PM Kisan 23th Installment date: पीएम किसानचा 23 वा हप्ता निश्चित! सरकारने तारीख केली जाहीर, जाणून घ्या; ₹2,000 कोणाला मिळणार?

WhatsApp Group Join Now

PM Kisan 23th Installment date: देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेचा 23 व हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील हूगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून हा हप्ता लाईव्ह वितरित करण्यात येणार आहे.

या वेळी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये थेट जमा केले जाणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने (DBT) आधार संलग्न बँकेत जमा होईल.

23 वा हप्ता कधी मिळणार

केंद्र सरकारने 20 जून 2026 हा दिवस, संपूर्ण देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने विविध जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

PM Kisan 23th Installment date या दिवशी पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यात 2,000 रुपयांची थेट रक्कम जमा होईल. या घोषणेमुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पी एम किसान योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) ही केंद्र सरकारची एक महत्वकांक्षी कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश पात्र शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या शेती व घरगुती खर्चाला हातभार लावणे हा आहे.

या योजनेचे प्रमुख फायदे : PM Kisan 23th Installment date

  • वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत
  • तीन समान हफ्त्यांमध्ये रक्कम वितरित
  • दर चार महिन्याने 2,000 रुपयांचा हप्ता रक्कम थेट बँक खात्यात जमा
  • कोणत्याही मध्यस्थाची ची गरज नाही

आज ही योजना देशातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण DBT योजना पैकी एक मानले जाते.

Also Read:-  PM kisan samman nidhi beneficiary list: पीएम किसान फंड स्टेटस कसा तपासायचा? ₹2000 चा हप्ता मिळणार की नाही? अशी तपास लिस्ट.

आतापर्यंत 22 हप्ते वितरित

योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत दिली जात आहे. 20 जून रोजी वितरित होणारा हप्ता हा, या योजनेचा 23 वा हप्ता असेल. याआधी लाभार्थी शेतकऱ्यांना 22 हप्त्यांचा लाभ मिळाला असून, ही योजना कृषी क्षेत्रातील सर्वात सातत्यपूर्ण कल्याणकारी योजना पैकी एक ठरली आहे.

23 व हप्ता मिळवण्यासाठी या तीन गोष्टी अनिवार्य?

केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी बंधनकारक केल्या आहेत. खालील तीन बाबी पूर्ण न केल्यास हप्ता अडकू शकतो. PM Kisan 23th Installment date

  1. Ekyc पूर्ण असणे आवश्यक: पी एम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. E kyc अपूर्ण असल्यास खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
  2. DBT प्रणालीचे महत्त्व: पीएम किसान योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणाली वर आधारित आहे, त्यामुळे सरकारी मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत अधिक वेगाने पोहोचत आहे.
  3. जमीन नोंदी अद्यायावत असावेत: लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनीचे नोंदी आद्ययावत आणि सत्यापित असणे आवश्यक आहे. भूमी अभिलेख पडताळणी पूर्ण नसल्यास हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
  4. फार्मर आयडीही आवश्यक: केंद्र सरकारने आता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी फार्मर आयडी (FARMER ID) असणे आवश्यक केले आहे, त्यामुळे ज्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर तयार करून घ्यावा.

महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार?

राज्यातील सुमारे 90.85 लाख पात्र शेतकरी कुटुंबाने आवश्यक अटी पूर्ण केल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यात 20 जून 2026 रोजी सुमारे 1,817 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे.

Also Read:-  8th Pay Commission Salary Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर माहिती.

पीएम किसान लाभार्थी यादी आणि स्टेटस कसे तपासल

शेतकरी पीएम किसान च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्याला लाभार्थी स्टेटस तपासू शकता. PM Kisan 23th Installment date

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://pmkisan.gov.in/
  • “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक किंवा आवश्यक माहिती भरा.
  • ओटीपी पडताळणी पूर्ण करा.
  • हप्त्याची व लाभार्थी स्थिती स्क्रीनवर पाहा.

थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल

20 जून रोजी होणाऱ्या करणाऱ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्र सरकारच्या विविध अधिकृत वेबकास्ट लिंक वर उपलब्ध असेल. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, FPO, FPC, PACS ग्रामपंचायत कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रावर ही हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

PM Kisan 23th Installment date

पी एम किसान योजनेचा 23 व हप्ता 20 जून 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र हप्ता मिळण्यासाठी ई केवायसी आधार लिंक बँक खाते आणि जमीन नोंदी यावत असणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत सर्व माहिती तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून दोन हजार रुपयांचा पत्ता कोणते अडचणी शिवाय मिळू शकेल.