तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवा: एलआयसी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजनेचे फायदे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

LIC Jeevan Amar Term Insurance Plan: भारतीय विमा बाजारात अनेक दशकापासून एलआयसी (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) LIC हे नाव विश्वास, विश्वासार्हता आणि आर्थिक सुरक्षेशी जोडले गेले आहे. त्यांच्याच अनेक उत्कृष्ट विमा योजनांपैकी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजना सुरु आहे, जी ग्राहकांमध्ये लोकप्रिय टर्म प्लॅन योजनापैकी एक आहे.

हि एक प्युअर टर्म संरक्षण योजना म्हणून खास डिझाइन केली गेली आहे, जी कमी प्रीमियमवर मोठे लाइफ कव्हर प्रदान करते, ज्यामुळे योजनाधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेची खात्री होण्यासाठी एक योग्य पर्याय होतो. या संपूर्ण लेखामध्ये, या प्लॅनची वैशिष्ट्ये, फायदे, पात्रता निकष इत्यादी आवश्यक गोष्टींची माहिती दिली आहे, जेणेकरून तुम्ही या योजने संदर्भात योग्य निर्णय घेऊ शकाल. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.

LIC Jeevan Amar Term Insurance Plan
LIC Jeevan Amar Term Insurance Plan

LIC Jeevan Amar Term Insurance Plan योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

कव्हरेज पर्याय:

  • लेव्हल विमा रक्कम: या पर्यायामध्ये योजना कालावधी दरम्यान नॉमिनीला डेथ क्लेम म्हणून दिली जाणारी विमा रक्कम फिक्स असते.
  • इन्क्रिझिंग विमा रक्कम: या पर्यायामध्ये प्रीमियम न वाढवता निश्चित 10 टक्के वार्षिक दराने विमा रक्कम संरक्षण वाढत जाते, विमा संरक्षण प्रत्येक वर्षी वाढते.

प्रीमियम भरणे :

  • रेग्युलर प्रीमियम: या पर्यायामध्ये, घेतलेल्या योजना कालावधी पर्यंत प्रीमियम भरने आवश्यक आहे. उदा योजनेची 30 वर्षे मुदत घेतली असेल तर 30 वर्षे प्रीमियम भरणे आवश्यक आहे.
  • लिमिटेड प्रीमियम: या पर्यायामध्ये, घेतलेल्या योजना कालावधी मध्ये काही ठराविक वर्षासाठी प्रीमियम भरणे आवश्यक असते उदा. 5, 10, 15 वर्षे पण लाइफ कव्हरेज संपूर्ण योजना कालावधीसाठी दिले जाते. उदा योजनेची 30 वर्षे मुदत घेतली असेल तर प्रीमियम भरण्यासाठी 5, 10, 15 वर्षे मुदत घेता येते.

उच्च सम एश्योर्डसाठी सवलती:

  • LIC Jeevan Amar Term Insurance Plan हाय सम एश्योर्डसाठी (विमा संरक्षण) योजनाधारकांसाठी प्रीमियममध्ये सावलत दिली जाते, ज्यामुळे मोठ्या लाइफ कव्हरेजसाठी ही योजना अधिक योग्य बनते.

मृत्यू लाभ पर्याय:

  • सिंगल अमाऊंट डेथ क्लेम : या पर्यायामध्ये नॉमिनीला एकाच वेळी संपूर्ण विमा रक्कम दिली जाते.
  • इंस्टालमेंट अमाऊंट डेथ क्लेम: या पर्यायामध्ये विमा रक्कम (डेथ बेनिफिट) नॉमिनीला 5, 10 किंवा 15 वर्षां पर्यंत हप्त्यांमध्ये, टप्प्या टप्प्याने घेण्याचा पर्याय दिला जातो.

मॅच्युरिटी बेनिफिट:

  • हा LIC Jeevan Amar Term Insurance Plan प्युअर टर्म प्लॅन असल्यामुळे, या योजनेमध्ये कोणताही मॅच्युरिटी लाभ दिला जात नाही, हि योजना फक्त लाइफ कव्हर साठी डिजाइन केली आहे.

