LIC Jeevan Kiran Plan: प्रीमियमच्या परताव्यासह घ्या आयुष्यभरासाठी विमा संरक्षण, एलआयसी ची नवीन टर्म इन्शुरन्स योजना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

LIC Jeevan Kiran Plan : भारतातील आयुर्विमा कंपन्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे, विविध ‘टर्म इन्शुरन्स’ योजना उपलब्ध आहेत. टर्म इन्शुरन्स योजनामध्ये आपण भरलेले पैसे कधीही परत मिळत नाहीत, जर पॉलिसी होल्डरचा, म्हणजे योजना धारकाचा मृत्यू झाला, तरच त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा, हा त्याच्या नॉमिनीला होतो.

योजना धारक घेतलेल्या मुदतपूर्तीपर्यंत हयात असेल तर त्याला कोणत्याही पद्धतीची मॅच्युरिटी अमाऊंट दिली जात नाही; कारण ‘टर्म इन्शुरन्स’ हा ‘प्युअर टर्म इन्शुरन्स’ चा एक कन्सेप्ट आहे. अशा योजनांमध्ये फक्त आयुर्विमा कंपनी त्या योजना धारकाची त्याच्या कुटुंबाप्रती असणारी फायनान्शिअल सिक्युरिटी ची रिस्क घेत असते. 

या सर्व गोष्टींचा विचार करून देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी ‘LIC OF INDIA‘ म्हणजेच आपल्या सर्वांची ‘भारतीय जीवन बीमा निगम’ या संस्थेने अतिशय सुंदर अशी एक योजना भारतातील स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे ‘जीवन किरण प्लॅन’/ LIC Jeevan Kiran Plan. ही योजना. ही एक प्युअर टर्म इन्शुरन्स योजनाच आहे.

LIC Jeevan Kiran Plan
LIC Jeevan Kiran Plan

काय आहे ‘जीवन किरण योजना’ ?

lic of india ने सादर केलेली ‘जीवन किरण योजना’ ही एक नॉन लिंक, असहभागी, वैयक्तिक बचत विमा योजना आहे. ही प्युअर टर्म इन्शुरन्स योजना असून या योजनेमध्ये, योजना धारक घेत असलेल्या मुदतीपर्यंत फायनान्शिअल सिक्युरिटी ची रिस्क एलआयसी कडून घेतली जाते. मुदतपूर्तीस भरलेले सर्व हप्ते परत दिले जातील किंवा या संपूर्ण मुदतीमध्ये योजना धारकाचा कोणत्याही पद्धतीने मृत्यू झाला तर विमारक्कम त्याच्या वारसाला परत दिली जाते. LIC Jeevan Kiran Plan ही एकमेव योजना अशी आहे की टर्म इन्शुरन्स योजना असून सुद्धा याच्या मधले भरलेले सर्व हप्ते, योजना धारकास मुदतपूर्तीस परत दिले जातात.

मॅच्युरिटी बेनिफिट काय मिळेल ?

LIC Jeevan Kiran Plan ही योजना ‘टर्म इन्शुरन्स’ योजनेचा एक भाग आहे; पण या योजनेमधून भरलेले सर्व हप्ते परत दिले जातात. योजना धारकांनी घेतलेल्या मुदत पर्यंत त्याचा एक्सीडेंटल किंवा नॅचरल डेथ झाला, तर विमा रक्कम त्याच्या अधिकृत वारसाला दिली जाईल आणि योजना धारक जर घेतलेल्या मुदत पर्यंत हयात असेल, तर योजना सुरू केल्यापासून मुदत संपेपर्यंत भरलेले सर्व हप्ते त्याला मुदतपूर्तीस परत दिली दिले जातील.

डेट बेनिफिट कसा मिळेल ?

या योजनेच्या मुदतपूर्तीच्या अगोदरच म्हणजेच घेतलेल्या मुदतीमध्ये योजना धारकाचा मृत्यू कोणत्याही कारणाने जर झाला तर विमा रक्कम ही त्याच्या अधिकृत वारसाला दिली जाईल. विमा रक्कम एक रकमी स्वरूपामध्ये मिळेल. ही रक्कम एक रकमी घ्यायची की टप्प्याटप्प्याने घ्यायची हा पर्याय नॉमिनीकडे उपलब्ध असेल, म्हणजेच टप्प्याटप्प्याने घेतली तर ही रक्कम पुढची काही वर्ष थोडी थोडी मिळत जाईल. 

LIC Jeevan Kiran Plan: हप्ते भरण्याचे प्रकार

या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योजना धारकास एक रकमी किंवा वार्षिक, सहामाही पद्धतीने एलआयसी ऑफ इंडिया कडे हप्ता भरावा लागेल. वार्षिक आणि सहामाही हप्ता भरण्यासाठी एक महिन्याचा ग्रेस पिरेड प्रत्येक वर्षी मिळणार आहे. 

प्रीमियम किती असेल ?

रेगुलर प्रीमियम भरण्यासाठी कमीत कमी हप्ता हा सहामाही तीन हजार रुपये असावा आणि सिंगल म्हणजेच एक रकमी हप्ता भरण्यासाठी तीस हजार रुपये विमा हप्ता असला पाहिजे.

या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?

  1. ही योजना वय वर्ष 18 पासून ते वय वर्ष 65 पर्यंतच्या कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाला घेता येते.
  2. LIC Jeevan Kiran Plan या योजनेची किमान मुदत 10 वर्ष आहे आणि कमाल मुदत 40 वर्ष आहे.
  3. या योजनेसाठी किमान विमा रक्कम 15 लाख रुपये आहे आणि कमाल विमा रकमेसाठी मर्यादा नाही. योजना धारक आपल्या उत्पन्नाप्रमाणे विमा संरक्षण वाढवू शकतो. त्यावरूनच हप्ता अवलंबून असेल.
  4. या योजनेमध्ये अपघाती मृत्यू व अपंगत्व रायडर उपलब्ध आहेत.
  5. योजना सुरू केल्यापासून दोन वर्षानंतर ही योजना बंद करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे.
  6. योजना धारकास काही कारणाने कर्ज हवे असल्यास, योजना सुरू केल्यापासून दोन वर्षानंतर कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
  7. या योजनेमध्ये योजना धारक जो हप्ता भरणार आहे तो इन्कम टॅक्स सवलतीसाठी पात्र असेल.
  8. मॅच्युरिटी अमाऊंट किंवा डेट बेनिफिट एक रकमी किंवा पुढील काही वर्षांमध्ये हप्त्याने घेण्याची सोय उपलब्ध आहे.
lic jeevan kiran 2024
LIC Jeevan Kiran Plan 2024

टर्म इन्शुरन्स योजना का खरेदी करावी ?

टर्म इन्शुरन्स ही योजना हाय रिस्क असणाऱ्या स्त्री किंवा पुरुष यांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारच्या टर्म इन्शुरन्स मध्ये योजना धारक आणि त्याची फॅमिली याच्यामध्ये फायनान्शिअल रिस्कची सिक्युरिटी आयुर्विमा कंपनीकडून घेतली जाते. LIC Jeevan Kiran Plan पॉलिसी मध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर या घटनेमध्ये मूळ विमा रक्कम, वार्षिक प्रीमियम च्या सातपट किंवा प्रीमियमच्या 105% जे जास्त असेल, ते योजना धारकाच्या नॉमिनीला दिले जाते. योजना धारकांनी सिंगल प्रीमियम म्हणजे पैसे एकदाच भरले असतील तर मूळ विमा रक्कमच्या 125% किंवा जे जास्त असेल ते दिले जाते.

बऱ्याच वेळेला योजना धारक ‘टर्म इन्शुरन्स’ पॉलिसी भावनेच्या भरामध्ये घेतो; पण काही वर्षानंतर योजनेचे हप्ते भरण्याचे बंद केले जातात आणि योजनाधारक ही योजना ती स्वतःहूनच बंद करतो. अशा योजनांच्या मध्ये त्याला स्वतःचा आर्थिक फायदा होताना दिसत नाही आणि टर्म इन्शुरन्स योजनेमध्ये कोणत्याही पद्धतीचा बोनस म्हणजे व्याज सुद्धा दिले जात नसतं. टर्म इन्शुरन्स मध्ये भरलेले कोणत्याही पद्धतीचे हप्ते हे केव्हाच कधीच परत मिळत नसतात म्हणजे या योजनेसाठी मॅच्युरिटी नसते.  त्यामुळे टर्म इन्शुरन्स योजना ह्या पाच ते दहा वर्षांमध्ये बंद होण्याचं सुद्धा प्रमाण जास्त वाढलेल आहे. 

अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंक वरती क्लिक करा https://www.licindia.in/lic-sjeevan-kiran-plan-no-870-uin-no-512n353v01

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us