धे 6 x 6 मीटर अंतर ठेवल्यास प्रती एकर सुमारे 118 रोपे बसतात. हे अंतर झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरते.

एक एकर कागदी लिंबू लागवडीचा अंदाजित खर्च

कागदी लिंबू बाग उभारण्यासाठी सुरवतीच्या काळात काही खर्च करावा लागतो. खाली अंदाजित खर्च दिल आहे.

बाबअंदाजे खर्च (रुपये)
जमिनीची तयारी व आखणी8,000
खड्डे खोदनी व भरणे10,000
रोपे खरेदी7,000
रोप लागवड6,000
सेंद्रिय व रासायनिक खते15,000
पीक संरक्षण खर्च5,000
मंजूरी खर्च5,000
ठिबक सिंचन व्यवस्था28,000
पाच वर्षापर्यंत देखभाल30,000
एकूण खर्च 1,14,000

(वरील खर्च हा अंदाजित असून स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होऊ शकतो.)

Also Read:-  New Districts in Maharashtra: महाराष्ट्रात प्रस्तावित 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती? 26 जानेवारीला शासनाकडून घोषणा होणार; जाणून घ्या सर्व माहिती.

पाचव्या वर्षापासून सुरू होते भरघोस कमाई

कागदी लिंबू झाडे साधारणत: तिसऱ्या वर्षापासून उत्पादन देण्यास सुरुवात करतात. मात्र पाचव्या वर्षानंतर व्यावसायिक स्तरावर भरघोस उत्पादन मिळते.

प्रती एकर उत्पादनाचा अंदाज

  1. एकूण झाडे : 118
  2. प्रती झाड सरासरी उत्पादन : 40 किलो
  3. एकूण उत्पादन : 4,720 किलो

जर बाजारभाव ₹20 ते ₹40 किलो दरम्यान मिळाला तर:

किमान उत्पन्न : ₹94,400, कमाल उत्पन्न : ₹1,88,800

विशेष बाब म्हणजे उन्हाळा, सणासुदीचा काळ आणि लग्नसराईच्या हंगामात लिंबाला अधिक दर मिळत असल्यामुळे प्रत्यक्ष उत्पन्न यापेक्षा जास्त होऊ शकते.

ठिबक सिंचनामुळे वाढते उत्पादन

लिंबू पिकासाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त मानले जाते. यामुळे पाण्याची बचत होते, खते व्यवस्थापन सुलभ होते आणि झाडांची वाढ चांगली होते. यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजनाद्वारे ठिबक सिंचण करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते.

अंतरपीक घेऊन अतिरिक्त उत्पन्न वाढवा

कागदी लिंबू बागेच्या सुरुवातीच्या तीन ते चार वर्षात झाडांमद्धे मोकळी जागा उपलब्ध असते. या कालावधीत शेतकरी; डाळी, भाजीपाला किंवा कमी उंचीची नगदी पिके घेऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. त्यामुळे लिंबू पूर्ण उत्पादनक्षम होईपर्यंत आर्थिक भार कमी होण्यास मदत होते.

कागदी लिंबू लागवडसाठी उपलब्ध सरकारी अनुदान

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमद्धे कागदी लिंबू या फळपीकचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग उभारणीसाठी आर्थिक मदत दिली जाते.

प्रमुख योजना

  1. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: अंदाजित अनुदान ₹75,979 प्रती हेक्टर
  2. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA): अंदाजित अनुदान ₹ 74,575 प्रती हेक्टर
Also Read:-  PM Fasal Bima Yojana: भारत सरकारची 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; फसल बीमा योजना, खत अनुदान आणि बरेच काही.

(अनुदानाची रक्कम व अटी वेळोवेळी बदलू शकतात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित कृषि कार्यालय किंवा MahaDBT पोर्टलवर माहिती तपासणे आवश्यक आहे)

कागदी लिंबू शेती का ठरते फायदेशीर?

कागदी लिंबू शेती हि कमी खर्चात दीर्घकाळ स्थिर उत्पन्न देणारी फायदेशीर मानली जाते. लिंबाला वर्षभर घरगुती वापर, हॉटेल व्यवसाय, ज्यूस सेंटर आणि प्रक्रिया उद्योगांमद्धे सातत्याने मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते,

हे पीक तुलनेने कमी पाण्यात आणि कमी देखभाल खर्चात चांगले उत्पादन देत असल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरते. एकदा बाग उभी राहिल्यानंतर झाडे 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ उत्पादन देऊ शकतात, त्यामुळे दीर्घकालिन नफा मिळवण्याची संधी, यामुळे कागदी लिंबू शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.

Kagadi Limbu Sheti

योग्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन, संतुलित खत व्यवस्थापन आणि सरकारी योजनांची लाभ घेतल्यास कागदी लिंबू शेती शेतकऱ्यांसाठी उत्पन्नात लक्षणीय वाढ करू शकते. त्यामुळे कमी खर्चात अधिक नफा देणाऱ्या फळपिकांचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कागदी लिंबू हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Leave a Comment