रायडर्स:

  • LIC Jeevan Amar Term Insurance Plan या योजनेमध्ये ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर उपलब्ध आहे.

कर फायदे:

  • कलम 80C: योजनेमध्ये भरले जाणारे प्रीमियम, कर कपातीसाठी पात्र आहेत.
  • कलम 10(10D): नॉमिनीला मिळणार मृत्यू लाभ करमुक्त आहे.

रिव्हायवल:

  • कोणत्याही कारणाने प्रीमियम भरण्यास उशीर झाला तर ड्यू डेट पासून एकूण 60 दिवसामध्ये हि योजना पुन्हा चालू करु शकता, अन्यथा हि योजना बंद होईल.

कर्ज:

  • या योजनेमध्ये कर्ज सोय उपलब्ध नाही
LIC Jeevan Amar Term Insurance Plan
LIC Jeevan Amar Term Insurance Plan

पात्रता निकष

  • किमान प्रवेश वय: 18 वर्षे
  • कमाल प्रवेश वय: 65 वर्षे
  • किमान पॉलिसी मुदत: 10 वर्षे
  • कमाल पॉलिसी मुदत: 40 वर्षे
  • किमान विमा रक्कम: ₹25 लाख
  • कमाल विमा रक्कम: कोणतीही मर्यादा नाही (अंडररायटिंगच्या अधीन)

एलआयसी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजनेचे फायदे

हि LIC Jeevan Amar Term Insurance Plan योजना कमी प्रीमियमवर मोठे लाइफ कव्हरेज प्रदान करते, देशातील विविध उत्पन्न स्तरातील लोकांसाठी, ज्यांना कमी प्रीमियम मध्ये जास्तीचे रिस्क कव्हर हवे आहे, अशा सर्व ग्राहकांसाठी हि योजना खूपच चांगली आहे. लेव्हल विमा रक्कम आणि प्रत्येक वर्षी विमा संरक्षण वाढणारी विमा रक्कम या दोन पैकी एक निवडण्याचा पर्याय सुनिश्चित करतो की, तुमचे लाइफ कव्हरेज आणि तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या वाढत असताना, या दोन्ही गोष्टि जुळवून घेतल्या जातील.

या योजनेमध्ये विमा धारकाच्या अनुपस्थितीत त्याच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होते. पर्यायी रायडर्ससह, विमाधारकाचे अपघात आणि नैसर्गिक मृत्यू यांचे कव्हरेज निश्चिती होते. हा प्युअर टर्म प्लॅन असल्यामुळे, या योजनेमध्ये कोणताही मॅच्युरिटी लाभ दिला जात नाही, हि योजना फक्त लाइफ कव्हर साठी डिजाइन केली आहे.

उदाहरण

नाव: रोहन
वय: 30 वर्षे
पॉलिसी मुदत: 30 वर्षे
विमा रक्कम: ₹1 कोटी
प्रीमियम मोड: नियमित प्रीमियम
कव्हरेज पर्याय: लेव्हल सम एश्योर्ड

रोहन, एक 30 वर्षीय व्यावसायिक आहे, त्यांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी मोठ्या कव्हरेजची LIC Jeevan Amar Term Insurance Plan योजना घेतली आहे. त्यांनी हि योजना 30 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसह ₹1 कोटीच्या विमा रक्कमसह निवडली आहे. नियमित प्रीमियम पेमेंट, म्हणजे प्रत्येक वर्षी, वार्षिक प्रीमियम मोड निवडून, रोहन ₹27,317 वार्षिक प्रीमियम एकूण 30 वर्ष भरणार आहेत, तर या उदाहरणामध्ये पुढील पद्धतीने विमा संरक्षण असेल.

एकूण 30 वर्षे पॉलिसी कालावधी दरम्यान, रोहनचा कोणत्याही नैसर्गिक कारणाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीस ₹1 कोटी सिंगल रक्कम, डेथ क्लेम LIC कडून दिले जातील, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाची जीवनशैली कायम ठेवण्यासाठी ते सक्षम होतील.

