Ration card correction online: रेशन कार्ड (शिधापत्रिका) हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्याचे साधन नसून एक महत्वाचे शासकीय ओळखपत्र आहे. अनेकदा रेशन कार्डवर नावाचे स्पेलिंग किंवा जन्मतारीख चुकलेली असते. किंवा नावामद्धे बदल झालेला असतो. अशा छोट्याश्या चुकीमुळे सरकारी योजनांचा लाभ घेताना नागरिकांना अडचणी येतात.
पूर्वी या दुरुस्तीसाठी शासकीय कार्यालयात उंबरठे झिजवावे लागायचे पण आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या काही मिनिटात घरबसल्या रेशन कार्ड मधील चुका दुरुस्त करू शकता. ही ऑनलाइन प्रक्रिया नेमकी काशी आहे, याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
रेशन कार्ड वरील माहिती अचूक असणे का गरजेचे आहे?
केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (ONORC) या मोहिमेनंतर रेशन कार्डचे महत्व अधिक वाढले आहे. कार्डावरील डेटा अचूक असल्यास तुम्हाला खालील फायदे मिळतात-
- सरकारी योजनांचा लाभ: आयुषमान भारत, उज्ज्वल योजना आणि अशा विविध शासकीय अनुदानासाठी अचूक रेशन कार्ड आवश्यक आहे.
- अधिकृत ओळख पुरावा: पासपोर्ट, डोमिसाईल किंवा इतर महत्वाची कागदपत्रे काढताना रेशन कार्ड वैध पुरावा म्हणून काम करते.
- अडथळामुक्त धान्य पुरवठा: नाव किंवा जन्मतारीख चुकीची असल्यास रेशन दुकानदाराकडून धान्य देण्यास नकार दिला जाऊ शकतो
- नवीन सदस्य नाव जोडणे: कुटुंबात लग्न होऊन आलेल्या महिलेचे किंवा लहान मुलाचे नाव जोडताना जुनी माहिती योग्य असणे गरजेचे आहे.
रेशन कार्ड ऑनलाइन दुरुस्ती
तुमच्या रेशन कार्डमधील नाव किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा. ration card correction online
- अधिकृत वेब पोर्टल भेट द्या : सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. ( महाराष्ट्रातील नागरिकांसाठी mahafood.gov.in हे अधिकृत पोर्टल आहे)
- दुरुस्तीचा पर्याय निवडा : वेबसाइटवर होमपेजवर तुम्हाला ‘Online Service’ किंवा ‘रेशन कार्ड दुरुस्ती’ (Correction/Modification) हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- OTP व्हेरीफीकेशन लॉगिन : तुमचा रेशन कार्ड क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP (One Time Password) टाकून सुरक्षित लॉगिन करा.
- माहितीमध्ये सुधारणा करा : लॉगिन झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी माहिती दिसेल. ज्या सदस्याच्या नावात किंवा जन्मतारीख मध्ये बदल करायचा आहे, तो पर्याय निवडून अचूक माहिती भरा. (तुम्ही भरणारी नवीन माहिती ही तुमच्या आधार कार्डवरील माहितीशी तंतोतंत जुळणारी असावी)
- आवश्यक कागदपत्रे आपलोड करा : बदलाच्या पुराव्यासाठी योग्य ती कागदपत्रे उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, रहिवासी दाखला इ. PDF किंवा Image स्वरूपात स्कॅन करून आपलोड करा.
- अर्ज सबमीट करा : सर्व माहिती पुनः एकदा काळजीपूर्वक तपासा आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा. अर्ज सबमीट झाल्यावर स्क्रीनवर एक Aplication Nomber येईल तो जपून ठेवा, ज्याद्वारे तुम्ही अर्जाची स्थिति ट्रॅक करू शकता
अर्ज केल्यानंतर काय होते?
तुम्ही अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी (Verification) करतात. Ration card correction online सर्व माहिती योग्य आढळल्यास काही दिवसातच रेशन कार्ड अपडेट केले जाते. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर तुम्ही याच पोर्टलवर तुमचे डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता.
Ration card correction online
रेशन कार्डवरील नाव, जन्मतारीख किंवा इतर माहिती चुकीची असल्यास ती शक्य तितक्या लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. आज उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सुविधामुळे ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि जलद झाली आहे. योग्य कागदपत्रांसह घरबसल्या अर्ज करून तुम्ही भविष्यातील अनेक शासकीय आणि कायदेशीर अडचणी टाळू शकता त्यामुळे एकदा आपल्या रेशन कार्डवरील सर्व नहिती तपासा आणि आवश्यक असल्यास त्वरित दुरुस्ती करा.
Table of Contents
