Kanyadan LIC policy details in marathi: जाणून घ्या हि खास योजना तुमच्या कन्येचे आयुष्य कसे बदलू शकते? ₹5,206 भरून कसा होतो ₹26 लाखांचा फायदा?

WhatsApp Group Join Now

Kanyadan LIC policy details in marathi: आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा याचसाठी झटत असतो आणि तशी अपेक्षा सुद्धा ठेवतो. मुलीच्या शिक्षणाची गुणवत्ता, तिचे करिअर आणि विवाहासाठीची तयारी या सर्वांचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी अगोदर पासूनच काही फायनान्शियल प्लॅनिंग करणे महत्वाचे आहे.

अशा वेळी LIC ची कन्यादान योजना ही एक आदर्श आर्थिक साधन ठरत आहे. ही योजना फक्त विमा सुरक्षा पुरवत नाही, तर भविष्यातील मोठ्या खर्चासाठी आर्थिक पाठबळही देते. ही योजना तुम्हाला तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची खात्री देते.

एल आय सी ची ‘कन्यादान योजना’ आपल्या मुलांच्या भविष्यातील निर्माण होणार्‍या विविध गरजांसाठी खूपच फायदेशीर आहे, विशेषतः आपल्या मुलीचे शिक्षण, करीअर आणि लग्न इ. साठी. या लेखामध्ये एल आय सी कन्यादान योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.

LIC कन्यादान योजना म्हणजे काय?

एलआयसी कन्यादान योजना ही पालकांसाठी खास डिझाइन केलेली एक आर्थिक सुरक्षा योजना आहे. ही योजना नॉन-लिंक्ड आणि सहभागी प्रकारातील आहे, म्हणजेच शेअर बाजाराशी संलग्न नसलेली आणि एलआयसीच्या नफ्यावर आधारित बोनस देणारी योजना आहे. पालक स्वतःच्या नावावर ही पॉलिसी घेतात, परंतु या योजनेचा अंतिम लाभ त्यांच्या मुलीला मिळतो.

योजनेद्वारे पालक आपली मुलगी मोठी होईपर्यंत तिच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची शाश्वती तयार करू शकतात. विशेष बाब म्हणजे पालकांच्या अनुपस्थितीतसुद्धा ही योजना चालू राहते आणि मुलीचे स्वप्न अपूर्ण राहत नाही.

Kanyadan LIC policy details in marathi
Kanyadan LIC policy details in marathi

LIC कन्यादान योजना कोण घेऊ शकतो?

ही योजना घेण्यासाठी LIC ने काही आवश्यक अटी ठरवल्या आहेत. या अटी अत्यंत सोप्या आणि पालकांच्या हिताच्या आहेत. Kanyadan LIC policy details in marathi

  • पालकांचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 50 वर्षांपर्यंत असावे.
  • लाभार्थी म्हणजे मुलीचे वय 0 पासून ते 12 वर्षांपर्यंत असावे.
  • ही योजना आई किंवा वडील दोघेही घेऊ शकतात.
  • योजनेची मुदत 13 वर्षांपासून 25 वर्षांपर्यंत कोणतीही निवडू शकता.

ही अटी लक्षात घेता, आपण आपल्या मुलीच्या बालपणीच ही योजना सुरू करून तिच्या भावी गरजांसाठी एक पक्कं आर्थिक बळ निर्माण करू शकतो.

Also Read:-  Maharashtra Weather: महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला; हवामान विभागाकडून 24 तासांचा धोक्याचा इशारा

प्रीमियम भरण्याच्या सुविधा

कन्यादान योजना ही 13 वर्षापासून ते 25 वर्ष कालावधीपैकी कोणतीही एक मुदत निवडता येईल. प्रीमियम भरण्याची प्रक्रिया अतिशय लवचिक आणि सुलभ आहे. एलआयसी आपल्या गरजेनुसार विविध पर्याय देते: Kanyadan LIC policy details in marathi

मासिक (Monthly) तिमाही (Quarterly) सहामाही (Half-Yearly) वार्षिक (Yearly), मासिक पद्धतीने प्रीमियम भरायचा असल्यास, तुमच्या बँक खात्यातून ही रक्कम दर महिन्याला ऑटो डेबिट होईल. त्यामुळे वेळोवेळी प्रीमियम भरायचे विसरणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे कोणतीही कागदपत्रांची झंझट राहत नाही.

योजना कालावधी व परतावा कसा मिळतो?

उदाहरणार्थ, जर 30 वर्षांचे पालक, आई किंवा वडील, आपल्या मुलींसाठी नॉमिनेशन करून 21 वर्षांची योजना घेतात आणि दर महिन्याला ₹5206/– प्रीमियम भरतात, तर त्यांना फक्त 18 वर्षे ₹11.24,496/ प्रीमियम भरावा लागतो. उरलेल्या 3 वर्षांत कोणताही प्रीमियम भरावे लागत नाही.

