Change in Ration Card: रेशन कार्ड यादीतून नाव हटवले असल्यास काय करावे? पुनः नावे जोडायची कशी, वाचा संपूर्ण प्रक्रिया.

WhatsApp Group Join Now

Change in Ration Card: रेशन कार्ड हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठी चे सरकारी कागदपत्र नसून, अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र सुद्धा आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत (NFSC) पात्र लाभार्थ्यांना कमी दरात किंवा मोफत धान्य पुरवले जाते. मात्र अलीकडच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून रेशन कार्ड यादीचे नियमित पडताळणी अभियान राबवले जात असल्याने, अनेक नागरिकांची नावे या यादीतून उघडले जात आहेत.

जर तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव रेशन कार्ड यादीतून हटवले गेले असेल, तर घाबरण्याची गरज नाही. योग्य प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुन्हा नाव समाविष्ट करू शकता. यासाठी कोणती कारणे असतात कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेऊया.

रेशन कार्ड यादीतून नाव का वगळले जाते?

रेशन कार्ड यादी मध्ये फेरफार करताना करताना अनेक वेळा पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत खालील कारणामुळे नावे व वगळली जाऊ शकतात.

ASDD पडताळणीमुळे नाव वगळणे

ASDD म्हणजे Absent, shifted, dead, duplicate.

  1. Absent (गैरहजर): सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रेशन न घेतल्या
  2. Shifted (स्थलांतरित): कायमस्वरूपी दुसऱ्या गावात केव्हा शहरात स्थलांतर केल्यास
  3. Dead (मृत): लाभार्थी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास
  4. Duplicate (डुप्लिकेट): एकाच व्यक्तीचे दोन किंवा अधिक रेशन कार्ड मध्ये नाव आढळल्यास
हा लेख वाचा-  7kw Solar Panel System: सोलर पॅनेल बसवा, विजेच्या खर्चातून दिलासा मिळवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

अपात्र लाभार्थी ठरणे

सरकारच्या नियमानुसार काही ठराविक नागरिक रेशन योजनेसाठी अपात्र ठरतात.

  • आयकर भरणारे व्यक्ती
  • व्यवसायिक करदाते
  • काही निकषानुसार चार चाकी वाहन मालक
  • आर्थिक दृष्ट्या सक्षम कुटुंबे

अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीची नावे रेशन कार्ड लिस्ट मधून वगळले जाऊ शकते

ई–केवायसी न केल्यामुळे

सदर रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक लाभार्थ्यांची नावे केवळ ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे तात्पुरती निष्क्रिय (Inactive) करण्यात आले आहेत.

ई-केवायसी कशी पूर्ण करावी?

जर तुमचे नाव ई-केवायसी न केल्यामुळे वगळले गेले असेल तर खालील प्रक्रिया पूर्ण करा. Change in Ration Card

  • कुटुंबातील सर्वत्र सदस्यांसह जवळील रेशन दुकानात (FPS) भेट द्या.
  • आधार कार्ड सोबत घेऊन जा.
  • ई-पॉज (e-pos) मशीन वर बायोमेट्रिक पडताळणी करा.
  • सर्व सदस्यांचे अंगठ्यांचे ठसे नोंदवल्या नंतर ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे नाव पुन्हा सक्रिय होऊ शकते.

रेशन कार्ड मध्ये पुन्हा नाव कसे जोडावे

जर तुमचे नाव कायमस्वरूपी वगळले गेले असेल तर तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल. Change in Ration Card

पहिली पायरी: नावाची स्थिती तपासा, सर्वप्रथम ऑनलाइन रेशन कार्ड यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही याची खात्री करा.

दुसरी पायरी: अर्ज भरा, तुमचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक पर्याय वापरू शकता

  1. महाफुड पोर्टलवर ऑनलाइन अर्ज
  2. तहसील कार्यालय
  3. जिल्हा पुरवठा कार्यालय
  4. रेशनिंग कार्यालय
हा लेख वाचा-  Jamin Hissa Khate Fod: वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करायची आहे? खातेफोड करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा! जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम!

“युनिट वाढवणे” किंवा “नाव समाविष्ट करणे” या प्रकारचा अर्ज भरावा.

तिसरी पायरी: आवश्यक कागदपत्रे जमा करा, अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी

  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • रेशन कार्ड ची प्रत
  • जन्म प्रमाणपत्र (लहान मुलांसाठी)
  • नाव वगळण्याची कारणे स्पष्ट करणारे कागदपत्रे
  • स्थलांतरित असल्यास संबंधित पुरावे

चौथी पायरी: अर्जाची पडताळणी, अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मात्र लाभार्थ्यांचे नाव पुन्हा रेशन कार्ड मध्ये समाविष्ट केले जाते.

रेशन कार्ड यादीमध्ये नाव ऑनलाईन कसे तपासावे?

घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड यादी तपासा

प्रक्रिया: Change in Ration Card

1. NFSA पोर्टलला भेट द्या
केंद्र सरकारच्या अधिकृत NFSA पोर्टलवर जा.

2. Ration Cards पर्याय निवडा
मुख्य पानावरील “Ration Cards” पर्यायावर क्लिक करा.

3. State Portal निवडा
“Ration Card Details on State Portals” या पर्यायावर क्लिक करा.

4. महाराष्ट्र राज्य निवडा
राज्यांच्या यादीतून महाराष्ट्र निवडा.

5. जिल्हा व तालुका निवडा
तुमचा जिल्हा, तालुका आणि संबंधित रेशन दुकान निवडा.

6. लाभार्थी यादी तपासा
तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे तपासा.

जर नावासमोर “Inactive” असा उल्लेख दिसत असेल किंवा नाव यादीत दिसत नसेल, तर तुमचे नाव वगळले गेले असल्याची शक्यता आहे.

हा लेख वाचा-  PM Kisan Maandhan Yojana: आता साठ वर्षांनंतर मिळणार दरमहा ₹3 हजार पेन्शन, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.

नाव वगळले असल्यास कुठे तक्रार करावी?

जर तुमचे नाव चुकीने वगळले गेले असेल तर तुम्ही खालील कार्यालयांमध्ये तक्रार नोंदवू शकता. Change in Ration Card

  • तहसीलदार कार्यालय
  • जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय
  • रेशनिंग कार्यालय
  • महाफूड हेल्पलाइन
  • ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल

Change in Ration Card

रेशन कार्ड यादीतून नावं गळले जाणे हे गंभीर बाब असली, तरी योग्य कागदपत्रे आणि निर्धारित प्रक्रिया पूर्ण केल्यास नाव पुन्हा समाविष्ट करता येते. सर्वप्रथम तुमचे नाव ऑनलाईन तपासा, ही केवायसी पूर्ण करा आणि आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयात अर्ज करा. वेळेत कारवाई केल्यास मोफत धान्य, तसेच इतर इतर गोष्टींची लाभ लगेच सुरू होतो.