Maharashtra Land Revenue Code: शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती! शेताचा रस्ता अडवला तर कोणाकडे तक्रार करायची? जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Land Revenue Code: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता असणे ही अत्यंत महत्वाची गरज आहे. मात्र महाराष्टरतील अनेक गावांमध्ये शेत रस्त्यांवरून वाद निर्माण होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा, त्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला पारंपरिक रस्ता अडवला जातो, तर काही प्रकरणांमध्ये स्वत:च्या जमिनीतून रस्ता जाऊ नये म्हणून, जमीनमालक आक्षेप घेतात.

अशा परिस्थित नेमके कायदेशीर हक्क कोणते आहेत? रस्ता बंद झाल्यास कुठे तक्रार करायची? आणि कायद्यानुसार कोणते उपलब्ध पर्याय आहेत? याबाबतची माहिती प्रत्येक शेतकऱ्याला असणे आवश्यक असते.

शेतातील पारंपरिक रस्ता अडवला तर काय करावे?

महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांना वर्षभर शेतापर्यंत पोहोचता यावे यासाठी विविध शेत पाणंद रस्ता योजना सुरू केल्या आहेत. मात्र निधीची कमतरता, भूसंपादनातील अडचणी, प्रशासकीय विलंब आणि स्थानिक वादामुळे अनेक गावांमध्ये शेत रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

अनेकदा, एखादा शेतकरी किंवा जमीन मालक शेतात जाण्यासाठी वापरला जाणारा पारंपारिक किंवा अधिकृत रस्ता बंद करतो त्यामुळे इतर शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि वाद निर्माण होतात.

अशावेळी संबंधित शेतकरी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार दाखल करू शकतात. त्याबाबत तक्रारींची प्रशासनाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई सुद्धा केली जाते.

मामलेदार न्यायालय अधिनियम नियमातील तरतूद

जर पूर्वापर वापरात असलेला शेत रस्ता अचानक बंद करण्यात आला असेल किंवा नांगरून टाकण्यात आला असेल, तर मामलेदार न्यायालयाचे नियम 1906 कलम 5 अंतर्गत तहसीलदाराकडे साध्या अर्जात दाद मागता येते.

Maharashtra Land Revenue Code: यासाठी दोन महत्त्वाच्या अटी आहेत,

  1. संबंधित रस्ता पूर्वीपासून वापरात असणे आवश्यक आहे.
  2. रस्ता अडवल्यापासून सहा महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक असते.
Also Read:-  E-Shram Card Benefits: ई-श्रम कार्ड द्वारे तुमच्या भविष्याची सुरक्षा सुनिश्चित करा; आजच नोंदणी करा आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घ्या!

वेळेत अर्ज केल्यास प्रशासनाकडून सुनावणी घेऊन रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर काय

काही वेळा शेतात जाण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसतो अशा परिस्थितीत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 143 महत्त्वाची भूमिका बजावते.

या Maharashtra Land Revenue Code कलमानुसार संबंधित शेतकरी तहसीलदाराकडे अर्ज करून कायदेशीर क्षेत्राची मागणी करू शकतो. चौकशीनंतर शेजारील बांधावरून किंवा योग्य जागेतून अधिकृत मार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकते.

शेत रस्त्यासाठी निधी कुठून मिळतो

शेत रास्ते आणि पानंद रस्ते तयार करण्यासाठी विविध शासकीय योजनांमधून निधी उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये खालील योजनांचा समावेश होतो. Maharashtra Land Revenue Code

  1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)
  2. जिल्हा वार्षिक नियोजन
  3. कृषी विभागाच्या विविध योजना
  4. ग्रामपंचायत निधी
  5. स्थानिक विकास निधी

यांच्या माध्यमातून गावांमध्ये शेत रस्त्यांची कामे केली जाऊ शकतात.

स्वतःच्या जमिनीतून रस्ता जाऊ नये तर कायदेशीर पर्याय कोणते

अनेक वेळा, शेजारील शेतकरी स्वतःच्या सोयीसाठी दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीतून रस्ता काढण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी जमीन मालकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते. Maharashtra Land Revenue Code

  1. अधिकृत हद्द मोजणी करून घ्या: सर्वप्रथम भूमि अभिलेख विभागाकडून (ILR) अधिकृत मोजणी करून घ्यावी. यामुळे जमिनीची खरी हद्द स्पष्ट होते आणि अतिक्रमण झाले आहे की नाही हे सिद्ध करता येते.
  2. कायदेशीर नोटीस पाठवा: कोणी परवानगीशिवाय रस्ता काढण्याचा किंवा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्यास, वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून हरकत नोंदवता येते.
  3. तहसीलदाराकडे तक्रार करा: जर संबंधित शेतकऱ्याला पर्याय रस्ता उपलब्ध असेल तर त्याला दुसऱ्याच्या जमिनीतून नवीन रस्ता मागण्याचा अधिकार नसतो. अशा प्रकरणात तहसीलदाराकडे तक्रार दाखल करून आपले मत मांडता येते.
  4. दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा: जर बळजबरीने रस्ता काढण्याचा प्रयत्न होत असेल, तर दिवाणी न्यायालय मधून मनाई हुकूम (स्टे ऑर्डर) मिळवण्यासाठी दावा दाखल करता येतो.
Also Read:-  Land Record Maharashtra: महाराष्ट्रातील 'डिजिटल भूमी अभिलेख प्रणाली'ने केली क्रांती! जमिनीचे कागदपत्र आता फक्त एका क्लिकवर उपलब्ध

गाव नकाशात रस्ता असल्यास काय

गाव नकाशात पूर्वीपासून पानंद रस्ता दाखवलेला असल्यास तो सार्वजनिक हिताचा मार्ग मानला जाऊ शकतो. अशावेळी संबंधित प्रकरण शासनाच्या शेत पाणंद रस्ता योजनांतर्गत हाताळे जाऊ शकते. जमीन मालकांनी महसूल विभागाकडे आपली हरकत नोंदवून योग्य मार्ग निश्चित करण्याची मागणी करू शकतो.

Maharashtra Land Revenue Code

शेत रस्त्यावरील वाद हे ग्रामीण भागातील सर्वसाधारण पण संवेदनशील प्रश्न आहेत रस्ता अडवणे किंवा बळजबरीन रस्ता काढणे या दोन्ही बाबीं कायद्याच्या चौकटीत सोडवणे आवश्यक आहे त्यामुळे वाद वाढवण्याऐवजी तहसीलदार महसूल विभाग न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेतल्यास शेतकरी आपले हक्क कायदेशीर मार्गाने सुरक्षित करू शकतात


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading