LIC jeevan labh yojana: रोज गुंतवा 253 रु. 16 वर्षासाठी आणि मिळवा 52,50,000/-रु. करमुक्ती सह.

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

LIC jeevan labh yojana: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी आयुर्विमा संस्था एलआयसी यांनी आपल्या भारतातील आयुर्विमा ग्राहकांसाठी एक अतिशय चांगली योजना बाजारामध्ये आणलेली आहे. या योजनेच्या मार्फत आपण २५३ रुपये प्रत्येक दिवशी प्रीमियम भरल्यानंतर ५२,५०,०००/- रूपये मॅच्युरिटी स्वरुपात मिळतात. ही मिळणारी रक्कम संपूर्णपणे करमुक्त असेल सोबत योजनेसाठी विमा धारकास २०,००,०००/- रु. विमा संरक्षण दिले जाते.

LIC jeevan labh yojana मध्ये आपणास ५२,५०,०००/- कश्या पद्धतीने मिळतील आणि तुम्ही कसे लखपती होणार याबद्दलची सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आपणास हा लेख संपूर्ण वाचावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल.

LIC jeevan labh yojana: वैशिष्ट्य काय आहेत?

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला कमी कालावधीमध्ये आणि कमी हप्त्यामध्ये तुलनेने जास्त फायदा मिळतो. एलआयसीच्या इतर कोणत्या योजनेवर तुम्हाला काही वर्षांची सूट मिळणार नाही की जी या योजनेमध्ये आहे. एलआयसीच्या इतर योजनेमध्ये आपण घेतलेल्या मुदत कालावधीमध्ये सर्व प्रीमियम भरावे लागतात. या योजनेमध्ये आपण घेतलेल्या मुदतीच्या अगोदरच योजनेचे हप्ते भरण्याचे थांबले जातात.

LIC jeevan labh yojana
LIC jeevan labh yojana

हप्ते किती वर्षे व किती भरायचा आहे?

LIC jeevan labh yojana या योजनेमध्ये आपल्या स्वतःची काही रक्कम गुंतवावि लागेल. एकूण सोळा वर्षे रक्कम गुंतवण्याचा कालावधी आहे. प्रत्येक दिवशी २५३/- म्हणजेच एका महिन्याचे ७,६९६/- रुपये भरावे लागतील. याचाच अर्थ असा आहे एका वर्षासाठी ९२,३४५/- रुपये हजार रुपये ही रक्कम एलआयसी मध्ये हप्ता स्वरूपामध्ये भरावी लागेल. ही रक्कम आपणांस एकूण सोळा वर्ष भरायची आहे. म्हणजेच ९२,३४५/- १६ = १४,७७,५२०/- रुपये एवढी रक्कम मुद्दल स्वरूपामध्ये या योजनेअंतर्गत भरावी लागणार आहे.

Also Read:-  PM Kisan Samman Nidhi: 6000 चा निधी वाढवून होणार 12000 रुपये? बजेटमध्ये महत्वाचा निर्णय घेणार सरकार; जाणून घ्या सर्व माहिती.

हे हप्ते भरण्यासाठी आपल्याला चार पर्याय सुद्धा उपलब्ध असतील ते म्हणजे प्रत्येक महिना, तीन महिन्यातून एकदा, सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा, याचा अर्थ असा आहे, आपणास ९२,३४५/- रुपये ही जी वार्षिक रक्कम भरायचे आहे आपण तीच रक्कम वार्षिक, सहामाही, तिमाही, मासिक पद्धतीने एलआयसी मध्ये जमा करण्यासाठीचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत आहेत.

मॅच्युरिटी वेळेस रक्कम कशी मिळेल?

LIC jeevan labh yojana या योजनेसाठी एका ३० वर्षाच्या व्यक्ति साठी उदाहरण घेतले असता. ३० वयासाठी ९२,३४५/- हा वार्षिक हप्ता असेल आणि या योजनेसाठी २५ वर्षे मुदत घ्यावी लागेल. म्हणजेच आपणास या योजनेमध्ये २५ वर्षे ही एकूण योजनेची मॅच्युरिटी मुदत असेल. या योजनेसाठी विमा धारकास १६ वर्षे हप्ता भरावयाचा आहे. योजनेचा एकूण कालावधी पंचवीस वर्षाचा असला तरी त्याचा हप्ता फक्त सोळा वर्षेच भरायची आहे. पुढील नऊ वर्षे आपणास कोणत्याही पद्धीतीने पैसे भरावयाचे नाहीत. पुढील नऊ वर्षे योजनाधारकाला हप्ते भरण्यासाठी सूट दिली आहे. पुढील उदाहरणावरून आपणस समजेल कि ५२,५०,०००/- रु. आपणास कसे मिळणार आहेत.

LIC jeevan labh yojana हि योजना २५ वर्षानंतर संपेल आणि त्या वेळेस योजनाधारकाला संपूर्ण विमा रक्कम आणि या संपूर्ण कालावधी मध्ये जमा होणारे व्याज, म्हणजेच बोनस मिळणार आहे. हा बोनस योजना कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी जमा होत असतो पण विमाधारकास मुदतपूर्तीच्या वेळेस विमा रकमेसोबत दिला जातो. म्हणजेच आपणास २५ वर्षांनंतर मुदत पूर्ण झाल्यावर विमा रक्कम + बोनस रक्कम एकत्रित रित्या मिळणार आहे.

या संपूर्ण १६ वर्षाच्या हप्ता भरण्याच्या कालावधीमध्ये विमाधारक एकूण १४,७७,५२०/- रु जमा करेल. मुदतपूर्तीस विमा रक्कम २०,००,०००/- रु + एकूण २५ वर्षाचा जमा बोनस ३२,५०,०००/-रु = असे एकूण एकत्रित रित्या ५२,५०,०००/- रु योजनाधारकास मिळणार आहेत. या संपूर्ण पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये ३२,५०,०००/- व्याजाची रक्कम असेल म्हणजेच आपणास जरी हप्ते स्वरूपात १६ वर्षे रक्कम भरावी लागणार असली तरीही या योजनेमध्ये त्याचे व्याज म्हणजेच बोनस मात्र एकूण पंचवीस वर्षे मिळणारच आहे.

Also Read:-  LIC New Business Premium: एलआयसी ने रचला नवा इतिहास! FY25 मध्ये कमावले ₹2.27 लाख कोटी; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

अशा पद्धतीने आपण २५३ रु दिवासीचे जमा करून सोळा वर्षे आपल्याकडील रक्कम गुंतवून या योजनेपासून लखपती बनू शकतो. या लेखामध्ये जीवन लाभ योजना च्या २५ वर्षे मुदतीच्या प्लॅन संदर्भात योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला

LIC Jeevan Labh Plan: इतर फायदे काय आहेत.

  1. या योजनेमध्ये तीन वर्षानंतर कर्ज मिळण्यासाठी चा फायदा उपलब्ध आहे.
  2. या योजनेमध्ये नॉमिनी बदलण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
  3. 8 वर्षे पासून 59 वर्षापर्यंत कोणत्याही स्त्री आणि पुरुष या विमा योजनेत सामील होऊ शकतात.
  4. आयकर कलम 80C अंतर्गत भरणार्‍या सर्व हप्ते सवलतीसाठी पात्र आहेत
  5. मुदतपूर्तीनंतर मिळणारी सर्व रक्कम इन्कम टॅक्स फ्री असेल.

अधिक माहिती साठी www.licindia.in या वरती क्लीक करा

Contact us