LIC YOJANA: LIC च्या सर्वोत्तम पॉलिसी! परताव्याची पूर्ण हमी, गुंतवणुकीचे अनेक फायदे, तपशील इथे पहा!

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

LIC YOJANA: भारतीय जीवन बिमा निगम (LIC) हि भारतात 1956 पासून आयुर्विमा क्षेत्रातील सर्वात जास्त विमा सेवा देणारी एकमेवाद्वितीय आयुर्विमा कंपनी म्हणून ओळखली जाते. आता पर्यंत भारतातील जवळपास 40 कोटी लोकांच्या आयुर्विमा पॉलिसी एकट्या LIC कडे आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांचा LIC वरील असणारा विश्वास आणि LIC ने लोकांच्या साठी डिजाईन केलेल्या विविध प्रकारच्या, फायदेशीर असणाऱ्या योजना, ज्या योजनांच्या मुळे कित्येक लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करता आली.

एलआयसी नेहमीच्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक विमा पॉलिसी योजना सुरु करत असते, जसे कि चिल्ड्रन्स प्लॅन्स, पेन्शन प्लॅन्स, एन्डॉवमेंट प्लॅन्स, मनी बॅक प्लॅन्स, युलिप प्लॅन्स इ. अशा विविध पद्धतीच्या विमा पॉलिसी मुळे ग्राहकांनी त्यांना हव्या असलेल्या योजनेमध्ये पैसे गुंतवून आपली स्वप्ने पूर्ण केली आहेत.

LIC मधील गुंतवणूक ही भारतातील सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक मानली जाते. यामध्ये योजनाधारकाला लाइफ इन्शुरन्स कव्हरची सुविधा मिळते. जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो, तेव्हा भारतीय लोकांच्या समोर विश्वासाचे एकच नाव येते ते म्हणजे LIC OF INDIA जिथे लोकांचा पैसा सुरक्षित तर राहतोच त्यासोबत देशाच्या विकासासाठी वापरला जातो आणि कालांतराने त्यावरती चांगला परतावाही मिळतो.

या लेखाद्वारे आमी LIC च्या काही योजनांबद्दल माहिती देत आहोत, ज्यामध्ये चांगला परतावा मिळतो, त्याचबरोबर भविष्यात स्वतःसाठी एक चांगला फंड देखील तयार होतो. हा लेख संपूर्ण वाचा आणि LIC मध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा योग्य निर्णय घ्या.

LIC YOJANA

भारतीय आयुर्विमा महामंडळ वेळोवेळी मार्केट मध्ये प्रत्येक श्रेणीनुसार नवीन योजना आणत असतात. 0 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील लोक यापैकी कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. एलआयसीकडे प्रत्येकाच्या गरजेनुसार अनेक विमा पॉलिसी आहेत. योजनाधारकाने घेतलेल्या विमा रकमेसोबत पूर्ण वर्षाचा बोनस मुदतपूर्तीस मिळतो. याच बरोबर प्रत्येक योजनेमध्ये लाईफ कव्हर सुद्धा दिले जाते.

एलआयसी जीवन आनंद योजना

LIC YOJANA: एलआयसी ची जीवन आनंद योजना हि खूपच लोकप्रिय अशी योजना आहे. एन्डॉवमेंट पद्धतीमध्ये येणाऱ्या या योजनेला जास्तीत जास्त बोनस दर दिला जातो. हि योजना सुरु करण्यासाठी वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. किमान विमा रक्कम एक लाख आणि कमाल विमा रक्कम साठी मर्यादा नाही. 15 वर्षांपासून पुढे 35 वर्षापर्यंत कोणतीही मुदत घेऊ शकतो. परिपक्वतेचे जास्तीत जास्त वय 75 वर्षे आहे.

एलआयसी जीवन आनंद योजना
एलआयसी जीवन आनंद योजना

या योजनेनुसार मुदतपूर्तीस मॅच्युरिटी रक्कम मिळाल्या वरती हि योजना बंद न होता चालूच राहते, म्हणजेच प्रीमियम भरायचे थांबले तरी, प्रीमियम न भरता विमा संरक्षण 100 वयापर्यंत चालूच राहते आणि योजनाधारकाच्या वयाच्या 100 वर्षी ही योजना संपते. हि योजना एन्डॉवमेंट आणि होल लाईफ योजनेचे एकत्रीकरण आहे. ज्या लोकांनां विमा संरक्षण तहयात हवे आहे त्यांच्यासाठी हि एक अतिशय योग्य योजना आहे.

Also Read:-  IRDAI 2024 चा LIC च्या सरेंडर व्हॅल्यू नियम सुधारण्यास नकार; 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम अंमलात येणार?

एलआयसी जीवन उमंग योजना

LIC YOJANA: एलआयसी जीवन उमंग ही संपूर्ण जीवन विमा योजना आहे. हि इतर योजनांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. ही योजना मनी बॅक, होल लाईफ, पेन्शन प्लॅन्स आणि एंडॉवमेंट प्लॅन्सचे कॉम्बिनेशन आहे. यामध्ये, तहयात लाइफ कव्हरसह, प्रीमियम भरण्याची मुदत पूर्ण झाल्यावरती तिथून पुढे प्रत्येक वर्षी विमा रकमेच्या 8% रक्कम सरव्हायव्हल रक्कम, पेन्शन म्हणून तहयात परत दिली जाते. त्याचबरोबर मॅच्युरिटी च्या वेळेस खूप मोठी एकरकमी रक्कम सुद्धा उपलब्ध होते.

एलआयसी जीवन उमंग पॉलिसी
एलआयसी जीवन उमंग योजना

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, वयाच्या 100 वर्षांपर्यंत लाईफ कव्हरेज प्रदान करते. 90 दिवस ते 55 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात. यासाठी दोन लाख किमान विमा रक्कम घेणे आवश्यक आहे, कमाल विमा रकमेसाठी कोणतेही मर्यादा नाही. योजनाधारक आपल्या आर्थिक कुवतीनुसार कितीही विमा रक्कम निवडू शकतो.

एलआयसी चिल्ड्रन्स मनी बॅक योजना

LIC YOJANA: एलआयसी चिल्ड्रन्स मनी बॅक योजना ही एक मनी-बॅक चाइल्ड प्लॅन योजना आहे, जी खास करून लहान मुलांच्या साठी बनवली आहे. मुलांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांचे शिक्षण, करिअर, लग्न इ. विविध गोष्टी समोर ठेऊन हा प्लॅन LIC ने डिजाईन केला आहे. या योजनेसाठी 0 ते 12 वर्षे वयोगटातील मुलाच्या वतीने कोणतेही पालक किंवा कायदेशीर पालक पॉलिसी घेऊ शकतात. या योजनेमध्ये तुम्ही एक लाख विमा रकमेपासून ते अमर्यादित विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकता. या योजेमध्ये परिपक्वतेचे वय 25 वर्षे आहे .

एलआयसी चिल्ड्रन्स मनी बॅक योजना
एलआयसी चिल्ड्रन्स मनी बॅक योजना

योजना सुरु केल्यापासून मुलांच्या वयाच्या 18 व्या वर्षी विमा रक्कम पैकी 20% रक्कम परत दिली जाईल. त्यांच्या वयाच्या 20 व्या वर्षी 20% रक्कम दिली जाईल. त्यांच्या वयाच्या 22 व्या वर्षी 20% रक्कम परत दिली जाईल आणि मुलांच्या वयाच्या 25 व्या वर्षी राहिलेले 40% रक्कम आणि त्यावरील जमा झालेले बोनस दिला जाईल. या योजनेमध्ये मुलांचे विमा संरक्षण त्यांच्या वयाच्या 8 व्या वयापासून सुरु होते.

Also Read:-  LIC Index Plus: तुमचे भविष्य आणि सुरक्षा कवच! सुरक्षित करा, गुंतवणुकीच्या  नव्या युगाच्या वाटचालीसह.

निष्कर्ष: LIC YOJANA

LIC YOJANA: सुरक्षित गुंतवणूक आणि उत्कृष्ट परतावा मिळणे हे प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते. यामुळेच लोक सरकारी विमा कंपनी एलआयसीमध्ये विश्वासाने पैसे गुंतवणे जास्त पसंद करतात. एलआयसीच्या अनेक योजना आहेत, ज्या सुरक्षिततेसोबतच चांगले व्याज दर देतात. इथे सांगितलेल्या तीन योजनेसोबत दुसऱ्या अनेक योजना खूप लोकप्रिय आहेत, कोणतीही योजना सुरु करण्याअगोदर त्याच्या अटी आणि शर्ती पाहूनच योग्य तो निर्णय घेण्याची आम्ही तुम्हाला सल्ला देत आहोत.

अशा विविध गुंतवणूक योजनांसाठी LIC च्या अधिकृत वेबसाईट www.licindia.in ला भेट द्या किंवा नजीकच्या शाखा कार्यालयास भेट द्या. तुमच्या विमा प्रतिनिधीस विविध योजनासंदर्भात विचारा आणि आजच या योजनामधे गुंतवणूक करण्याचा सकारत्मक विचार करा आणि सुरुवात करा.

Contact us