LIC Policy Revival: LIC Of INDIA हि भारत सरकारची सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह आयुर्विमा कंपनी, 67 वर्षांपासून संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. यांच्या अनेक आयुर्विमा प्लॅन ने भारतीय नागरिकांचे भविष्य उज्वल बनवले आहे, या संस्थेमार्फत बचत आणि आयुर्विमा संरक्षण पुरवले जाते, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा आणि सुनिश्चित परतावा निश्चित होतो.
LIC (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) भारतीय विमा उद्योगातील एक प्रमुख कंपनी आहे. अनेक लोक LIC मध्ये गुंतवणूक करतात कारण ती गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि फायदेशीर आहे. परंतु, अनेक वेळा काही कारणामुळे आपले प्रीमियम भरण्याचे राहून जाते किंवा विसरले जाते. त्यामुळे पॉलिसी लॅप्स होते आणि आपले विमा संरक्षण सुद्धा थांबले जाते.
जर आपली LIC पॉलिसी देखील अशाच कोणत्याही कारणाने थांबली असेल, म्हणजे आपली LIC पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. अशी थांबलेली LIC पॉलिसी पुन्हा सुरु होते, परंतु यासाठी काही अटी आणि शर्ती असतात, त्यासोबतच थोडी कागदपत्र प्रक्रियांचे पालन करावे लागते, या सर्व गोष्टी नि आपण आपले विमा संरक्षण आणि बचत पुन्हा सुरु करू शकतो. या लेखात, आपण LIC पॉलिसी पुन्हा सक्रिय कशी करावी, याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.
LIC पॉलिसी म्हणजे काय?
LIC म्हणजे ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’, जी भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि विश्वासार्ह आयुर्विमा कंपनी आहे. LIC मध्ये विविध प्लॅन्सचे विविध प्रकारे संरचना केली आहे, जी पॉलिसीधारकांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा आणि निश्चित परतावा देऊ शकतात. LIC Policy Revival
यामध्ये विविध योजनांसोबत आणखी काही गोष्टींचा समावेश आहे, जसे कि लाईफ कव्हर, नभरलेल्या प्रीमियमसाठी कर्जाची सुविधा, कर सवलत किंवा अशा अनेक सुविधा देखील दिल्या जातात, LIC पॉलिसीचा मुख्य उद्देश विमाधारकाला आर्थिक संकटात आधार देणे आणि त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे हे आहे.
LIC पॉलिसी लॅप्स झाल्यावर काय होते?
LIC पॉलिसी लॅप्स होणे म्हणजे, पॉलिसी धारकाने काही कारणांमुळे त्याच्या विमा पॉलिसीचे प्रीमियम वेळेवर भरले नाहीत आणि त्यामुळे पॉलिसीच्या फायदे थांबले जातात. पॉलिसी लॅप्स झाल्यास त्यामध्ये असलेल्या सर्व फायदे काही कालावधीसाठी थांबले जातात आणि विमाधारकाला विमा संरक्षण मिळत नाही. उदाहरणार्थ, आयुर्विमा पॉलिसी लॅप्स झाल्यास, योजनाधारकाचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीला विमा संरक्षण मिळणार नाही. यामुळे पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला क्लेम मिळनार नाही
पण, काही वेळा LIC आपल्या ग्राहकांना संधी देत असते ज्याद्वारे ते त्यांच्या पॉलिसीचे थांबलेले सर्व प्रीमियम भरून पुन्हा सुरु चालू करू शकतात. जर पॉलिसी लॅप्स झाल्यास त्याचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते, परंतु त्यासाठी एक निश्चित 5 वर्षाचा कालावधी असतो. LIC Policy Revival
LIC पॉलिसी पुन्हा कशी सक्रिय करावी?
जर तुमची LIC पॉलिसी कोणत्याही कारणाने लॅप्स झाली असेल आणि तुमच्याकडून त्याचे प्रीमियम भरणे थांबले असेल, तर तुम्हाला अशी पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी मिळते. LIC चे पॉलिसी पुनरुज्जीवन साठी काही स्टेप्स दिल्या आहेत आणि त्याचे काही नियम आणि शर्ती आहेत. खाली दिलेल्या स्टेप्सद्वारे पॉलिसी पुन्हा कशी सुरु करायची हे समजून घेऊ शकता.
१. पॉलिसी तपासा आणि सर्व माहिती समजून घ्या
LIC पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमच्याकडे पॉलिसीबद्दल पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये तुमच्या पॉलिसीचा प्लॅन प्रकार, प्रीमियम पेमेंटची तारीख, केंव्हापासून प्रीमियम भरला नाही आणि पॉलिसीच्या अटी काय आहेत. LIC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा तुमच्या जवळील शाखेत जाऊन तुम्हाला हे सर्व तपशील मिळवता येतील.
२. पॉलिसीची मुदत आणि शर्ती तपासा
LIC पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी एक महत्वाची शर्त म्हणजे, तुम्हाला पॉलिसी लॅप्स झाल्यापासून पाच वर्षांच्या आतच ती पुनरुज्जीवित करावी लागेल. म्हणजेच, पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर ती पुन्हा सक्रिय करणे शक्य होणार नाही.
३. चुकलेले प्रीमियम भरा
LIC पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी तुम्हाला नभरलेल्या सर्व प्रीमियमचा भरणा करावा लागेल. त्याचबरोबर, विलंब शुल्क देखील तुम्हाला भरावे लागेल. या सर्व रक्कमेचे एकत्रित भरणे करून, तुमची पॉलिसी पुन्हा सक्रिय केली जाऊ शकते. LIC Policy Revival
४. LIC शाखेतील सहाय्य घ्या
LIC च्या जवळील शाखेत जाऊन पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी अर्ज दाखल करा. येथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, तपशील आणि प्रक्रियेच्या बाबतीत मार्गदर्शन केले जाईल. LIC सहकार्याच्या प्रक्रियेसाठी कोणताही अतिरिक्त शुल्क घेत नाही.
५. शर्ती आणि पात्रता
LIC च्या पॉलिसीला पुन्हा सक्रिय करण्यासाठी काही शर्ती लागू होतात. यामध्ये आरोग्य तपासणी, चुकलेल्या प्रीमियमचे भरणे, आणि पॉलिसीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रक्रिया असू शकतात. यामुळे, सर्व प्रकारच्या पॉलिसी पुनरुज्जीवित करणे शक्य नसते.
LIC पॉलिसी सेंडर व्हॅल्यू काय आहे?
LIC पॉलिसी रद्द केल्यास, तुम्हाला त्याचे ‘सेंडर व्हॅल्यू’ मिळू शकते. सेंडर व्हॅल्यू म्हणजे, पॉलिसी बंद केल्यानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम. या रक्कमेचे प्रमाण तुमच्या प्रीमियमच्या भरण्याच्या कालावधीवर आणि पॉलिसीच्या मुदतीवर आधारित असते. LIC Policy Revival
तीन वर्षांनंतर: जर तुमची पॉलिसी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेली असेल आणि तुम्ही ती रद्द केली, तर तुम्हाला तुमच्या एकूण प्रीमियमचा सुमारे 30% परतावा मिळू शकतो.
दहा वर्षांनंतर: जर तुमची पॉलिसी दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे सुरू असलेली असेल, तर तुम्हाला गॅरंटेड सेंडर व्हॅल्यू मिळू शकते. यामध्ये, बोनस देखील समाविष्ट केला जातो.
LIC पॉलिसी सेंडर केल्यावर कर फायद्यांचा परिणाम
LIC पॉलिसी रद्द केल्यावर तुम्हाला आयकर कायद्यानुसार कोणताही कर लाभ मिळणार नाही. म्हणजेच, रद्द केलेल्या पॉलिसीवर मिळालेल्या कर सवलतींचा तुम्हाला फायदा होणार नाही. LIC Policy Revival
LIC पॉलिसीमध्ये 30 दिवसांचा ग्रेस पीरियड
LIC पॉलिसीमध्ये प्रीमियम भरताना 30 दिवसांचा एक ग्रेस पीरियड उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही प्रीमियम पूर्ण वेळेत भरले नाही, तरी देखील 30 दिवसांच्या आत तो भरण्यासाठी तुम्हाला संधी मिळते. जर योजनाधारकासोबत काही वाईट घडले आणि ग्रेस पीरियडमध्ये असेल, तरयोजनाधारकाच्या नॉमिनीला पूर्ण विमा संरक्षण मिळते.
LIC Policy Revival
LIC पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे, पण यासाठी काही नियम आणि शर्ती असतात. जर तुमच्याकडे पाच वर्षांपर्यंत प्रीमियम न भरल्याचे कारण असेल, तर LIC तुमच्यासाठी पॉलिसी पुन्हा सक्रिय करण्याची संधी देईल. पॉलिसी पुनरुज्जीवित करण्यासाठी, सर्व आवश्यक प्रीमियम भरून आणि शाखेतील सहाय्य घेत, तुम्ही आपली पॉलिसी पुन्हा सक्रिय करू शकता. यामुळे तुम्हाला भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पुन्हा विमा संरक्षण मिळेल.
LIC पॉलिसी पुनरुज्जीवन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जी तुम्हाला तुमच्या जीवन विमा पॉलिसीचे संरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी मदत करते. योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केलेली ही प्रक्रिया तुम्हाला भविष्यात आर्थिक सुरक्षा आणि पॉलिसीचे सर्व फायदे मिळवण्याची संधी देईल
LIC Policy Revival External Links: LIC Official Website IRDAI Guidelines
Table of Contents