21 वर्षानंतर, पॉलिसी मॅच्युअर होते आणि पालकांना किंवा मुलीला ₹26,00,000/- ची एकूण रक्कम मिळते. या रकमेचा वापर शिक्षण, विवाह, किंवा स्टार्टअपसारख्या गरजांसाठी केला जाऊ शकतो. ही योजना केवळ एक विमा नाही, तर एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे.

LIC कन्यादान योजनेचे आकर्षक फायदे

  1. पालकांचे अचानक निधन झाल्यास संरक्षण: योजना कालावधीमध्ये पालकांचे कोणत्याही कारणाने अचानक निधन झाल्यास, उर्वरित प्रीमियम LIC स्वतः भरते आणि योजना चालू ठेवते. त्यामुळे मुलीच्या भविष्यात कोणताही अडथळा येत नाही.
  2. मृत्यू लाभ (Death Benefit): कोणत्याही कारणाने पालकांचे निधन झाल्यास त्वरित ₹13 लाखांचा लाभ देण्यात येतो. हा निधी मुलीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
  3. दरवर्षी मिळणारा निधी: पालकांच्या निधनानंतर, मुलीला दरवर्षी ₹1,30,000/- मिळत राहतात, जोपर्यंत योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत, यामुळे तिच्या शिक्षणाचा खर्च सुरळीत होतो.
  4. मॅच्युरिटी लाभ: योजना पूर्ण झाल्यानंतर, एकूण ₹26,85,800/- चा निधी लाभार्थ्याला मिळतो. ही रक्कम तिच्या भविष्यातील महत्वाच्या टप्प्यांवर वापरता येते.
  5. कर सवलत: या योजनेवर आयकर कायद्यानुसार (धारा 80C अंतर्गत) कर सवलत मिळते.
  6. बोनस आणि फायनल अ‍ॅडिशनल बोनस: एलआयसी आपल्या नफ्यावर आधारित बोनस देत असल्यामुळे या योजनेत वेळोवेळी बोनसही मिळतो.
Kanyadan LIC policy details in marathi
Kanyadan LIC policy details in marathi

कन्यादान योजनेबद्दल अतिरिक्त माहिती

कर्ज: काही ठराविक अटींवर योजना सुरु केल्यापासून दोन वर्षानंतर कर्ज मिळण्याची सोया उपलब्ध आहे.

Also Read:-  LPG Price Update: एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी होण्याची शक्यता? जाणून घ्या एलपीजी दरवाढीचे अपडेट!

सरेंडर व्हॅल्यू: जर तुम्ही एलआयसीची कन्यादान योजना काही कारणास्तव चालू ठेवू शकत नसाल, तर तुम्ही सलग दोन वर्षाचा किमान प्रीमियम भरला असेल तरच तुम्ही ही योजना कधीही बंद करू शकता.

फ्री लुक पिरियड: एलआयसीची कन्यादान योजना मधील अटी आणि शर्ती तुम्हाला मान्य नसतील तर पॉलिसी बॉन्ड मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत तुम्ही ही योजना परत करू शकता आणि तुम्हाला तुमचे भरलेले पैसे परत मिळतील

वाढीव कालावधी: वार्षिक किंवा सहामाही किंवा तिमाही अशा पद्धतीने प्रिमियम भरण्यासाठी वाढीव कालावधी 30 दिवसांचा असतो. पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून मासिक प्रीमियम साठी पंधरा दिवसांचा वाढीव कालावधी असतो.

कन्यादान योजना कशी पुनर्जीवित करावी?: तुम्ही वाढीव कालावधीत प्रीमियम भरण्यास सक्षम नसल्यास पुढील योजना समाप्त केली जाईल. परंतु ही लॅप्स योजना पहिल्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून आणि मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी सलग पाच वर्षाच्या कालावधीत पुनर्जीवित केली जाऊ शकते.

Kanyadan LIC policy details in marathi

LIC कन्यादान योजना ही आपल्या मुलीच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करणारी एक सशक्त योजना आहे. यामध्ये विमा संरक्षणासोबतच एकत्रित बचतीचा लाभ मिळतो, जे पालकांच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. ही योजना केवळ आर्थिक पाठबळ पुरवत नाही, तर पालकांच्या अनुपस्थितीतही आपल्या मुलीच्या शिक्षण, करिअर आणि लग्नाचा मार्ग सुकर करते.

तुमच्या मुलीच्या सुखी आणि सुरक्षित भविष्यासाठी आजच LIC कडे जाऊन कन्यादान योजना घ्या. ही योजना तुमची जबाबदारी निभावण्याचा एक विश्वासार्ह मार्ग आहे. आजची छोटी गुंतवणूक, उद्याच्या मोठ्या स्वप्नांना आधार ठरू शकते. अशी ही कन्यादान योजना आपल्या मुलांसाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच आपल्या स्वतःसाठी तितकीच फायदशीर आहे.

Kanyadan LIC policy details in marathi : https://licindia.in