Shet Jamin Mojani: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रोव्हर मशिनमुळे जमिनीची मोजणी होणार तासांत; आता अतिक्रमण करणाऱ्यांची खैर नाही.

WhatsApp Group Join Now

Shet Jamin Mojani: महाराष्ट्रात शेतजमीनच्या सीमावरुण असलेले वाद, अतिक्रमणाच्या तक्रारी आणि क्षेत्रफळातील गोंधळ यामुळे अनेक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेकदा जमिनीची मोजणी करण्यासाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकाऱ्याना न्याय मिळण्यास विलंब होत होता.

मात्र आता अत्याधुनिक रोव्हर मशीन (Rover machine) तंत्रज्ञानामुळे हे चित्र बदलू लागले आहे. उपग्रहाशी जोडलेल्या या स्मार्ट यंत्राद्वारे जमिनीची अचूक मोजणी काही तासांत पूर्ण होत असून अतिक्रमण झाले आहे की नाही, याचेही स्पष्ट उत्तर मिळत आहे.

विशेष म्हणजे, जमिनीवरील जुन्या खुणा नष्ट झाल्या असल्या किंवा कुणी त्या बदलण्याचा प्रयत्न केला असला तरी रोव्हर मशीन अक्षांश आणि रेखांश आधारे वास्तविक सीमा दाखवते. त्यामुळे शेजाऱ्याने जमीन बळकावली आहे का, क्षेत्रफळात फेरफार झाला आहे का किंवा मालकी हक्कासदर्भातील वादात सत्य कोणाचे आहे, हे आता अधिक अचूकपणे समोर येत आहे.

महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभागाकडून मोठ्या प्रमाणावर या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून हजारो प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली निघत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी रोव्हर मशीन हे केवळ मोजणीचे साधन नसून जमिनीच्या वादांवर तोडगा काढणारे प्रभावी तंत्रज्ञान ठरत आहे.

रोव्हर मशीन म्हणजे नेमके काय?

Shet Jamin Mojani साठी रोव्हर मशीन हे उपग्रहाशी (Satelite) जोडलेले आधुनिक सर्वेक्षण उपकरण आहे. हे उपकरण अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) यांच्या आधारे जमिनीचे अचूक मोजमाप करते. पारंपारिक पद्धतीमध्ये खुणा, बांध किंवा इतर भौतिक संदर्भावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र रोव्हर मशीन थेट भू-स्थानिक (Geo-coordinate) माहितीच्या आधारे मोजणी करते. त्यामुळे मोजणी अधिक अचूक होते.

Also Read:-  Health Insurance for Family: संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम आरोग्य विमा निवडताना लक्षात ठेवा 'हे'5 महत्त्वाचे मुद्दे.

काही तासांत पूर्ण मोजणी होते?

पूर्वी एका शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत असत. अनेक वेळा हवामान, पिके किंवा भौगोलिक अडचणीमुळे प्रक्रिया आणखी उशिरा होत असे. आता रोव्हर मशीनच्या मदतीने काही तासांतच संपूर्ण मोजणी पूर्ण केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचत आहेत.

अतिक्रमण लगेच कळते

शेजारील शेतकऱ्यांमध्ये बांध, रास्ता, किंवा क्षेत्रफळ यावरून वाद निर्माण होणे सामान्य बाब आहे. अशा वेळी रोव्हर मशीनद्वारे केलेली मोजणी अत्यंत उपयुक्त ठरते. जमिनीचे अचूक क्षेत्रफळ आणि सीमा रेषा स्पष्ट होत असल्याने अतिक्रमण झाले आहे की नाही हे सहजपणे समजू शकते.

विशेष म्हणजे, कोणी जमिनीवरील पारंपरिक खुणा बदलल्या किंवा हटवल्या असल्या तरी रोव्हर मशीन मधून उपग्रहाद्वारे प्राप्त होणाऱ्या समन्वयकांच्या आधारे वास्तविक स्थिति दाखवते. त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते.

खुणा नसल्या तरी मोजणी शक्य?

अनेक जुन्या जमिनीमध्ये मूळ सीमारेशाच्या खुणा कालांतराने नष्ट झालेल्या असतात. काही वेळा नैसर्गिक कारणामुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे त्या दिसेनाशा होतात. अशा परिस्थितित पारंपरिक मोजणी कठीण होत असते. मात्र रोव्हर मशिनला भौतिक खुनांची गरज नसते. उपग्रह संकेतांच्या आधारे ते अचूक मोजमाप करू शकते. त्यामुळे जुनी प्रकरणे निकाली काढण्यास मोठी मदत होत आहे.

प्रायवेट सर्वेअरची मदत

Shet Jamin Mojani साठी वाढती मागणी लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने प्रायवेट सर्वेअरची संकल्पना सुरू केली आहे. हे सर्वेअर प्राथमिक मोजणी करतात. मात्र अंतिम पडताळणी, अहवाल आणि अधिकृत मान्यता ही शासकीय मोजणीदारांकडूनच दिली जाते.

Also Read:-  Post Office Savings Account: पोष्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाऊंट; तुमच्या बचतीसाठी एक सर्वोत्तम पर्याय.

या पद्धतीमुळे मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यास मदत होत असून प्रलंबित प्रकरणे कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

राज्यभरात वाढतोय रोव्हरचा वापर

महाराष्ट्रात रोव्हर आधारित सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जाते. भूमी अभिलेख विभागाने प्रलंबित मोजणी प्रकरणे कमी करण्यासाठी आणि सर्वेक्षण आधिक अचूक करण्यासाठी हजारो रोव्हर उपकरणांचा वापर सुरू केला आहे. राज्यभरातील अनेक तालुके आणि जिल्ह्यामध्ये ही प्रणाली टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे.

शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या सीमारेषा, मालकी हक्क आणि अतिक्रमणाच्या वादाबाबत जागरूकता वाढल्याने मोजणीसाठी अर्ज संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागावार अतिरिक्त ताण निर्माण झाला असला तरी रोव्हर मशिनमुळे कामाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे.

Shet Jamin Mojani

शेतजमीच्या सीमा स्पष्ट करणे, अतिक्रमणाच्या तक्रारींची पडताळणी करणे आणि मालकी हक्क संदर्भात वाद कमी करणे यासाठी रोव्हर मशीन हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. जलद, अचूक आणि पारदर्शक मोजणीमुळे शेतकऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास वाढत असून भविष्यात जमीनसंबंधीचे अनेक वाद कमी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment