Monsoon rain update: मान्सून अचानक गायब झाला? उपग्रह चित्रामद्धे दिसले धक्कादायक वास्तव; पाऊस नेमका कधी येणार?

WhatsApp Group Join Now

Monsoon rain update: यंदाच्या पावसाने सुरवातीलाच जोरदार एंट्री घेत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. अंदमानात वेळेपूर्वी दाखल झाल्यानंतर मान्सूनने विक्रमी वेगाने देशभर वाटचाल केली. मात्र आता अचानक चित्र बदलले असून, मान्सूनची गती थांबल्यासारखी झाली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

दरम्यान, जूनच्या मध्यातच देशभरात पावसाची मोठी तुट नोंदवली गेली असून, महाराष्ट्रातील परिस्थिति अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशभरात पावसाचा मोठा फटका

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, जूनच्या मध्यापर्यंत देशात सरासरीपेक्षा तब्बल 64 टक्के कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात तर पावसाची तुट 69 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे पेरणी केलेल्या शेतकाऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मान्सून अचानक का थांबला?

पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरावरील वाऱ्यांमद्धे झालेल्या बदलांमुळे मान्सूनची यंत्रणा मंदावली असून, ढग निर्मिती प्रक्रिया कमी झाली आहे. त्यामुळे मान्सून देशात दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस पडत नाही.

उपग्रह चित्रांमद्धे दिसले धक्कादायक संकेत

अलीकडील उपग्रह चित्रांमद्धे मान्सून स्थितिचे वेगळेच वास्तव समोर आणले आहे. Monsoon rain update

  • मध्य भारत, दक्षिण भारत आणि महाराष्ट्राचा मोठा भाग जवळपास स्वच्छ दिसत असून, सक्रिय मान्सूनची चिन्हे अत्यंत कमी आहेत.
  • हिमालयीन प्रदेश, ईशान्य भारत आणि गंगेच्या मैदानात उत्तरेकडील भागातच ढगांची प्रमुख सक्रियता दिसून येत आहे.
  • अरबी समुद्रातून येणारे मान्सूनचे ढग कमकुवत आणि तुटक स्वरूपात दिसत असल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे.

याच कारणामुळे महाराष्ट्रात अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरक्ष: गायब झाल्यासारखी परिस्थिति निर्माण केली आहे. Monsoon rain update

आता पाऊस कधी परतणार?

सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे- मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान तज्ञांच्या मते हा मान्सूनचा कायमस्वरूपी अडथळा नसून तात्पुरता ब्रेक आहे. वातावरणात अनुकूल बदल झाल्यास 20 जूननंतर मान्सून पुनः जोर धरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.

Also Read:-  E-PAN Card Download: आपले e-PAN कार्ड डाउनलोड करा NSDL पोर्टलवरून; डिजिटल PAN कार्ड कसे मिळवावे, जाणून घ्या सर्व माहिती.

४ ते १५ जून: पावसाची आकडेवारी

कालावधीपाऊस
सरासरी पाऊस५३.७ मिमी
प्रत्यक्ष नोंदलेला पाऊस१९.२ मिमी

Monsoon rain update ही आकडेवारी मान्सूनमधील खंड किती मोठा आहे, हे स्पष्ट करते.

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय स्थिती (१ ते १५ जून)

पूर्ण दुष्काळी स्थिती (-१००% तूट)

  • नंदुरबार
  • धुळे

अत्यल्प पाऊस (-६०% ते -९९% तूट)

  • ठाणे (-९९%)
  • रायगड (-९६%)
  • मुंबई उपनगर (-९३%)
  • मुंबई शहर (-९८%)
  • रत्नागिरी (-७२%)
  • पुणे (-८१%)
  • सातारा (-८४%)
  • कोल्हापूर (-७०%)
  • नाशिक (-८०%)
  • छत्रपती संभाजीनगर (-८३%)
  • अकोला (-७४%)
  • अमरावती (-६७%)
  • नागपूर (-४५%)

तुटीचा पाऊस (-२०% ते -५९% तूट)

  • बीड (-५०%)
  • लातूर (-३३%)
  • धाराशिव (-३०%)
  • नांदेड (-५२%)
  • परभणी (-४६%)
  • हिंगोली (-५७%)
  • सांगली (-४२%)

हवामान खात्याचे काय म्हणणे?

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख विक्रम सिंग यांनी सांगितले की, “राज्यात 20 ते 22 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल. सध्या पावसाचे ढग पुरेशा प्रमाणात तयार होत नसले तरी वातावरणात अनुकूल बदल झाल्यास चांगल्या पावसाची शक्यता आहे.”

शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे

सध्या अनेक भागांत खरीप पेरणीची प्रतीक्षा सुरू आहे. 20 जूननंतर पावसाचा जोर वाढल्यास पेरण्या वेग घेऊ शकतात; मात्र पाऊस आणखी उशिरा आला तर दुबार पेरणी, बियाण्यांचा खर्च आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढची वाटचाल कशी

मानसून ने 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात वेळेत प्रवेश केला होता. 10 ते 15 जून दरम्यान या भागात पावसाची सांगली सुरुवात होणे अपेक्षित होते, मात्र 17-18 जून पर्यंत मान्सूनची पुढील वाटचाल पूर्णपणे मंदावले आहे.

Also Read:-  Atal pension yojana benefits: फक्त ₹210 पासून सुरू करा गुंतवणूक, मिळवा ₹5000 पेन्शन, अटल पेन्शन योजना! संपूर्ण माहिती इथे वाचा. 

सध्या मान्सूनची उत्तर सीमा हरणे, सोलापूर, हैदराबाद, रांची आणि मुजफ्फरपुर या भागावर जात असून ती स्थिरावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवसात तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. Monsoon rain update

Monsoon rain update दरम्यान 22 जून पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागात केवळ तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून, या कालावधीत अतिवृष्टी किंवा सर्व दूर पावसाची शक्यता कमी आहे. न्यूमरिकल वेदर मॉडेलच्या संकेतानुसार 24 आणि 25 जून च्या सुमारास कोकणासह महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षनीय रीत्या वाढू शकतो.

25 ते 28 जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात अतिवृष्टी पोषक ढगांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर 24 जून पासून पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून 26 आणि 27 जून च्या आसपास हा जोर उत्तर कोकणापर्यंत पोहोचू शकतो.

Monsoon rain update

मान्सूनची सुरुवात जरी वेगवान झाली असली, तरी सध्या तो कमकुवत अवस्थेत आहे. उपग्रह चित्रांमध्ये महाराष्ट्रासह मध्य भारतात ढगांची कमतरता स्पष्ट दिसत आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 20 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, जूनच्या अखेरीस राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि नागरिकांनी पुढील आठवड्यातील हवामान अंदाजावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.