LIC Jeevan Amar Term Insurance Plan या बरोबर त्यांनी ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर घेतला असेल आणि त्यांचा मृत्य कोणत्याही अपघाती कारणाने झाल्यास त्यांच्या नॉमिनीला विमा रकमेच्या दुप्पट रक्कम म्हणजे ₹2 कोटी सिंगल रक्कम, डेथ क्लेम LIC कडून दिले जातील.

जर रोहनने वाढणारी विमा रक्कम पर्यायाची निवड केली तर, लाइफ कव्हरेज रक्कम, योजना सुरूकेल्यापासून सहा वर्षे पूर्ण झाल्यावरती, प्रत्येक वर्षी 10% विमा रक्कम वाढत जाते आणि हि वाढ रक्कम योजना सुरु केल्यापासून 15 वर्षे पूर्ण झाल्यावरती त्याच वाढलेल्या विमा रकमेच्या ठिकाणी थांबते. (अधिक माहितीसाठी तुमच्या LIC विमा प्रतिनिधीशी चर्चा करा)

एलआयसी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजना कशी खरेदी करावी

हि योजना सुरु करण्यासाठी, तुमच्या विमा प्रतिनिधींशी या योजने बाबत सविस्तर चर्चा करा, प्लॅन समजावून घ्या, तुमची लाइफ कव्हर ची गरज लक्षात घेऊन टर्म इन्शुरन्स रक्कम ठरावा. विमा प्रतिनिधी तुम्हाला अर्ज प्रक्रिया समजावून सांगतील आणि तुमच्या गरजेनुसार योग्य कव्हरेज पर्याय निवडण्यास मदत करतील. यासाठी आजचा हि LIC Jeevan Amar Term Insurance Plan योजना सुरु करा.

विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्र.1: एलआयसी जीवन अमर योजनेत किमान सम एश्योर्ड किती आहे?
उ: किमान सम एश्योर्ड ₹25 लाख आहे.

प्र.2: मी माझ्या एलआयसी जीवन अमर पॉलिसीमध्ये रायडर्स जोडू शकतो का?
उ:
होय, तुम्ही तुमचे कव्हरेज अपघाती मृत्यू लाभ रायडर सारख्या पर्यायी रायडर जोडून वाढवू शकता.

प्र.3: पॉलिसी कालावधी दरम्यान प्रीमियम रक्कम निश्चित असते का?
उ: होय, प्रीमियम रक्कम निश्चित राहते, जोपर्यंत तुम्ही वाढणारी सम एश्योर्ड पर्याय निवडत नाही, जिथे कव्हरेज वाढते परंतु प्रीमियम समान राहतो.

प्र.4: या योजने अंतर्गत कोणते कर फायदे उपलब्ध आहेत?
उ: दिलेले प्रीमियम कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत आणि मृत्यू लाभ कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहेत.

प्र.5: वाढणारी सम एश्योर्ड (विमारक्कम) पर्याय कसा काम करतो?
उ:
सम एश्योर्ड (विमारक्कम) सहा वर्षे पूर्ण झाल्यावरती निश्चित 10% वार्षिक टक्केवारीने वाढते.

LIC Jeevan Amar Term Insurance Plan
LIC Jeevan Amar Term Insurance Plan

निष्कर्ष

एलआयसी जीवन अमर टर्म इन्शुरन्स योजना एक उत्कृष्ट पर्याय आहे ज्यामध्ये कमी प्रीमियमवर उच्च जीवन कव्हरेज मिळते. ही योजना तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य असून, रायडर्सद्वारे अधिक संरक्षण मिळवण्याची संधी देखील देते. या योजनेच्या विविध पर्यायांमुळे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य कव्हरेज निवडू शकता. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण सुनिश्चित करायचे असेल, तर ही LIC Jeevan Amar Term Insurance Plan योजना एक चांगली निवड ठरू शकते.

अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट https://licindia.in/web/guest/lic-s-new-jeevan-amar-plan-no.-955-uin-no.-512n350n01- ला भेट द्या.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us